Home » Skin Care : या नवरात्रीमध्ये चमकदार त्वचा मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Skin Care : या नवरात्रीमध्ये चमकदार त्वचा मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

by Jyotsna Kulkarni
0 comment
Skin Care
Share

लवकरच नवरात्र सुरु होत आहे. आता नवरात्र म्हणजे पूजा, घटस्थापना सोबतच येतो तो गरबा आणि दांडिया. नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये रात्री देवीसमोर गरबा आणि दांडियाचा रास खेळायचा आणि देवीची उपासना करायची. मात्र आता याच गरब्याला आणि दांडियाला ग्लॅमरचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता गरबा आणि दांडिया खेळायला जाताना सर्वच महिला, मुली छान तयार होऊन मस्त वेशभूषा करून, मेकअप करून गरबा रास खेळायला जातात.

आपली त्वचा उत्सवाच्या तोंडावर स्वच्छ, तजेलदार आणि चमकणारी असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करून घे शक्य नसते. तुमच्या याच समस्येवर आम्ही काही सोपे उपाय घेऊन आलो आहोत. हे उपाय तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी सहज करू शकता. यामुळे तुमचा वेळ तर वाचेल सोबतच पैसे देखील वाचतील. आणि मुख्य म्हणजे हे उपाय करून तुम्ही नवरात्रीमध्ये अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसाल. त्वचेला चकाकी देण्यासाठी सोपे उपाय पाहूया. (Navratri 2025)

* कच्चे दूध चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा आणि नंतर चेहरा धुवा. यामुळे त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळेल. कच्च्या दुधात प्रथिने, कॅल्शियम असतात. हे चेहऱ्यावर चमक आणते. (Skin care)

* एक चमचा दुधामध्ये लिंबाचा रस आणि टोमॅटो मिसळून पेस्ट बनवा. हे पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि नंतर धुवा. यामुळे त्वचा चमकदार दिसेल.

* टॅनिंग काढून टाकण्यासाठी दही खूप फायदेशीर आहे. ३० मिनिटांसाठी दही चेहऱ्यावर लावा आणि नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर दोन तास चेहऱ्यावर काहीही लावू नका. (Todays marathi Headline)

Skin Care

* तुमच्या सकाळच्या स्किनकेअर रूटीनमध्ये व्हिटॅमिन सी सीरमचा समावेश करा. व्हिटॅमिन सी हे एक उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट आहे जे त्वचेला पुनरुज्जीवित करते आणि उजळवते. तुमच्या त्वचेला ताजेतवाने वाटण्यासाठी आणि दिवसभर नैसर्गिक चमक ठेवण्यासाठी. (Marathi News)

* चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्यावर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर चमक वाढेल. गुलाबाचे पाणी चेहऱ्याला लावल्याने चेहरा ताजा दिसतो. (Latest Marathi Headline)

* कोरफडमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात. ते चेहर्‍यावरील अनेक समस्या दूर करतात. चेहऱ्यावर कोरफड लावा आणि थोडावेळ तसेच ठेवा. यानंतर चेहरा धुवा. यामुळे चेहर्‍यावर ओलावा येतो.

* एक चमचा हळद आणि दोन चमचे बेसन पीठ घ्या. त्यात एक चमचा मलई आणि थोडे दूध मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. बेसन पिठात दहीदेखील मिसळू शकता. (Top Marathi News)

* उत्सवाच्या काळात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी प्या. पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होते. जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर चेहरा निर्जीव दिसतो. त्यामुळे या महिन्यात त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी प्यावे.

* अनेकांना वाटत असते की, मॉइश्चरायझर फक्त हिवाळ्यातच लावावे. पण हे चुकीचे आहे. हे त्वचेला हायड्रेट ठेवते तसेच पोषण देते. जर तुमची तेलकट त्वचा असेल तर तुम्ही पाणी किंवा जेल आधारित मॉइश्चरायझर वापरू शकता. (Latest Marathi News)

========

Navratri : ए हालो! नवरात्रीत गरबा खेळण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

========

* फेस्टिव्हल रेडी ग्लोसाठी एक्सफोलिएशन आवश्यक आहे. त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी तुम्ही ओटचे जाडे भरडे पीठ, मध आणि कॉफी मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता. हे लावल्याने त्वचा तजेलदार दिसेल. (Top Trending News)

* लिंबाचा रस आणि त्यात मध घालून त्याचा तयार झालेला पॅक चेहऱ्यावर लावावा. लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे त्वचेचा रंग उजळवतात. मध त्वचेला मऊ आणि हायड्रेट करते. हा फेस मास्क आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावावा. यामुळे तुमची त्वचा केवळ चमकदार होणार नाही तर काळे डागही कमी होतील आणि तुमची त्वचा ताजी वाटेल. (Social News)

(टीप: वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय वापरण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.