भारतात प्रत्येक काळात एक महापुरुष जन्माला आला आहे. मग तो प्राचीन काळ असो, मध्ययुगीन काळ असो, स्वातंत्र्यसंघर्षाचा काळ असो किंवा आजचा आधुनिक काळ... भारताला ज्या ज्या वेळी गरज होती, त्या त्या वेळी एक महान व्यक्तिमत्त्व भारतात जन्माला आलं आहे. असेच दोन भारतात जन्मलेले अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे तथागत गौतम बुद्ध आणि शहीद भगत सिंग… तसं तर दोघांचाही संघर्ष वेगवेगळा, एकाचा शांतीचा आणि एकाचा क्रांतीचा ! पण दोघांमधील एक साम्य म्हणजे दोघांच्याही जन्माआधी त्यांच्या पुढील आयुष्याबाबत भविष्यवाणी करण्यात आल्या होत्या आणि त्या अगदी तंतोतंत खऱ्या ठरल्या. याचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध अँड हिज धम्म’ आणि यादवेंदर सिंग संधू म्हणजेच भगत सिंग यांचे नातू असलेल्या ‘भगत सिंग जेल डायरी’ या पुस्तकांमध्ये नमूद आहे. मुळात हे दोन असे महापुरुष आहेत, ज्यांचा भविष्यवाणी सारख्या गोष्टीवर कधीही विश्वास नव्हता. दोघांनी पुनर्जन्म आणि देव या सर्व गोष्टीदेखील नाकारल्या होत्या. मात्र तरीही त्यांच्या आयुष्यात या घटना घडल्या याला पुरावेसुद्धा आहेत. आज दोघांचं हेच साम्य जाणून घेऊ.(Gautam Buddha and Bhagat Singh)
तथागत गौतम बुद्धांच्या जन्माची कथा अशी सांगितली जाते की, एकदा माता महामाया यांच्या स्वप्नात सुमेध नावाचा बोधिसत्व आला आणि त्याने महामाये पोटी जन्म घेण्याची इच्छा प्रकट केली. यावर महामायेने होकार दिला. मात्र स्वप्नाचा अर्थबोध न लागल्याने राजा शुद्धोधन म्हणजेच गौतम बुद्ध यांचे वडील यांनी स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या आठ ब्राह्मणांना बोलावलं आणि या स्वप्नांचा अर्थ समजून घेतला. यावर ब्राम्हण म्हणाले.(History)
‘राजा चिंता करू नकोस, तुला एक असा पुत्र होईल की, जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसारत्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधःकार नाहीसा करणारा बुद्ध होईल. आणि यानंतर ख्रिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला या जगातल्या सर्वात महान मानवांपैकी एक म्हणजेच तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. याशिवाय समकालीन असित ऋषी यांनीही बाल सिद्धार्थ यांना पाहून ‘या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे’, असे उद्गार काढले होते. (Gautam Buddha and Bhagat Singh)
आता भगत सिंग यांच्या जन्माबद्दल जाणून घेऊ. भगत सिंग यांचा जन्म सरदार किशन सिंह आणि विद्यावती कौर (Kishan Singh and Vidyawati Kaur) यांच्या पोटी 28 सप्टेंबर 1907 रोजी झाला होता. याच दिवशी ब्रिटिशांविरुद्ध लढत असलेले त्यांचे वडील आणि काका अजित सिंह हे तुरुंगातून बाहेर पडले होते. यावेळी भगत सिंह यांच्या आजी जयकौर यांच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं ते म्हणजे ‘ए मुंडा तो बडा भागा वाला है’! त्यामुळे या गोष्टीशी मिळते जुळते असलेले नाव म्हणजेच ‘भगत’ हे त्यांच्या आजीनेच ठेवलं होतं. बालपणीच एका ज्योतिषाने भगत सिंग यांच्याबाबत एक भविष्यवाणी केली होती की, ‘सरदार किशन सिंग का बेटा या तो फाँसी के फंदे पे चढेगा या फिर गले में नौ लखा हार पेहनेगा’! यावरूनच कळून येतं की भगत सिंग यांच्याबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली. (Information)
दोघांनीही आपल्या आयुष्यात सर्व गोष्टींचा आणि आपल्या कुटुंबाचा त्याग केला होता. बुद्धांनी दुःखाचे मूळ कारण शोधण्यासाठी केलेली तडफड तर भगत सिंह यांनी क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी केलेला त्याग ! बुद्धांनी शांतीचा अवलंब करण्यासाठी आणि ध्यानामध्ये तल्लीन होण्यासाठी केलेला अन्नत्याग आणि भगत यांनी तुरूंगात आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केलेलं १०० पेक्षा जास्त दिवसांचं ऐतिहासिक उपोषण ! दोघांचा काळ वेगळा पण ध्येय एकच ‘क्रांती’ !(Gautam Buddha and Bhagat Singh)
============
हे देखील वाचा : YouTube कडून रणवीर अलाहाबादियाचा व्हिडीओ डिलीट, कधी काढला जातो प्लॅटफॉर्मवरुन कंटेट?
============
भगत सिंह यांनी जरी साँडर्स या ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याला मारून हिंसा केली असेल मात्र त्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, ‘बम और पिस्तौल से क्रांती नहीं आती, क्रांती की तलवार विचारों की सान पर तेज होती है’! त्यामुळे त्यांचं हिंसेला कधीही समर्थन नव्हतं. मुळात हिंसा ही आत्म रक्षणासाठीच करावी, हेच त्यांनी नेहमी सांगितलं.