Home » मराठी चित्रपटसृष्टीत बनलेला ‘हा’ सर्वोत्तम राजकीय सिनेमा.

मराठी चित्रपटसृष्टीत बनलेला ‘हा’ सर्वोत्तम राजकीय सिनेमा.

by Team Gajawaja
0 comment
Political cinema
Share

मराठी चित्रपटसृष्टीत बनलेला सर्वोत्तम राजकीय सिनेमा (Political cinema). चित्रपटाला चव्वेचाळीस वर्ष उलटून गेली तरी या चित्रपटातील प्रत्येक डायलॉग, प्रत्येक सिन आजच्या काळात देखील तेवढाच संदर्भ टिकवून आहे. अनेक प्रतिभावान कलाकारांची मुठ बांधून दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी हा राजकीय थरारपट पडद्यावर मांडला. या चित्रपटाच्या निर्मिती संदर्भात बोलताना दिग्दर्शक जब्बार पटेलांनी अनेक आठवणी सांगितल्या.

सिनेमातील बरेचशे सिन्स मंत्रालयात घडणारे होते. यासाठी जब्बार पटेल यांना मंत्रालयाची गरज होती. सेट वगैरे बांधून शूट करण त्यांना परवडणार नव्हत. ते भयंकर चिंतेत होते. विजय तेंडुलकरांनी त्यांना त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्र्याकडून फारशी अपेक्षा नसताना देखील जब्बार पटेल त्यांना भेटायला गेले. शरद पवारांनी त्याचं हसतमुखाने स्वागत केलं. जब्बार पटेलांनी त्यांना आपल्या सिनेमाविषयी सांगितलं आणि मंत्रालयात शूटिंग करायची इच्छा दर्शवली. शरद पवारांनी स्क्रिप्ट मागवून घेतली आणि स्क्रिप्ट वाचून कळवतो म्हणून सांगितलं. त्यांनी मागवून घेतलेली ती स्क्रिप्ट आपल्या मुख्य सचिवांकडे सुपूर्द केली. त्यानंतर त्यांनी जब्बार पटेलांना भेटण्यासाठी बोलावलं.(Political cinema)

जब्बार पटेल, शरद पवार आणि मुख्य सचिव यांची बैठक सुरु झाली. मुख्य सचिवांनी सिंहासनची स्क्रिप्ट वाचली होती आणि मंत्रालयात ती फिल्म शूट करायला त्यांनी स्पष्टपणे नकार कळवला होता. तुम्ही ही फिल्म इथे शूट करू शकत नाही,असा शेरा लिहून त्यांनी ती स्क्रिप्ट मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केली. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्यात ही मीटिंग होत होती. शरद पवारांनी आपण जर जब्बारांना नाही म्हणालो, तर ते सिनेमा बनवण काही थांबवणार नाहीत. कुठल्याही परीस्थितीत ते सिनेमा पूर्ण करतील. त्यांचा सिनेमा तर पूर्ण होईलच पण शरद पवारांनी मदत केली नाही अशी बातमी देखील बाहेर पसरेल. मंत्रालय शेवटी लोकांच्या वापरकरताच असते, म्हणत शूट करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. मुख्य सचिव मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. पवारांनी जब्बारांना दुसऱ्या दिवशी परत भेटण्यासाठी बोलावलं.(Political cinema)

========

हे देखील वाचा : हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास ५ हजारांचा दंड

========

दुसऱ्या दिवशी पवारांना भेटायला गेल्यावर त्यांनी एक खाकी पाकीट जब्बारांना दिलं. ‘तुम्हाला परवानगी देण्यात येत आहे’ असा शेरा देणारं पत्र त्यामध्ये होतं. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी फक्त दोनशे रुपये प्रतिदिन अशा दरात मंत्रालय शूटिंगसाठी उपलब्ध करून दिलं. शंकरराव चव्हाण यांचं ऑफिस, हाशू अडवाणींचा बंगला इत्यादी जागी शूटिंग करत जब्बरांनी सिंहासन पूर्ण केला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.