महादेवाला समर्पित असणाऱ्या श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे आराधना केली जाते. मात्र श्रावणातल्या सोमवारचे महत्व जरा जास्तच असते. श्रावणातला सोमवार हंटल्यावर अनेकांचा या दिवशी उपवास असतो. शंकराची आराधना करून, रुद्राभिषेक करून, देवाला १०८ बेलपत्र वाहिले जाते. शिवाय श्रावणातल्या सोमवारी शिवामूठ वाहण्याची देखील मोठी आणि जुनी परंपरा आहे. या दिवशी देवाला शिवामूठ म्हणजेसह वेगवेगळे धान्य अर्पण केले जाते. प्रत्येक सोमवारी शिवामुठीसाठी वेगळे धान्य वापरतात. (Marathi News)
उद्या अर्थात ११ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावणातल्या तिसरा आणि महत्वाचा सोमवार आहे. श्रावणातल्या तिसऱ्या सोमवाराला जास्त महत्व आहे. या दिवशी मंदिरात घरात भगवान शिवाची पूजा करून शिवामूठ वाहिली जाते. तिसऱ्या सोमवारी देवाला हिरव्या मुगाची शिवामूठ वाहतात. देवचाही पूजा झाल्यानंतर उजव्या हातात धान्य घेऊन ते धान्य अंगठ्याच्या बाजूने हळूहळू देवावर वाहावे. लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात. तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग शिवामूठ म्हणून वाहतात. शिवामूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’ असा मंत्र म्हणावा. शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. (Shravan News)
पुराणकथांनुसार भगवान शंकर हे ‘हरितप्रिय’ आहेत, म्हणजेच हिरव्या रंगाच्या वस्तू त्यांना विशेष प्रिय आहेत. त्यामुळे बिल्वपत्र, मूग यांसारख्या हिरव्या वस्तूंचे अर्पण महत्त्वाचे मानले जाते. मूग अर्पण केल्याने कर्जमुक्ती मिळते, घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि निरोगी उदंड अयुशाचॆ प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. श्रावण हा काळ कडधान्यांच्या पिकांच्या परिपक्वतेचा असतो. नवीन हंगामातील पीक सर्वप्रथम देवाला अर्पण करण्याची परंपरा होती. मूग हे प्रथिनयुक्त, पचायला सोपे आणि आरोग्यदायी अन्न आहे. म्हणूनच, अर्पणानंतर मुगाचे प्रसादरूप सेवन आरोग्य वृद्धिंगत करण्यास मदत करते. (Todays Marathi News)
तिसऱ्या श्रावण सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी ‘ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।’ हा शिवाचा गायत्री मंत्र आणि ‘ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥’ या मृत्यूंजय मंत्राचे पठण करावे. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र ‘ॐ नमः शिवाय’चा किमान १०८ वेळा. (Latest Marathi News)
श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेला मोठे महत्व आहे. शिवाय बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते. त्र्यंबकेश्वर स्थित असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारल्यास विशेष फलप्राप्ती होत असल्याने दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक त्रंबकेश्वरमध्ये दाखल होतात. तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेला विशेष महत्त्व आहे. (Top Marathi News)
ब्रह्मगिरी पर्वत म्हणजे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. याच ठिकाणी भगवान शंकराने आपल्या जटा आपटल्या होत्या. याच ब्रह्मगिरी पर्वताला श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी प्रदक्षिणा मारल्यास इच्छित फल प्राप्ती होते अशी मान्यता आहे. त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली जाते. मात्र, श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी ही प्रदक्षिणा केल्यास अधिक फलप्राप्ती होते, असं मानतात. त्यामुळेच लाखो भाविक या दिवशी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात. (Top Stories)
===================
हे देखील वाचा : Uttarakhand : फक्त राखीपौर्णिमेलाच उघडतात या मंदिराचे दरवाजे !
===================
बरेच भाविक रविवारी रात्री बारा वाजेनंतर त्र्यंबकेश्वराचे दर्शन करून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस सुरुवात करतात. २० किलोमीटरच्या फेरी दरम्यान कित्येक अनेक तीर्थ आपल्या दृष्टीस पडतात. आजूबाजूला असणारा आल्हादायक वातावरण, भोलेनाथाचे नामस्मरण, वरून कोसळणारा पाऊस आणि शिवाचे अगणित भक्त अशा या वातावरणात ही फेरी पूर्ण केली जाते. प्रदक्षिणा मार्गावर सरस्वती तीर्थ, रामतीर्थ, नागातीर्थ, निर्मल तीर्थ, प्रयाग तीर्थ आदी अनेक मंदिरं आहेत, जिथे भाविक नतमस्तक तर होतातच शिवाय जरा विश्रांती देखील घेतात. अनेक तास चालल्यानंतर जेव्हा ही प्रदक्षिणा पूर्ण होते तेव्हा मानसिक शांती अधिक मिळते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics