गावाचा विषय आला की मनात एक वेगळीच प्रतिमा तयार होते. गाव म्हणजे कच्ची घरे, छोटे आणि अरुंद रस्ते, सगळीकडे हिरवळ, रोजगारासाठी पशुधन आणि शेती, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येते. सध्या खेडी, गावं, शहरे, नगरं सर्वच रस्त्यांनी एकमेकांशी जोडले गेले आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या जगात असे एक गाव आहे, जिथे आजही रस्ता नाहीये. या गावात कोणीही कार किंवा बाईक घेत नाही, तर बोट (नाव/होडी) घेतो. या अनोख्या गावात तुम्हाला एकही रस्ता सापडणार नाही. या गावात जाण्यासाठी फक्त पाण्याचा मार्ग आहे. चला जाणून घेऊया जगातील या अनोख्या गावाविषयी. (Giethoorn Village)
जणू पऱ्यांचं गाव!
नेदरलँडमधील या छोट्याशा गावाची जगभरात चर्चा होत आहे. हे गाव दिसायला खूपच सुंदर आहे. या गावात गेल्यावर जणू पऱ्यांच्या गावात पोहोचलोय की काय, असा भास होतो! हे गाव इतकं सुंदर आहे की, इथून नजर हटवणेही कठीण आहे. यामुळे या गावाला नेदरलँडचे व्हेनिस असेही म्हणतात. (Giethoorn Village)
कोणाकडेच नाहीये एकही गाडी
या गावात तुम्हाला एकही रस्ता सापडणार नाही. रस्त्याअभावी स्थानिक लोक एकही गाडी खरेदी करत नाहीत. येथे फक्त बोटी चालतात. प्रवासासाठी लोक केवळ बोटींचा वापर करतात. हे अनोखे गाव पाहण्यासाठी, लोक लांबून लांबून याठिकाणी येतात. हे गाव जगभर प्रसिद्ध आहे. (Giethoorn Village)
हे देखील वाचा: अरे देवा! सोनं चांदी नव्हे, तर ‘या’ ठिकाणी हुंड्यात दिले जातात विषारी साप
प्रत्येक कुटुंबाकडे आहे स्वतःची बोट
आजच्या काळात जगातील प्रत्येक शहरात प्रदूषण पसरले आहे. पण नेदरलँडच्या या गावात प्रदूषणाचे निशाणही नाही. येथे अनेक पूल बनवले गेले आहेत. त्यांच्या खालून जाणारी बोट बरीच मोहक दिसते. या गावात एकूण १८० पूल आहेत. तसेच गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ३०,००० आहे. महत्त्वाचे म्हणजे, या गावात प्रत्येक कुटुंबाची स्वतःची बोट असते. जी ती इकडे तिकडे प्रवास करायला वापरतात. (Giethoorn Village)