Home » Threads आणि Twitter मधील नेमका फरक काय?

Threads आणि Twitter मधील नेमका फरक काय?

by Team Gajawaja
0 comment
threads vs twitter
Share

ट्विटरला टक्कर देणारे नवे अॅप थ्रेड नुकतेच लॉन्च झाले आहे. मेटा द्वारे तयार करण्यात आलेल्या या अॅपमध्ये ट्विटरसारखेच पण थोडे वेगळे फिचर्स दिले गेले आहेत. खास गोष्ट अशी की जेव्हा थ्रेट लॉन्च केले गेले तेव्हा त्याला ५० मिलियन पेक्षा अधिक युजर्सने डाउनलोड केले. थ्रेड हे आयफोन आणि प्ले स्टोरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अशातच थ्रेड आणि ट्विटर जरी समान दिसत असले तरीही नक्की त्यामधील फरक काय हे पाहूयात. (Threads Vs Twitter)

शब्दांची मर्यादा
मेटाने असे सांगितले आहे की, थ्रेट युजर्सला शब्दांची मर्यादा ही ५०० असणार आहे. अनवेरिफाइड ट्विटर युजर्सकडे कमीत कमी २८० शब्दांची मर्यादा असते.त्याचसोबत वेरिफाय इंस्टाग्राम अकाउंट थ्रेट्स आपला निळा टॅग ठेवू शते. याच दरम्यान ट्विटर ही सुविधा डॉलर ८ प्रति महिना अशी दिली जाते. पेमेंट केल्यानंतर युजर्सला त्यांच्या शब्दांची मर्यादा २५ हजारांपर्यंत वाढवण्यास मदत मिळणार आहे. मेटाने मात्र असा कोणताही पर्याय दिलेला नाही.

युजर्स बेस
थ्रेड्ससाठी युजर्सकडे एक इंस्टाग्राम अकाउंट असणे गरजेचे आहे. प्रोफाइल तयार करताना अॅप मध्ये असलेल्या इंस्टाग्रामवरील माहिती आणि फोलोअर्स इंपोर्ट करण्याचा सुद्धा ऑप्शन दिला जाणार आहे. थ्रेड्समुळे इंस्टाग्रामवर मोठ्या युजरबेस पर्यंत पोहचण्यास मदत करणार आहे.

व्हिडिओ पोस्टिंगसाठी मर्यादा
थ्रेड्सवर युजर्स पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळेचे व्हिडिओ पोस्ट करता येणार आहे. ट्विटरवर आता प्रतिष्ठित निळ्या रंगाचा टॅग असलेल्या लोकांना २० मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ पोस्ट करता येणार आहे.

होम फिडमध्ये फरक
ट्विटरचे होमपेज युजर्सला काय ट्रेंन्डिंग आहे आणि अन्य विषय ज्यामध्ये त्यांना आवड असेल ते पाहण्याची संधी देते. सध्यासाठी मेटा थ्रेटवर काय ट्रेन्डिंग आहे हे पाहण्यासाठी होम फीडच्या माध्यमातून स्क्रोल करावे लागणार आहे. (Threads Vs Twitter)

मेटा थ्रेड्सचे नियम कठोर
थ्रेड्समध्ये इंस्टाग्राम सारखेच कंटेट नियम असणार आहेत. जसे की, लैगिंग कंटेटच्या विरोधात रिपोर्ट करणे, ब्लॉक करणे.

जाहिरात
थ्रेड्स मध्ये जाहिरात दाखवली जात नाहीय. ब्लूमबर्ग यांच्या मते. अधिकाधिक लोकांपर्यंत हे प्रोडक्ट पोहचवण्यासाठी त्यामध्ये जाहिरात दिलेली नाही. तर ट्विटरवर आपल्याला जाहिरात पहायला मिळते.

हेही वाचा- ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर चुकीचे प्रोडक्ट आल्यास असा मिळवा रिफंड

थ्रेडवर अकाउंट कसे तयार कराल?
-सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या प्ले स्टोर किंवा अॅप स्टोर मधून थ्रेड अॅप डाउनलोड करावे लागेल
-त्यानंतर अॅप सुरु करुन ते इंस्टाग्राम अकाउंटला लिंक करावे
-स्क्रिनवर एक मेसेज दिसेल त्यात हे अॅप कसे काम करते हे सांगितले जाईल
-हे अॅप तुम्हाला प्राइव्हेट करायचे आहे की पब्लिक त्यासंदर्भात ऑप्शन ही दाखवला जाईल
-त्याचसबोत तुम्हाला तुमचा बायो आणि फिड डिटेल्स लिहावे लागतील. अथवा तुम्ही इंस्टाग्राम अकाउंटवरुन इंम्पोर्ट करू शकता
-तुमचे सर्व फोलोअर्स जे इंस्टाग्रामवर आहेत ते थ्रेड्सवर येतील. तुम्हाला ऑप्शन दिसेल की त्यांना फॉलो करायचे आहे की नाही
-अकाउंट सेटअ हा जवळजवळ ट्विटर सारखाच आहे
-अकाउंटवर होम, सर्च, न्यू थ्रेड, नोटिफिकेशन आणि प्रोफाइलचे ऑप्शन स्क्रिनवर सर्वात खाली दिसतील
-थ्रेड पोस्ट करताना तुम्हाला मीडिया, फोटो, मिम्स आणि व्हिडिओ शेअर करता येणार आहे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.