Home » लसुणचा ‘हा’ प्रकार असतो आरोग्यासाठी फायदेशीर

लसुणचा ‘हा’ प्रकार असतो आरोग्यासाठी फायदेशीर

by Team Gajawaja
0 comment
Healthy Garlic
Share

ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह आहे, अशांना लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. ब-याचवेळा सकाळी कच्ची खाल्ली जाते, अशामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते, रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत, असे सांगितले जाते. पण आपण जे नेहमी लसूण खातो त्यापेक्षा सातपट औषधी असलेल्या लसणाबद्दल फार माहिती नसते. ही लसूण म्हणजे हिमालयीन लसूण किंवा काश्मिरी लसूण (Healthy Garlic). या व्यतिरिक्तही अन्य नावानं ओळखल्या जाणा-या या लसणाचं वैशिष्ट म्हणजे त्याची फक्त एकच पाकळी असते. हा लसूण काश्मिर आणि हिमालयीन पट्ट्यात पिकवला जातो. जेव्हा हिमालयात जाण्यासाठी फार साधनं नव्हती तेव्हा ट्रेकर या लसणाच्या पाकळ्याचा वापर करायचे असे सांगतात.  त्यामुळे हद्याचे ठोके नियंत्रित राहतात आणि बीपीही नियंत्रणात राहते असे सांगितले जाते. या लसूणावर अभ्यास केल्यावर या एका पाकळीमध्ये अनेक रोगांवर नियंत्रण ठेवण्याचे गुण असल्याचे आढळून आले आहे.(Healthy Garlic)  

कुठलीही भाजी लसूणाचा वापर केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अगदी भारतीयच नाही तर पाश्चात्य पदार्थांतही लसूणाचा भरपूर वापर केला जातो. पण आपण नेहमी जी लसूण जेवणात वापरतो, त्यापेक्षा दुस-या प्रकारच्या लसूणही उपलब्ध आहे. या लसूणला फक्त एकच पाकळी येते. ही लसूण कच्ची खाण्यासाठी वापरली जाते. हिमालयीन लसूण असं नाव असलेली ही लसूण अत्यंत औषधी आहे. ही हिमालयीन लसूण कॅन्सर, मधुमेह, बीपीसह अनेक आजारांवर औषध म्हणून वापरली जाते (Healthy Garlic). हिमालयीन लसूणाचे उत्पादन हिमालयाच्या खो-यात  घेतले जाते. उच्च उंची आणि भौगोलिक स्थितीमुळे या लसूणामध्ये औषधी गुणधर्म जास्त आढळून येतात. या हिमालयीन लसूणला काश्मिरी लसूण, जम्मू लसूण, पोथी लसूण,  हिमालयन सिंगल लवंग लसूण, स्नो लसूण अशा विविध नावांनी ओळखले जाते. वसंत ऋतूमध्ये या लसूणाची कापणी होते. त्याचा रंग साधारण सोनेरी असतो. वर्षातून फक्त एकदाच त्याची लागवड केली जाते. त्यामुळेच हा लसूण अन्य लसूणापेक्षा जास्त किंमतीमध्ये मिळतो. अर्थात अन्य लसूणापेक्षा त्याचे फायदेही सातपट अधिक आहेत. हा लसूण चवीला तिखट असतो. या हिमालयीन लसूणमध्ये मॅंगनीज, तांबे, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी तसेच सेलेनियम आणि फॉस्फरस यांचा चांगला साठा असतो. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी 1 याचे प्रमाणही या लसूणामध्ये असते. या व्यतिरिक्त, या लसूणमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी याचा चांगला फायदा होतो, असे सांगतात. आता या लसूणाचे पिक मर्यादित कालावधीत घेण्यात येत असले तरी हा लसूण वर्षभर उपलब्ध असतो. आता हा हिमालयीन लसूण ऑनलाईनही सुलभरित्या मिळू शकतो. मात्र त्याची निवड करताना ही लसणाची पाकळी मोठी असेल याची काळजी घ्यावी लागते (Healthy Garlic).  

=======

हे देखील वाचा : CICO Diet म्हणजे काय तुम्हाला माहितेय का?

=======

हिमालयीन लसूण कच्ची आणि शिजवलेली अशा दोन्हीही स्वरुपात वापरली जाते. मात्र ही लसूण साठवण्यासाठी त्याची बरीच काळजी घ्यावी लागते. लसूणाला बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यासाठी त्याला हवेशीर जागेवर ठेवण्यात यावे, असे सांगण्यात येते. या लसूणाचा उल्लेख काही ग्रंथांमध्येही आहे. हिमालयात जाणारे गिर्यारोहक या लसूणाचा वापर औषध म्हणून करत असत (Healthy Garlic). हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये चढणारे गिर्यारोहक रक्ताभिसरण राखण्यासाठी, ऑक्सिजनची क्षमता वाढवण्यासाठी आणि उर्जेची पातळी वाढवण्यासाठी हा हिमालयीन लसूण खात असत. हिमालयीन लसूण शरीरातील उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास फायदेशीर ठरतो. याबाबत केलेल्या  संशोधनात असे दिसून आले आहे की, हा लसूण नियमित खाल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होते. शक्यतो सकाळी उठल्यावर, पोट रिकामं असतांना या लसूणाची पाकळी खाल्ली जाते. यामुळे कफाचे प्रमाणही कमी होते. तसेच खोकल्याचा त्रास असेल तरीही हा लसूण फायदेशीर पडतो. या लसूणामध्ये ट्रायसल्फाइड नावाचे ऑर्गेनोसल्फर संयुग असते जे शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात, असे सांगण्यात येते. यासंदर्भात नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात संशोधन करण्यात आले आहे. त्यात या लसूणाचे नियमित सेवन केल्यास कर्करोग होण्याची शक्यता निम्म्यानं तरी कमी होते. तसेच रक्तातील साखरेची पातळीही कमी होऊन नियंत्रणात राहते. या लसणाचे नियमित सेवन करणाऱ्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोकाही कमी असल्याचे सांगण्यात येते. एकूण हा हिमालयीन लसूण म्हणजे अत्यंत गुणकारी आहे.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.