Home » अरे बापरे! जगातील सर्वात लहान सिरीयल किलर आहे अवघ्या आठ वर्षाचा…

अरे बापरे! जगातील सर्वात लहान सिरीयल किलर आहे अवघ्या आठ वर्षाचा…

by Team Gajawaja
0 comment
सीरिअल किलर
Share

जगातील सर्वात लहान सिरीयल किलर ठरला आहे भारतामधील एक आठ वर्षांचा मुलगा. एवढ्या लहान वयात खुनासारखा गंभीर गुन्हा आणि तो ही ‘सीरिअल किलिंग’ सारखा भयानक गुन्हा कोणी कसा करू शकतो, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे आणि ते ही आपल्या भारतात. लहान मुलं ही देवघरची फुलं असे म्हटले जाते आणि ते निर्विवाद सत्य आहे. कारण चांगलं-वाईट, चूक-बरोबर, मोह-मत्सर या कुठल्याही भावनांचा लवलेश त्यांच्या अंगी नसतो. म्हणूनच लहान मुलं अत्यंत निरागस असतात असे म्हणतात. म्हणूनच की काय, आपल्या अभंगात संत तुकाराम महाराजांनी म्हणले आहे की, “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा!”  पण की नाण्याला दोन बाजू असतात. या मुलाबाबतीत काहीसं तसंच घडलं आहे. या लहान मुलाच्या मानसिकतेची काळी बाजू ऐकल्यानंतर शरीराचा थरकाप उडाल्या शिवाय राहणार नाही.

२००७ मधील बिहार येथे घडलेल्या घटनेने अवघ्या देशाचा थरकाप उडाला होता. बिहारच्या भगवानपूर पोलिस ठाण्यात गावकऱ्यांनी केलेल्या फोननुसार गावकऱ्यांनी एका अट्टल गुन्हेगाराला पकडून ठेवले असून, त्याने भयानक कृत्य केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर येऊन त्याला घेऊन जावे, असे गावकऱ्यांनी फोनवर सांगितले होते.

या गुन्हेगाराने तीन खून अगदी सराईतपणे केले असून, याचा कोणताही पुरावा मागे सोडला नाही, असे गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. घटनास्थळी तातडीने दाखल झाल्यावर या गुन्हेगाराला पाहताच पोलीस चक्रावून गेले. कारण या गुन्हेगाराचं वय अवघं आठ वर्ष इतकंच होते.

अमरदीप नावाच्या या आठ वर्षीय मुलाने तीन मुलींची हत्या करून त्यांना जमिनीत पुरले असल्याचे गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. गावकऱ्यांनी केलेले हे आरोप फेटाळून लावत, “आमच्या मुलाने असं काहीही केलेले नाही”, असे त्याच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितले. परंतु अमरदीप याने स्वतः आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना देत, त्याने हे तीन खून कशा पद्धतीने केले व जमिनीत पुरलेल्या त्यातील एका मुलीचा मृतदेह बाहेर काढून दाखवला आणि पोलिसांच्या हातात सर्व पुरावे दिले.

अमरदीप हा अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा. गावची लोकवस्ती कमी असल्याने त्याने केलेले तीन खून तात्काळ कोणाच्या निदर्शनास आले नाही. मात्र गावात राहणाऱ्या एका महिलेने आपली मुलगी खुशबू हिला अंगणवाडी खेळण्यासाठी सोडले होते व नंतर ती गायब झाल्याने तिने पोलिसात तक्रार दिली. चौकशीअंती तिचा खून झाल्याचे निदर्शनास आले.

अमरदीपवर या महिलेने लावलेल्या आरोपांच्या चौकशी दरम्यान अमरदीपने आणखी दोन खून केले असून त्याची सख्खी बहीण व चुलत बहीण यांचाही त्याने खून केला व लाजेखातर त्यांच्या कुटुंबाने ही गोष्ट लपवून ठेवली असे खुद्द अमरदीपच्या काकांनी पोलिसांना माहिती दिली.अमरदीपच्या चौकशी दरम्यान पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असताना पोलिसांप्रती त्याच्या मनात कोणतीही भीतीन व्हती. तो अगदी शांतपणे सगळे गुन्हे कबुल करत होता.

हे ही वाचा: Unknown Places: पृथ्वीवरची पाच अशी ठिकाणं, ज्यांचा जगाशी काहीही संबंध नाही

हिंदुराष्ट्र: जगातील ‘या’ १० देशात आहेत सर्वाधिक हिंदू; पाच नंबरचा देश तर हिंदूंचं करतोय धर्मांतर

समोर घडत असलेला प्रकार पोलीसांना चक्रावून टाकणारा असल्याने पोलिसांनी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली. मानसोपचारतज्ज्ञांनी अमरदीपची चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, अमरदीप हा मनोरुग्ण असून त्याला इतरांना झालेल्या त्रासातून विकृत आनंद मिळतो. त्याला चांगल्या वाईट यातला फरक कळत नाही. तरीही त्याने सराईत गुन्हेगाराप्रमाणे केलेल्या तीन खुनांच्या घटनेमुळे सगळेच चक्रावून गेले. अवघ्या आठ वर्षाच्या वयात तीन खून करणारा अमरदीप हा जगातील सर्वात लहान वयाचा खुनी ठरला आहे.

-निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.