कर्करोग हा एक धोकादायक आणि प्राणघातक आजार मानला जातो. कर्करोग झाल्यावर आयुष्यच संपत असे रोग्याला वाटतं. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. तशीच त्याची अनेक कारणंही आहेत. वेळीच कर्करोगाचं निदान झालं तर त्याच्यावर उपाय करणं शक्य असतं आणि रोग्याला वाचवण्यातही डॉक्टरांना यश येतं हे स्पष्ट झालं आहे. यासाठी हळद (Turmeric) मदतीला येते. कर्करोगासारख्या आजारावर मात करण्यासाठी किंवा असा आजार होऊ नये यासाठी सकस आहाराचा समावेश करावा लागतो. या आहारात हळदीचा (Turmeric) वापर केला असल्यास निरोगी जीवनशैलीसाठी तो फायदेशीर ठरतो, हे स्पष्ट झालं आहे. हळदीमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात आणि कर्करोगाच्या पेशी मारण्याची क्षमता असते. हळदीमध्ये (Turmeric) अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. ज्यामुळे कर्करोगापासून संरक्षण होते. कर्करोगाशी लढण्यासाठी हळद उपयोगी ठरत आहे.
मेयोक्लिनिकच्या अहवालानुसार, हळदीमध्ये (Turmeric) कर्क्यूमिन नावाचा गुणधर्म आढळतो. या गुणधर्मामुळे हळदीचा उपयोग औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. हळदीच्या पावडरमध्ये कर्क्यूमिन नावाचे मुख्य संयुग असते. वास्तविक कर्क्यूमिन हा हळदीचा विशेष गुणधर्म आहे ज्याचा वापर औषध म्हणून आणि त्वचेशी संबंधित उत्पादने तयार करण्यासाठी केला जातो. कर्क्युमिन कर्करोगास प्रतिबंध करण्यास किंवा त्यावर उपचार करण्यास मदत करू शकते.
अहवालानुसार, हळदीमध्ये (Turmeric) आढळणारे कर्क्युमिनमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात.जळजळ आणि सूज आणि जळजळ कमी करण्यास त्याचा उपयोग होतो. शरीरात जळजळ होणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्याच्यावरच हळदीनं (Turmeric) उपचार झाल्यास शरीरात कर्करोगाचा फैलाव होण्यास प्रतिबंध घातला जातो, अशा निष्कर्ष आहे. यासंदर्भात अनेक प्रयोग करण्यात आल्यावर हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन हे संयुग कर्करोगास प्रतिबंध करू शकते. हे कर्करोगाचा प्रसार कमी करू शकते आणि केमोथेरपी अधिक प्रभावी बनवू शकते. असे स्पष्ट करण्यात आले आहे.
========
हे देखील वाचा : ‘या’ प्राण्यांचे दूध मानले जाते औषधी
========
कर्क्यूमिन फुफ्फुस, स्तन, प्रोस्टेट आणि कोलन या प्रकारच्या कर्करोगावर औषध ठरु शकते. यासर्वांसाठी हळदीचे सेवन कसे करावे याबाबतही काही नियम आहेत. स्वयंपाकघरात हळद (Turmeric) नित्यानं वापरली जाते. मात्र हळद तेलावर टाकून जास्त परतली आणि तिचा रंग बदलला तर त्याचा हवा तेवढा फायदा होत नाही. हळद तेलावर जळेल एवढी भाजू नये. हळदीचा एक सौम्य सुगंध असतो. स्वयंपाकात हळदीचा वापर करताना तो सुगंध जपायला हवा, तेव्हाच त्यातील औषधी गुणधर्म शरीराला उपयोगी ठरतील. गरम पाण्यात, दुधामध्ये अगदी मधातही टाकून हळद घेतली जाते. हल्ली बाजारात हळदीच्या कॅप्सूलही मिळतात.मात्र त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्यावा. कारण हळदीच्या सेवनाचे जसे फायदे आहेत, तसेच जास्त प्रमाणात हळद घेतली तर त्याचे दुष्परिणामही आहेत.
सई बने