Home » २० आणि २१ जून रोजी हा नजारा बघता येणार

२० आणि २१ जून रोजी हा नजारा बघता येणार

by Team Gajawaja
0 comment
Moon
Share

गेल्या दोन महिन्यात अनेक खगोलीय घटना घडत आहेत.  या घटना वैशिष्टपूर्ण असून पुढील अनेक वर्षात अशा घटना प्रत्यक्ष डोळ्यांना बघता येणार नाहीत. नुकतीच सहा ता-यांची अनोखी परेड अवकाशात पाहता आली.  लाखो नागरिकांनी ही परेड बघितली.  तशीच एक वैशिष्टपूर्ण घटना आता अवकाशात घडणार आहे.  २० आणि २१ जून रोजी हा नजारा बघता येणार आहे.  ही घटना म्हणजे, स्टॉबेरी मून असणार आहे.  म्हणजेच अवकाशात दिसणारा चंद्र हा स्ट्रॉबेरी च्या रंगातील असणार आहे.  या चंद्राला स्टॉबेरी मून आणि हनी मून असेही म्हणतात. (Moon)

२१ जून रोजी पौर्णिमा असून त्यादिवशीचा पूर्ण चंद्र हा स्ट्रॉबेरी मून असणार आहे. या दिवशी, चंद्राचा रंग हलका पिवळा आणि हलका लाल असणार आहे.  पृथ्वीवरुन हा रंग स्ट्रॉबेरीसारखा दिसेल.  याशिवाय या दिवशी चंद्रप्रकाश देखील तेजस्वी असणार आहे.  चंद्राचा प्रकाश इतका तेजस्वी असेल की जणू तो दिवस आहे, असा भास होईल. या घटनेला स्ट्रॉबेरी मूनम्हणतात. चंद्र फिकट गुलाबी रंगाचा असेल आणि या दिवसापासून युरोप आणि अमेरिकेत उन्हाळा सुरू होईल.  २० आणि २१ जून रोजाची ही खगोलीय घटना बघण्यासाठी अनेक खगोलप्रेमी उंच ठिकाणांवर गर्दी करीत आहेत.  

जून महिन्यातील २१ जून ही तारीख खगोलशास्त्रज्ञांसाठी अभ्यासाची ठरणार आहे.  या दिवशी पौर्णिमा आहे.  हा पूर्ण चंद्र रात्री आकाशात आल्यावर त्याचा रंग हा स्ट्रॉबेरीसारखा असणार आहे.  या घटनेला स्ट्रॉबेरी मून म्हणतात.  या दिवशी चंद्र नेहमीच्या पेक्षा अधिक तेजस्वीही दिसणार आहे.  चंद्राचा हा तेजस्वी प्रकाश २० जूनपासूनच दिसणार आहे.  २२ जून पर्यंत हा स्ट्रॉबेरी मून अवकाशात दिसणार आहे.  गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तीन तीनही दिवसात चंद्र अधिक तेजस्वी असणार आहे.  खगोलीय शास्त्रानुसार ही महत्त्वाची घटना आहे. (Moon)

या घटनेला स्ट्रॉबेरी मून हे नाव अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी दिले आहे. या महिन्यात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी येतात.  त्यावरुन नाव देण्यात आल्याचे काहींचे सांगणे आहे.  जून महिन्यात येणा-या पौर्णिमेला अमेरिकेमध्ये  बेरी मून, ग्रीन कॉर्न मून आणि हॉट मून असेही बोलण्यात येते.  अनिशिनाबेग किंवा ओजिब्वे, ग्रेट लेक्स प्रदेशातील स्थानिक लोक याला वाबिगोनी गिजिस म्हणून ओळखतात.  अनेक युरोपीय देशांमध्ये स्ट्रॉबेरी मूनला हनी मून म्हणूनही ओळखले जाते.  कारण पौर्णिमेच्या आसपास मधाचे पोळे काढण्यात येते.  त्यामुळे याला हनी मून असेही म्हणतात. तथापि, चंद्राच्या या सर्व नावांचे कोणतेही वैज्ञानिक कारण मात्र नाही.  यातही स्ट्रॉबेरी मून या नावानं जूनमधील पौर्णिमेला अधिक संबोधण्यात येते.  युरोप खंडातील उत्तरेकडील देशांमध्ये चंद्र उगवताना लाल रंगाचा दिसेल. जेव्हा चंद्र आकाशात खूप कमी दिसतो तेव्हा असे होण्याची शक्यता जास्त असते. जसजसे ते वर जाईल तसतसे ते गुलाबी रंगाचे होईल. नासानेही याला दुजोरा दिला आहे. 

================

हे देखील वाचा : म्यानमारच्या राजकरणात भारत सरकारची एन्ट्री

===============

भारतासह संपूर्ण आशिया खंडात पौर्णिमा शुक्रवारी आहे. या काळात सूर्यास्तानंतर पूर्वेला तेजस्वी प्रकाश किरणांसह चंद्र उगवेल.  यानंतर, पुढील पौर्णिमा २१ जुलै २०२४  रोजी आहे.  त्या दिवशी चंद्र  २१ जूनच्या तुलनेत किंचित कमी तेजाने अवकाशात दिसेल.  मात्र ही सगळी परिस्थिती भारतातील हवामानावर अवलंबून रहाणार आहे.  सध्या भारतातील बहुतांश भागात पावसाळी वातावरण आहे.  जर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी पावसाळी ढगांनी भरलेले आकाश असेल तर हा स्ट्रॉबेरी मून बघता येणार नाही. (Moon)

त्यामुळेच भारतातील खगोलशास्त्रज्ञ स्ट्रॉबेरी मून बघण्यासाठी जिथे पावसाळी वातावरण नाही, अशा ठिकाणी जात आहेत.  या खगोलीय घटनेचे ज्योतिष शास्त्राच्या अनुशंगाने काही परिणाम आहेत का, यावरही चर्चा सुरु आहेत.  काहींच्या मते चंद्राचा रंग लाल होणे म्हणजे, ते देशावरील मोठ्या संकटाचे सूचक असते.  काही ज्योतिषी याचा संबंध जगभरातील युद्धांना जोडत आहेत.  या दिवासात आणखी काही देशांना युद्ध प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  प्रत्यक्षात स्ट्रॉबेरी मून ही खगोलीय घटना असून त्यादिवशीचा चंद्राचे सौदर्य बघणे ही वेगळी अनुभूती आहे.  या घटनेकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून बघावे असे आवाहन करण्यात आले आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.