या आठवड्याचा विकेंड सत्कारणी लावण्यासाठी आणि मस्त एन्जॉय करत घालवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला उत्तम पर्याय देणार आहोत. घरी बसून उत्तम मनोरंजन करण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात नवीन आलेल्या चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घ्या. त्यासाठी जाणून घ्या या नवीन चित्रपट आणि वेब सिरीजबद्दल.
चित्रपटगृहांमध्ये दणदणीत यश मिळवल्यानंतर आता ‘स्त्री-२’ चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध झाला आहे. हॉरर कॉमेडी असलेला हा सिनेमा तुम्ही नक्कीच पाहू शकता.
‘वाझहा: बायोपिक ऑफ अ बिलियन बॉईज’ हा एक कॉमेडी चित्रपट तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
‘किलर हीट’ हा एक रहस्यमय चित्रपट आहे जो २६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
चित्रपटगृहांमध्ये सरासरी कामगिरी करणारा ‘औरों में कहाँ दम था’ हा एक रोमँस-ड्रामा चित्रपट आहे. हा देखील चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
जर तुम्हाला काहीतरी रंजक आणि हटके पाहायचे असेल तर ‘हनिमून फोटोग्राफर’ ही एक क्राइम वेब सीरिज तुम्ही नक्कीच पाहू शकता. क्राइम मिस्ट्री असलेली ही सिरीज जिओ सिनेमावर ही उपलब्ध आहे.
प्रेम, लग्न आणि नाती यावर गुंतलेल्या चार महिलांच्या आयुष्याच्या अवतीभोवती फिरणारी ‘लव्ह सितारा’ ही सिरीज नक्कीच तुम्ही पाहू शकता. उत्तम अभिनय ही या सिरीजची जमेची बाजू आहे.
‘उल्झ’ हा एक थ्रिलर-ड्रामा चित्रपट आहे. जान्हवी कपूरचा हा स्पाय थ्रिलर चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. यात जान्हवी कपूरसोबत गुलशन देवय्या मुख्य भूमिकेत आहे.
‘ताजा खबर सीझन-२’ ही एक कॉमेडी-थ्रिलर वेब सीरिज आहे. तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर हे पाहू शकता. यात मुख्य भूमिकेत भुवन बाम, जावेद जाफरी, श्रिया पिळगांवकर, देवेन भोजानी, प्रथमेश परब, शिल्पा शुक्ला आदी कलाकार आहेत.
‘नोबडी वॉन्ट्स’ ही एक अमेरिकन रोमँटिक कॉमेडी वेब सिरीज देखील तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. यात क्रिस्टन बेल, ॲडम ब्रॉडी, जस्टिन ल्युप आणि टिमोथी सिमन्स आदी कलाकार आहेत