Home » ‘या’ मुलानं नुकताच भारताच्या शिरपेचात सोनेरी तुरा रोवला

‘या’ मुलानं नुकताच भारताच्या शिरपेचात सोनेरी तुरा रोवला

by Team Gajawaja
0 comment
Share

भारतात गल्लोगल्ली एकच खेळ खेळला जातो, तो म्हणजे क्रिकेट. भारताच्या क्रिकेपटूला तर एखाद्या स्टार सारखी लोकप्रियता आहे.  या क्रिकेट शिवायही आपल्याकडे दुसरे खेळ खेळले जातात. अलिकडे या खेळालाही आणि त्यातील खेळाडूंनाही लोकप्रियता मिळू लागली आहे. 

या सर्व खेळाडूंमध्ये एका तरुण मुलानं तमाम भारतीयांची मान उंचावण्याचे काम केले आहे. काळ्यासावळ्या वर्णाचा हा पोरसवदा तरुण आपल्या आईसोबत जिथे जातो, तिथे त्याला बघण्यासाठी, त्याची  सही घेण्यासाठी मोठी गर्दी जमत आहे.  या मुलानं नुकताच भारताच्या शिरपेचात सोनेरी तुरा रोवला आहे.  हा मुलगा आहे, भारताचा बुद्धीबळातील चॅम्पियन आर प्रग्यानंद. (R Pragyanand)

याच प्रग्यानंदने प्रथमच शास्त्रीय बुद्धिबळात कार्लसनला हरवले आहे. चौसष्ठ घरांच्या या राजाचे चाहते जगभर पसरले आहेत. पण ते त्याच्या खेळाचे जेवढे चाहते आहेत, तेवढेच ते त्याच्या साध्या स्वभावाचे आहे. आर प्रग्नानंदने शास्त्रीय बुद्धिबळात जागतिक क्रमवारीत पहिल्या नंबरवर असलेल्या  मॅग्नस कार्लसनला पराभूत करुन इतिहास रचला.  या विजयासह प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आघाडीचे स्थान गाठले आहे. 

बुद्धिबळात सर्वोच्च स्थानावर असलेल्या प्रग्नानंद आपल्या या यशात आईचे स्थान सर्वोच्च मानतो.  प्रग्यानंद जिथे जाईल, तिथे त्याची आई सोबत असते. देश विदेशातील मिडिया आणि जगभरातील चाहत्यांच्या गर्दीत असलेल्या प्रग्यानंद समोर आई दिसली की पहिला तिच्याकडे धावत जातो. त्याचा हाच साधेपणा त्याच्या चाहत्यांना अधिक भावत आहे. (R Pragyanand) 

भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध शास्त्रीय बुद्धिबळात पहिला विजय नोंदवला आहे. या विजयासह प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आघाडीचे स्थान गाठले आहे. १८ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रग्यानंदने यापूर्वी कार्लसनचा वेगवान बुद्धिबळात पराभव केला होता. आता त्यानं शास्त्रीय बुद्धिबळातही मॅग्नस कार्लसनला तीन फेऱ्यांनंतर ५.५ गुणांसह हरवत आघाडीचे स्थान मिळविले.  प्रग्नानंद हा शास्त्रीय बुद्धिबळात मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा चौथा भारतीय बुद्धीबळपटू ठरला आहे.  

चेन्नई बॉय म्हणून ओळखल्या जाणा-या प्रग्यानंदचा जन्म १० ऑगस्ट २००५ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला.  त्याचे वडील रमेशबाबू हे टीएनएससी बॅंकेत शाखा व्यवस्थापक आहेत.  रमेशबाबू यांना पोलिओ झाला आहे.  त्यामुळे प्रग्यानंदच्या सगळ्या प्रवासात त्याची आई नागलक्ष्मी कायम सोबत असते.  देशविदेशाता कुठेही बुद्धिबळाची स्पर्धा असेल तर त्याची आई नागलक्ष्मी प्रग्यानंदसोबत असते. (R Pragyanand)

विशेष म्हणजे, प्रग्यानंदची मोठी बहिणही बुद्धीबळपटू आहे. त्याला बुद्धिबळाचे पहिले धडे त्याच्या बहिणीनेच दिले आहेत.  वयाच्या तिस-या वर्षापासून प्रग्यानंद मोठी बहिण वैशालीकडून बुद्धिबळ शिकत आहे.  वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी तो ग्रॅंडमास्टर झाला.  प्रग्यानंदला टिव्हीपासून दूर ठेवण्यासाठी त्याच्या बहिणीने त्याला या खेळात एवढे गुंतवले की तो आता याच सर्व सोशल मिडियाचा स्टार झाला आहे. 

प्रग्यानंदच्या या यशात त्याच्या आईवडिलांचा मोठा सहभाग आहे.  वडिल पोलिओग्रस्त असले तरी आपल्या दोन्ही मुलांचे करिअर उत्तम व्हावे म्हणून ते प्रयत्नशील आहेत. प्रग्यानंदच्या आईचा त्याच्या यशात सिंहाचा वाटा आहे.  वैशाली आणि प्रज्ञानानंद या दोघांनाही बुद्धिबळ खेळण्यासाठी तिनेच प्रोत्साहन दिल्याची माहिती आहे. 

२०१८ मध्ये वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी प्रग्यानंदने विश्वनाथ आनंदला हरवले होते.  विश्वनाथ आनंद वयाच्या १८ व्या वर्षी ग्रॅंडमास्टर झाला.  तर प्रग्यानंदला १२ व्या वर्षीच हा बहुमान मिळाला आहे.  बुद्धिबळाव्यतिरिक्त प्रग्यानंदला क्रिकेटचीही आवड आहे.   पण आता त्याच्यामुळे क्रिकेटपेक्षाही बुद्धिबळाला अधिक लोकप्रियता मिळाली आहे. (R Pragyanand) 

===========

हे देखील वाचा : एक-दोन नाही तर थेट सहा ग्रह एका रांगेत येणार

===========

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला पराभूत करणा-या प्रग्यानंदची खेळी सध्या सोशल मिडियावर सर्वाधिक पाहिली जात आहे.  त्याचा हा व्हिडिओ गेल्या आठवड्यातला सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे.  पांढ-या सोंगट्यांसह खेळणा-या प्रग्यानंदच्या या विजयानं कार्लसन गुणतालिकेत पाचव्या स्थानावर गेला आहे. 

शास्त्रीय बुद्धिबळ, सामान्यतः स्लो चेस म्हणूनही ओळखले जाते.  यात खेळाडूंना त्यांच्या हालचाली करण्यासाठी भरपूर वेळ असतो.  अगदी हा अवधी एक तासाचाही असतो.  कार्लसने एका अशाच सामन्यात प्रग्नानंदचा पराभव केला होता.  त्यात त्यानं वापरलेल्या ट्रिक वापरुन आता प्रग्यानंदने त्याचाच पराभव केला आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.