ब्रिटनची प्रिन्सेस डायनाचा (Princess Diana) 1997 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी एका कार अपघातात मृत्यू झाला. पण प्रिन्सेस डायनाचे वय एवढं आहे की, तिच्या मृत्यूला कितीही वर्ष झाली तरी तिच्या चाहत्यांची संख्या कमी झाली नाही, उलट प्रिन्सेंसच्या चाहत्यांची संख्या वाढत आहे. आजही प्रिन्सेस डायना ही ब्रिटिश राजघराण्यातील सर्वात लोकप्रिय महिला म्हणून ओळखली जाते. याच प्रिन्सेस डायनाच्या प्रत्येक वस्तूंना मागणी आहे. विशेषतः डायनाला दागिन्यांची खास आवड होती. डायनाचे हे दागिने तिने प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी यांच्या पत्नींना मिळाले. पण अशाच आणखी काही दागिन्यांची विक्री आणि लिलाव करण्यात येतो. आजही डायनाच्या (Princess Diana) दागिन्यांचा लिलाव केल्यास त्याला दुप्पट किंमत मिळत आहे. असाच एक लिलाव नुकताच झाला, त्यात डायनाच्या दागिन्याला दुप्पट किंमत मिळाली. हा प्रिन्सेसचा खास दागिना तिची चाहती असलेल्या किम कार्दशियनने दुप्पट किंमतीत विकत घेतला आहे. अभिनेत्री आणि व्यावसायिक असलेल्या किम कार्दशियनने लिलावात विकत घेतलेल्या प्रिन्सेस डायनाच्या (Princess Diana) नेकलेसला सर्वाधिक बोली लावली.

अमेरिकन मॉडेल, टीव्ही स्टार आणि उद्योगपती असेलेल्या किम कार्दशियनने ब्रिटनच्या राजकुमारी डायनाच्या नेकलेस आपल्या नावावर केला आहे. नेकलेसच्या ऑक्शन हाऊस सोथेबीच्या म्हणण्यानुसार, हा हार ब्रिटिश ज्वेलर गॅरार्ड यांनी 1920 साली बनवला होता. लंडनमध्ये 162,800 एवढी या नेकलेसची किंमत लावण्यात आली. यासाठी झालेल्या लिलावात चार बोलीदारांनी बोली लावली. मात्र शेवटच्या 15 मिनिटांत किम कार्दशियनने बाजू पलटवली. तिनं सर्वाधिक बोली लावून प्रिन्सेंस डायनाचा (Princess Diana) हा नेकलेस विकत घेतला.
किम कार्दशियनने $197453 एवढ्या किंमतीत हा हि-याचा नेकलेस विकत घेतला. मुल्यवान हिरे लावलेल्या या नेकलेसची भारतीय रुपयांमध्ये 1.6 कोटी आहे. सोथेबी लंडन येथील ज्वेलरी प्रमुख, ख्रिश्चन स्पॉफॉर्थ यांनी या लिलावासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या मते प्रिन्सेंस डायनाचे दुर्मिळ आहेत, त्यामुळेच त्याची किंमतही जास्त आहे. डायनाही फॅशन आयकॉन होती. डायना आपल्या दागिन्यांची निवडही अत्यंत चोखंदळपणे करत असे. याशिवाय डायनाच्या (Princess Diana) चाहत्यांची संख्याही खूप आहे. त्यांना डायनाची एखादी वस्तू मिळाली तरी त्याची मोठी किंमत देण्याची त्यांची तयारी असते. तसेच या हाराच्या लिलावात झाले. प्रिन्सेस डायनाने (Princess Diana) 1987 मध्ये एका चॅरिटीच्या कार्यक्रमात हा नेकलेस परिधान केला होता. तो आता किम कार्दशियनने दुप्पट किंमतीत विकत घेतला आहे.
किम कार्दशियनला अशा ऐतिहासिक वस्तू खरेदी करण्याचा शौक आहे. यापूर्वीही एका लिलावात किमनं मर्लिन मन्रोचा ड्रेस विकत घेतला. हा ड्रेस किमनं परिधान करुन मेट गालामध्येही कॅटवॉक केला होता. मर्लिनचा हा ड्रेस खास होता कारण तिने हाच ड्रेस 1962 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या वाढदिवसाला परिधान केला होता. अशाच काही खास वस्तू जमा करण्याचा छंद किमला आहे. आता त्यात डायनाच्या नेकलेसची भर पडली आहे. किम ही अभिनेत्री आहे. सोशलाइट, मॉडेल, अभिनेत्री, व्यवसायिक स्त्री अशी तिची ओळख आहे. अनेक सामाजिक उफक्रमातही तिचा सहभाग असतो. प्लेबॉय मासिकाच्या डिसेंबर 2007 च्या अंकात किम कार्दशियनने नग्न फोटो दिले होते. तेव्हा तिच्यावर टिकाही झाली. पण बिंधास्त स्वभावाच्या किमनं टिकाकारांना चोख उत्तरं दिली होती. किम स्वतः फॅशन डिझायनर असून तिचे बुटीक प्रसिद्ध आहे.
======
हे देखील वाचा : ‘या’ देशात क्विलिया पक्षांमुळे होतेय समस्या
======
ब्रिटिश राजघराण्यातील डायना (Princess Diana), प्रिन्सेस ऑफ वेल्स ही सुद्धा फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जात असे. डायना तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी जितकी प्रसिद्ध होती तितकेच तिचे ज्वेलरी कलेक्शनही प्रसिद्ध होते. तिच्याकडे अनेक महागडे दागिने होते. राजकुमारी डायनाचा (Princess Diana) डायमंड नेकलेस आणि मुकुट, मोत्याचा हार, डायनाची नीलमणी जडलेली एंगेजमेंट रिंग, डायमंड आणि सॅफायर जडलेले मखमली चोकर, गोल्डन पेंडंट, डायमंड आणि एमराल्ड चोकर आदी अनेक दागिने प्रसिद्ध झाले. काहींनी या दागिन्यांसारखेच दागिने बनवून घेतले आहेत. डायनाचे हेच खास दागिने लिलावात उपलब्ध झाल्यावर तिच्या चाहत्यांसाठी ती मोठी सुवर्ण संधी असते. किमनं हिच संधी साधून डायनाचा नेकलेस आपल्या नावावर केला आहे.
सई बने