Home » नवीन लॅपटॉप घ्यायचा विचार करताय ? मग नक्की वाचा या टिप्स.

नवीन लॅपटॉप घ्यायचा विचार करताय ? मग नक्की वाचा या टिप्स.

by Correspondent
0 comment
Share

सध्या कोरोनाच्या काळात अनेकांना वर्क फ्रॉम होम हा पर्याय दिला गेला आहे. मात्र हे असताना  लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असणे अत्यंत महत्वाचे आहे. मग नेमका चांगला लॅपटॉप कोणता? हा प्रश्न पडलाय. वेगवेगळ्या ऑफर्स बघून संभ्रम निर्माण झालाय… काळजी करू नका . लॅपटॉप घेताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे यासाठी आम्ही घेऊन आलोय काही खास टिप्स

सध्या लॅपटॉप ही अत्यंत गरजेची गोष्ट झालेली आहे. आपली दैनंदिन कामं आणि इतर सगळ्याच गोष्टींसाठी आज डेस्कटॉपपेक्षाही लॅपटॉपला मागणी आहे. लॅपटॉपच्या विक्रीच्या संख्येत आज वाढ होताना दिसत आहे; पण काही वेळा बरेच लोक केवळ अपुऱ्या माहितीमुळे गरजेपेक्षा महागडे लॅपटॉप्स विकत घेताना दिसतात. नक्की लॅपटॉप कसा घ्यावा तेच बऱ्याच लोकांना माहिती नसतं. आपल्याला हवा तसा अन् तरीदेखील बजेटमध्ये बसेल, असा लॅपटॉप घेण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. याच निवडक गोष्टींचा घेतलेला हा आढावा…

१) बजेट

नवीन लॅपटॉप घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बजेट. आपल्या सोयीनुसार आणि बजेटनुसार लॅपटॉप्सचे मॉडेल्स शोधून मग त्यानुसार आवडेल तो लॅपटॉप निवडावा. आज १० हजारांपासून ते थेट ३- ४ लाखापर्यंत तुमच्या गरजेनुसार  चांगले लॅपटॉप्स उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनीची लॅपटॉपसाठी स्वतःची वेबसाइट असतेच. शिवाय शॉपिंग वेबसाइटवरही लॅपटॉप्सचे पर्याय उपलब्ध  आहेच. ऑफिशियल स्टोअर प्रत्येक कंपनीचे तुमच्या शहरात आहेच. त्यामुळे त्याठिकाणी भेट देऊन योग्य लॅपटॉपची निवड तुम्ही करू शकता

२) कॅचे (cache) मेमरी

कॅचे cache मेमरी हा प्रोसेसरचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मुख्य मेमरीमध्ये डेटा कमीतकमी वेळेत अॅक्सेस करण्यासाठी याचा उपयोग होतो. यात मुख्यत्वे नियमितपणे हाताळल्या जाणाऱ्या फाइल्सच्या कॉपीज जतन केल्या जातात. साधारणतः तंत्रज्ञ, मोठे व्यावसायिक यांना जास्त कॅचे (cache) मेमरीची गरज लागते. बऱ्याचदा कमी cache मेमरीमुळे लॅपटॉप्स हँग होण्याची शक्यता असते. तेव्हा लॅपटॉप निवडताना या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करू नका.

३) रॅम

लॅपटॉपवर होणाऱ्या सर्व क्रियांचं नियंत्रण रॅमद्वारे केलं जातं. काहीवेळा केवळ कमी किमतीसाठी रॅमकडे दुर्लक्ष केलं जातं; पण बऱ्याचदा हे महागात पडू शकतं. जर रॅम कमी असेल तर अनेकदा लॅपटॉप स्लो होतो. आणि काम करण्यात अडथळा येऊ शकतो. तसंही आजकाल आपण स्मार्टफोन निवडतानाही रॅमकडे कटाक्ष ठेवतोच. तेव्हा लॅपटॉप तगड्या रॅमशिवाय निवडण्याचा प्रश्नच येत नाही.

