अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात अत्यंत वेदनामयी दुर्घटना झाली आहे. टेक्सास प्रांतात सर्वात मोठ्या अशा डेअरी फार्म (Dairy farm) आहेत. त्यापैकीच एका मोठ्या डेअरी फॉर्ममध्ये अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयानक होता की, त्यात या डेअरीमधील तब्बल अठरा हजार गायी जळून मृत्यू पावल्या आहेत. या प्रांतातील डेअरी या अत्यंत आधुनिक प्रकारच्या असतात. यामध्ये गायींचे दूध हे मशिनच्या सहाय्यानं काढण्यात येतं. दूध काढण्यासाठी असलेल्या या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्याचा स्फोट झाला. या डेअरीमध्ये असलेल्या गायींच्या चा-यामुळे स्फोटाची दाहकता अधिक वाढली. यात डेअरीमधील अठरा हजार गायी जळून खाक झाल्या, अगदी थोड्या गायी आणि डेअरीमध्ये काम करणारे कर्मचारी या मोठ्या स्फोटापासून वाचले आहेत. हा स्फोट एवढा भयानक होता की, अत्यंत दूरवरुन डेअरीवर लागलेली आग आणि काळे लोट दिसत होते. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेतील वेस्ट टेक्सासमध्ये भागात ही दुर्घटना झाली आहे. भीषण स्फोटात हा डेअरी फार्म (Dairy farm) उद्ध्वस्त झाला आहे. यात अठरा हजार गायींचा मृत्यू झाला असून इतक्या गुरांचा मृत्यू झाल्याची अमेरिकेतील ही पहिलीच घटना आहे. या भिषण स्फोटाची झळ परिसरातील शेतीलाही लागली असून सर्व परिसर काळ्या धुराच्या छायेत झाकला गेला होता. डेअरी फार्मला लागलेली आग विझवण्यासाठी टेक्सासच्या अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र स्फोटाची भिषणता एवढी होती की, ही आग विझवण्यासाठी अनेक तास लागले.
टेक्सासमधील सर्वात मोठ्या दुध उत्पादक कुटुंबाये हे डेअरी फार्म (Dairy farm) होते. यात सुमरा वीस हजार गायी आहेत. अत्यंत आधुनिक पद्धतीनं या फार्ममधील गायींचे पालन पोषण केले जाते. या पद्धतीमुळेच डेअरी फार्म (Dairy farm) पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे सांगण्यात येते. सध्या गायींच्या येवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे. मात्र उपकरणात झालेल्या बिघाडामुळे हा भिषण स्फोट झाल्याचे सांगण्यात येते. या स्फोटामुळे फार्ममध्ये असलेल्या काही गायी वाचवण्यात आल्या असल्या तरी त्यांनाही भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या डेअरीमध्ये ठराविक वेळेमध्ये गायींचे दूध काढण्यात येत असे. त्यासाठी वेगळे तंत्रज्ञान होते. दूध काढण्यासाठी गायींना गोठ्यात बांधले होते. या सर्व बांधण्यात आल्या होत्या. त्यावेळीच दूध काढण्यात येते, ती मशीन जास्त गरम होऊन त्यातून मिथेन वायू बाहेर पडू लागला. यामुळे हा स्फोट झाला. यात दूध काढण्यासाठी उभ्या असलेल्या गायींचा जळून मृत्यू झाला.
=======
हे देखील वाचा : केदारनाथ यात्रेला जाताय; ‘हे’ नवीन नियम ठेवा लक्षात…
=======
या स्फोटाची भिषणता डेअरीतील सुक्या गवतामुळे अधिक वाढली. कॅस्ट्रो काउंटी टेक्सासमध्ये मोठ्या प्रमाणात डेअरी आहेत. येथे असलेल्या डेअरी फार्ममध्ये 30 हजाराहून अधिक गायी आहेत. त्यातील अर्ध्यापेक्षा गायी ज्या डेअरीमध्ये स्फोट झाला तिथे होत्या. या दुर्घटनेमुळे सर्व टेक्सास परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना हृदयद्रावक असल्याचे डिमिटचे महापौर रॉजर मॅलोन यांनी सांगितले आहे. 2013 पासून अमेरिकेत आगीमुळे सुमारे 6.5 लाख गुरे मरण पावली आहेत. त्याच वेळी, 2018 ते 2021 या काळात सुमारे 30 लाख गुरे मरण पावली आहेत. याशिवाय 2016 मध्ये टेक्सासमध्येच हिमवादळामुळे 2 दिवसांत 35 हजार गायींचा मृत्यू झाला होता.
सई बने