Home » ही कंपनी चक्क नरकाचे द्वार उघडणार !

ही कंपनी चक्क नरकाचे द्वार उघडणार !

by Team Gajawaja
0 comment
OceanGate Company
Share

गेल्यावर्षी एका दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा टायटॅनिक जहाजाची चर्चा सुरु झाली होती.  ही दुर्घटना म्हणजे टायटन पाणबुडीला मिळालेली जलसमाधी.  टायटॅनिक जहाजाने जिथे जलसमाधी घेतली आहे, त्या समुद्राच्या खोल भागात जाऊन टायटॅनिक बघण्यासाठी टायटन नावाची पाणबुडी तयार करण्यात आली.  यासाठी करोडो रुपयांचे तिकीट ठेवण्यात आले.  दुर्दैवानं ही पाणबुडीही टायटॅनिक जहाजासारखी समुद्राच्या खोल पोटात सामावून गेली, त्यासोबत त्यातील माणसांनाही जलसमाधी मिळाली.  त्यानंतरही टायटन पाणबुडी बनवणा-या कंपनीवर मोठी टीका करण्यात आली.  तसेच सदोष पाणबुडीबाबतही शंका व्यक्त करण्यात येत होती.  मात्र आता या कंपनीने यापेक्षाही भीतीदायक योजना जाहीर केली आहे.  ही कंपनी चक्क नरकाचे द्वार उघडणार आहे. (OceanGate Company)

बहामासमधील एका बेटाजवळ ब्लूहोल नावाची जागा आहे.  हा डीन ब्लूहोल म्हणजे, ६६४ फूट खोल गुहा आहे.  संशोधनातून  १५ हजार वर्षांपूर्वी ही खोल गुहा तयार झाल्याचे स्पष्ट आहे.  या गुहेच्या तळाला अद्यापही कोणाला जाता आले नाही.  तसेच ६६४ फूटापेक्षाही ही गुहा खोल आहे.  बहामासमधील स्थानिक या जागेचा उल्लेख नरकाचे द्वार असेच करतात.  कारण ज्यांनी या गुहेचा अंत शोधायचा प्रयत्न केला, तो खोल गुहेत गायब झाला आहे.  आता याच खोल गुहेचे द्वार उघडण्याची घोषणा ओशनगेट कंपनीनं केली आहे.  त्यासाठी या कंपनीनं अधिक आधुनिक पाणबुडी तयार करायला घेतली आहे.  ही पाणबुडी या डीन ब्लू होलचा अभ्यास करुन त्यातील रहस्य उलगडण्याचे काम करणार आहे.  

बहामास हा अटलांटिक महासागरातील २९ बेटांनी बनलेला एक देश आहेया देशाचे वैभव म्हणजे, त्याचा समुद्रकिनारा.  जगभरातील पर्यटक बहामासच्या समुद्रकिना-यावर येतात.  निळ्यागर्द रंगाचा येथील समुद्र पर्यटकांच्या आवडीचा आहे.  मात्र येथील एका जागेवर जाण्याचे धाडक पर्यटक करीत नाहीत. ही समुद्रातील जगातील तिसरी सर्वात खोल गुहा आहे. बहामाचे स्थानिक याला नरकाचा दरवाजा असे म्हणतात.  याच खोल गुहेतून नरकात जाता येते, तसेच या खोल गुहेच्या आसपास नेहमी विचित्र आवाज ऐकायला येतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.  हे रहस्य उलगडण्यासाठी अनेक हौशी पर्यटक या खोल गुहेत जाण्याचा प्रयत्न करतात.  मात्र या खोल गुहेतून त्यांना परत येता येत नाही.  त्यामुळेच या डीन ब्लू होलचे रहस्य अधिक गडद झाले आहे. (OceanGate Company)

आता हेच रहस्य उलगडण्यासाठी ओशनगेट कंपनीनं तयारी सुरु केली आहे.  डीन ब्लूहोल म्हणजे, ६६४ फूट खोल पाण्याखालील गुहा आहे, जी बहामासमधील एका बेटाजवळ आहे.  ही गुहा १५ हजार वर्षांपूर्वी तयार झाली.  हिमयुगात ब्लू होल तयार झाले, तेव्हा समुद्राची पातळी सध्याच्या तुलनेत १०० ते १२० मीटर इतकी कमी होती.  एवढ्या वर्षानंतर या गुहेच्या आकारात बदल होत गेला.  त्यातील लहान छिद्रे खोल भूगर्भातील पाण्याने हळूहळू चुनखडी विरघळल्याने मोठी झाली.  काही वर्षानंतर समुद्राची पातळी वाढली आणि ही गुहा पाण्यानं भरुन गेली.  मात्र तोपर्यंत तिचा आकार अतिविशाल झाला होता.  (OceanGate Company) 

डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी डीन्स ब्लू होल हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. बहामास मधील २०१२ फ्रीडायव्हिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये, न्यूझीलंडचा स्पर्धक विल्यम ट्रुब्रिजने डीनच्या ब्लू होलमध्ये हवेशिवाय १२१ मीटर खोलीपर्यंत डुबकी मारून विश्वविक्रम केला.  तो विक्रम आतापर्यंत आबाधित आहे.  

================

हे देखील वाचा :  Mirzapur Season 3 मध्ये होणार पंचायतमधील या स्टारची एण्ट्री, अली फजलने केला खुलासा

================

या गुहेमध्ये नैसर्गिकरित्या काही खोल्या तयार झाल्या आहेत.  गुहेचा तळ अगदी सम आहे. गुहेमध्ये अनेक मार्ग आहेत.  त्यातील मधला भाग हा गुंतागुंतीचा आहे.  बहुतांश पाणबुड्या याच गुंतागुंतीच्या मार्गात अडकल्या आहेत.  भरती ओहोटीच्या काळात या गुहाच्या मुखाजवळून मोठ्या वेगात पाणी बाहेर फेकले जाते.  त्यावरुन ही गुहा समुद्राच्या खोल भागात जोडली गेली असल्याचा अंदाज स्थानिकांचा आहे.  म्हणूनच गुहेला नरकाचे द्वार म्हणून ओळखले जात आहे.  ओशनगेट कंपनीनं आपल्या नव्या प्रोजेक्टमधून या गुहांचा तळ गाठण्याचा निश्चय केला आहे.  या प्रोजेक्टमध्ये संशोधक केनी ब्रॉड आणि नासाचे माजी अंतराळवीर स्कॉट पॅराझिन्स्की याचा सहभाग असणार आहे.  गिलेर्मो यांनी २००९ मध्ये स्टॉकटन रशच्या सहकार्याने ओशनगेट कंपनीची स्थापना केली.  गेल्या वर्षी समुद्रात टायटन पाणबुडीच्या अपघातात स्टॉकटन रश यांचा मृत्यू झाला. गिलेर्मो यांनी रश यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी असे आव्हानात्मक प्रोजेक्ट करत असल्याचे स्पष्ट केले आहे.  

सई बने   

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.