४) हार्ड डिस्क स्पेस

गाणी, फोटोज, गेम्स यासगळ्या गोष्टी हार्ड डिस्कमध्ये साठवल्या जातात. त्यामुळे लॅपटॉप घेताना हार्ड डिस्कचा विचार करणे गरजेचं आहे. सध्याचा लोकांचा वापर बघता कमीतकमी ५००जीबी जागा लॅपटॉप्समध्ये असणं गरजेचं आहे. तसंच यासाठी वेगवेगळे पार्टिशन्स असणं आवश्यक आहे. हल्ली बऱ्याच लॅपटॉप्समध्ये एकच पार्टिशन केलेलं असतं, ज्यामुळे नंतर भविष्यात दुसरी ओएस टाकायची झाली, तर बॅकअप घेताना प्रोब्लेम येऊ शकतो. हल्ली नॉर्मल हार्ड डिस्कसोबत एसएसडी ड्राईव्हचा पर्यायसुद्धा लोकांना उपलब्ध झालेला आहे. यामुळे तुमच्या लॅपटॉपचे वजन तर कमी होतेच शिवाय लॅपटॉपचा प्रोसेसिंग स्पीडसुद्धा वाढतो त्यामुळे एसएसडीचा पर्यायसुद्धा तुम्ही स्विकारू शकता.

५ ) वॉरंटी

लॅपटॉप घेताना महत्त्वाच्या गोष्टींमधली अजून एक म्हणजे वॉरंटी. वॉरंटीमुळे लॅपटॉपमध्ये कोणताही बिघाड झाला, तर तो निःशुल्क सोडता येतो. आजकाल ऑनसाईट वॉरंटी बऱ्याच कंपन्यानद्वारे दिली जाते, ज्याद्वारे लपटॉपला घरी येऊन सर्विस दिली जाते. लॅपटॉप घेताना शक्यतो किती वर्ष वॉरंटी आहे ते पाहून मगच लॅपटॉप घ्यावा. हल्ली सहसा ३ वर्षांची वॉरंटी लॅपटॉपला उपलब्ध असतो आणि वॉरंटी एक्सटेन्ड सुद्धा करता येते.काही लॅपटॉप्सच्या वेबसाईटसवर जाऊन वॉरंटीसाठी रजिस्टर करावं लागतं. सध्याच्या घडीला स्टोअर्समध्ये यासाठी ऑफर्ससुद्धा दिलेल्या असतात. यामध्ये एक ऐवजी तीन वर्षांची वॉरंटी तुम्हाला दिली जाते. त्याचा विचार तुम्ही करू शकता.

६ ) बॅटरी बॅकअप

लॅपटॉप हा पोर्टेबल असल्याने बॅटरी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बॅटरी बॅकअप जितका जास्त, तितकी लॅपटॉपला मागणी जास्त. लॅपटॉपची बॅटरी ही त्यात असणाऱ्या सेलवर अवलंबून असते. त्यामुळे सेलच्या संख्येवर लॅपटॉप किती वेळ चालेल ते ठरतं. प्रवासात बॅटरी बॅकअप खूप महत्त्वाचा असतो. तेव्हा या गोष्टीवर अधिक लक्ष द्यावं लागेल

७ ) ओएस आणि इतर सॉफ्टवेअर

आज नवीन लॅपटॉप घेणार म्हणजे त्याबरोबर सॉफ्टवेअर असणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्या लॅपटॉपबरोबर कोणते सोफ्टवेअर्स आहेत हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या लॅपटॉपबरोबर कोणती ओएस आहे, ती लायसन्स्ड आहे का ह्याचा अभ्यास करूनच लॅपटॉप घेतला पाहिजे.

थोडक्यात नवीन लॅपटॉप विकत घेत असताना ऑफर्सबरोबर इतरही अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे या सर्व घटकांचा विचार करून त्यानंतरच योग्य लॅपटॉपची निवड तुमची स्वतःची गरज आणि बजेट याचा विचार करून केली तर नक्कीच एक चांगला लॅपटॉप तुम्हाला वापरण्यासाठी मिळू शकतो.

– भूषण पत्की


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.