Home » ३३ कोटी देवी-देवतांचे हे मंदिर

३३ कोटी देवी-देवतांचे हे मंदिर

by Team Gajawaja
0 comment
Raghunath Temple
Share

उत्तरप्रदेशच्या अयोध्येत राम मंदिर झाल्यावर लाखो रामभक्त अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेत आहेत. मात्र जम्मू येथेही एक राममंदिर आहे जिथे प्रभू रामचंद्रांसह ३३ कोटी देवी देवतांचे वास्तव्य असल्याची भावना भक्तांमध्ये आहे.  १८३५ मध्ये बांधल्या गेलेल्या या मंदिरात रोज हजारो भक्त प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जातात.  २००२ साली या मंदिरावर अतिरेक्यांनी या मंदिरावर ग्रेनेटद्वारे हल्ला केला.  यात अनेक भाविकांचा मृत्यू झाला.  पण अतिरेक्यांचा हा हल्ला प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्तांना रोखू शकला नाही.  कारण या मंदिरात येणा-या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. (Raghunath Temple)

हे मंदिर म्हणजे, जम्मूमधील रघुनाथ मंदिर. भगवान रामांच्या या मंदिराची स्थापना झाली तेव्हा जम्मू काश्मिरमध्ये डोगरा शासन काळ होता. तेव्हा काश्मिरमध्ये मंदिरामधून शिक्षण संस्था चालत असत. अशाच प्रकारची संस्कृत शाळा या मंदिरात चालत असल्याची माहिती आहे.  काश्मिरमध्ये अनेक स्थित्यांतरे झाली तरी जम्मू मधील या रघुनाथ मंदिरावरील श्रीरामभक्तांची श्रद्धा कमी झाली नाही.  यावर्षी या मंदिरात सर्वाधिक भक्तांनी भेट दिल्याची नोंद झाली आहे.  

जम्मूमधील रघुनाथ मंदिर हे भगवान श्री रामांचे भव्य मंदिर आहे.  २००२ मध्ये या मंदिरावर एकदा नव्हे तर दोनदा ग्रेनटेद्वारे हल्ला झाला.  मात्र भाविकांना हा हल्ला रोखू शकला नाही.  भारतातील फार कमी मंदिरांमध्ये ३३ कोटी देवांचे दर्शन घेता येते.  त्यातील एक प्रमुख मंदिर म्हणजे, श्री रगुनाथ मंदिर आहे.  रघुनाथ मंदिर १८३५ मध्ये पहिले डोगरा शासक महाराजा गुलाब सिंग यांनी बांधायला सुरुवात केली.  त्यांचा मुलगा महाराजा रणबीर सिंग यांनी १८६० मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण केले.  हे मंदिर जम्मू शहराच्या जुन्या भागात तवी नदीच्या उत्तरेस स्थित आहे.  या मंदिरात भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, त्यामुळे मंदिराची इच्छापूर्ती मंदिर म्हणूनही ओळख आहे. (Raghunath Temple)

याबाबत एक कथा सांगितली जाते, त्यानुसार रघुनाथ मंदिराच्या बांधकामासाठी महाराजा गुलाबसिंग यांना रामदास वैरागी यांनी आदेश दिला होता.  रामदास वैरागी यांच्याकडे महाराजा गुलाबसिंग यांनी प्रार्थना केली होती, त्यानुसार वैरागी यांनी मंदिर बांध तुझी इच्छा पूर्ण होईल, असे महाराजांना सांगितले.  मंदिर बांधण्याची सुरुवात झाली आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली. तेव्हापासून या मंदिराला इच्छापूर्ती मंदिर म्हणून ओळख मिळाली.  हे मंदिर प्रभू श्रीरामांचे असले तरी या मंदिराच्या परिसरात अनेक देवतांची मंदिरे आहेत.   मंदिराच्या आतील तीन भिंती सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेल्या आहेत. मुख्य मंदिराचा दरवाजा चांदीचा आहे.  हे सर्व काम जयपूरच्या कारागिरांनी तीन महिन्यांत तयार केल्याची माहिती आहे. (Raghunath Temple)

================

हे देखील वाचा : Vastu Tips : घरात लाकडाचा देव्हारा असेल तर वास्तू शास्रानुसार हे 5 नियम लक्षात ठेवा

================

या भव्य मंदिराला अनेक कोनाडे आहेत.  मंदिरांच्या दगडी भिंतींमधील कोनाडे हे सूर्य आणि भगवान शंकर यांच्यासह अनेक देवदेवतांच्या मुर्तींनी सजलेले आहे.  सुमारे ३०० मुर्ती या मंदिरातच आहेत.  शिवाय प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा जीवनपटही मंदिरामध्ये चित्रांद्वारे उलडण्यात आला आहे.  प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या विवाहसोहळ्याची चित्रेही काढण्यात आली आहेत.  मंदिरात वेगवेगळी चित्रे आहेत.  त्यात चित्रे रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेच्या कथांवर आधारीत चित्रेही आङेत.  याच रघुनाथ मंदिरात अन्य सात मंदिरही आहेत. मुळ रघुनाथ मंदिर हे अष्टकोनी आकारात फूट उंच अशा दगडावर बांधण्यात आले आहे. मुख्य मंदिर प्रवेशद्वारापासून ५० फूट अंतरावर आहे.  या मंदिराचा परिसर अतिशय भव्य आहे.  त्याला बंदिस्त करण्यात आले आहे.  मंदिरावर झालेल्या हल्ल्यांमुळे मंदिराच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात येते. (Raghunath Temple)

त्य़ामुळेच मंदिराभोवती एक भक्कम भिंत उभारण्यात आली आहे.  रघुनाथ मंदिराच्या अंगणात निवासी इमारती आहेत.  शिवाय येथे गायींचे गोठेही आहेत.  याशिवाय या मंदिर संकुलात एक शाळा आणि ग्रंथालयही आहेत.  या ग्रंथालयात अनेक दुर्मिळ अशा ग्रंथांचे जतन करण्यात आले आहे.  ज्यामध्ये शारदा लिपीतील संस्कृत हस्तलिखितांचा समावेश आहे.   तसेच भारतीय भाषांमधील ६००० हून अधिक हस्तलिखिते जतन येथे करण्यात आले आहे.  या रघुनाथ मंदिरातील ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी जशी मंदिरात गर्दी असते, तशीच अनेक अभ्यासू या ग्रंथालयातील अनमोल ग्रंथखजिना बघण्यासाठी परदेशातूनही येतात.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.