Home » दोन्ही धर्मियांना बांधून ठेवणारे ‘हे’ मंदिर

दोन्ही धर्मियांना बांधून ठेवणारे ‘हे’ मंदिर

by Team Gajawaja
0 comment
Temple
Share

भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीबाबत आपण अनेक गोष्टी ऐकतो. या फाळणीतून या दोन्ही देशातील नागरिकांच्या मनाचीही फाळणी झाल्याचे बोलले जाते.  मात्र पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये असे एक मंदिर आहे, जे या दोन्ही धर्मियांना बांधून ठेवत आहे.  हे आहे हिंगलाजमाता मंदिर. (Temple) 

बलुचिस्तानच्या लास बेला टाउनमध्ये असलेले हिंगलाज मंदिर, बलुचिस्तानमध्ये राहणा-या हिंदुसाठी अतिशय पवित्र असे मंदिर आहेच, शिवाय भारतातही या देवीचे अनेक भक्त आहेत. हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी प्रमुख मंदिर असल्याची हिंदू भक्तांची भावना आहे. माता सतीचे मस्तक या ठिकाणी पडल्याचे भक्त सांगतात.  या मंदिरात दरवर्षी नवरात्रौत्सव आणि श्रावणात मोठा उत्सव करण्यात येतो. या उत्सवासाठी स्थानिक हिंदू मोठ्या संख्येनं या मंदिरात पोहचतात. या मंदिराचा (Temple) संपूर्ण रस्ता हा अतिशय धोकादायक आहे.  भक्तांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागते.  वाळवंटी भागही ओलांडावा लागतो.  तसेच या भागात दहशतवाद्यांचेही वास्तव्य आहे.  या सर्व अडचणींचा सामना करत देवीचे भक्त मंदिरात पोहचतात. आता देवीच्या मंदिरात श्रावण महिन्यात विशेष पुजा चालू आहेत.  हिंगलाज शक्तीपीठ सिंध, पाकिस्तानमध्ये आहे.  या मंदिरापर्यंत पोहोचणे हे भक्तांसाठी खूपच आव्हानात्मक आहे.  अमरनाथच्या यात्रेसारखाच या हिंगलाज माता मंदिराचा प्रवास अतिशय कठीण आहे. (Temple) 

मंदिरात (Temple) जाण्यासाठी भाविक 1000 फूट उंचीच्या पर्वतरांगा पार करतात. हा डोंगर म्हणजे एक मोठ्या वाळवंटसारखा आहे.  येथील काही भागात घनदाट जंगलही आहे.  त्यातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीतीही भाविकांना असते.  शिवाय मुख्य म्हणजे, बलुचिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांकडूनही भाविकांना मोठी भीती असते.  या मंदिरावर अनेकवेळा दहशतवादी हल्ले झाले आहेत.  तरीही बलुचिस्तानमधील हिंदू भक्त या सर्वांवर मात करत मातेच्या दर्शनाला जातात. बलुचिस्तानमध्ये राहणारे मुस्लिमही हिंगलाज मंदिराकडे मोठ्या आदराने पाहतात.  या मंदिरात स्थानिक मुस्लिमही वंदन करण्यासाठी येतात. त्यामुळे दोन्ही धर्मियांना जोडणारी देवी म्हणून हिंगलाज मातेची ओळख झाली आहे.  हिंगलाज मंदिराला स्थानिक मुस्लिम नानी मंदिर(Temple) असेही म्हणतात.  

हिंदू भाविक या मंदिराला (Temple) बलुचिस्तानचे वैष्णोदेवी धाम म्हणतात.  हिंगलाज मंदिर हिंगोळ नदीच्या काठावर आहे. माता सतीचे मस्तक या किर्थर पर्वतावर पडले आणि तेव्हापासून हा भाग हिंगलाज म्हणून ओळखला गेला.  स्वतः प्रभू रामांनीही या मातेचे दर्शन घेतल्याची आख्यायिका आहे.  रावणाचा वध केल्यावर प्रभू रामांनी हिंगलाज मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले होते. दरवर्षी एप्रिल महिन्यात, श्रावणात आणि नवरात्रौमध्ये मातेचा उत्सव साजरा करण्यात येतो. यासर्व सोहळ्यामध्ये या भागातील हजारो भाविक सहभागी होतात. नवरात्रीच्या काळात येथे सिंधी समाजातील भाविक मोठ्या संख्येने येतात.  गुहेत असलेल्या या मंदिराला स्थानिक मुस्लिम नानी का हज म्हणत  भेट देतात. हिंगलाज माता मंदिर एका छोट्या नैसर्गिक गुहेत बांधलेले आहे. मंदिरात मातीची वेदी बांधली आहे.  देवीची प्रतिमा मानवनिर्मित नसून स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते.(Temple)

=========

हे देखील वाचा : गुप्त काळातील पंचमुखी शिवलिंग…

=========

भाविक लहान आकाराची एक अन्य प्रतिमा हिंगलाज माता म्हणून पूजतात.  या दगडावर सिंदूर लावण्यात आला असून त्याला स्थानिक भाषेमध्ये हिंगुला असेही म्हणतात.  या भागातील मुस्लिमांचीही हिंगलाज मातेवर श्रद्धा असून ते मंदिराला (Temple) सुरक्षा देतात.  स्थानिक मुस्लिम जमाती, प्राचीन परंपरेनुसार, यात्रेत सामील होतात. या देवीला हिंगलाज देवी किंवा हिंगुला देवी म्हणूनही ओळखले जाते.  हिंगलाज माता मंदिराच्या आसपास,  श्री गणेश देव, माता काली, गुरु गोरख नाथ धुनी, ब्रह्मा कुंड, तिर कुंड, गुरु नानक खाराव,  चोरसी पर्वतावरील अनिल कुंड, चंद्र गोप, खरीवार आणि अघोर पूजा यांसारखी इतर अनेक प्रार्थनास्थळे या भागात आहेत.  ही सर्व प्रार्थनास्थळे सध्या अतिशय खराब अवस्थेत आहेत.  त्यांची निगा राखणे या भागातील हिंदूंसाठी मोठे जिकरीचे काम आहे.  तरीही या सर्व भागाची आणि मंदिराची शक्य असेल तेवढी काळजी हिंदू समाजाकडून घेतली जाते.  अत्यंत बिकट परिस्थितीत देवीची पूजा आणि उत्सव केली जाते.  याबाबत या भागातील हिंदू समाजाचे खूप कौतक होत आहे.  हिंगलाज माता ही सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी एक शक्तिशाली देवी मानली जाते. आता या देवीची श्रावण महिन्यातील पूजा चालू आहे. 

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.