आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध ग्रह. बुध ग्रह हा सूर्याच्या जवळ आहे. हा सर्वात वेगवान ग्रह आहे. याच ग्रहावरील वातावरणामुळे आता खगोलशास्त्रज्ञ आनंद व्यक्त करत आहेत. कारण हा बुध ग्रह म्हणजे, मोठा खजिना आहे. या बुध ग्रहावर सर्वाधिक हिरे असल्याचा शोध नुकताच लागला आहे. आतापर्यंतचा हि-यांचा सर्वात मोठा खजिना या बुध ग्रहावर सापडला आहे. त्यामुळे भविष्यात बुध ग्रहावर जाण्यासाठी जगभरातील देशांमध्ये स्पर्धा लागणार आहे. बुधच्या पृष्ठभागाखाली शेकडो मैलांवर हिऱ्याचा जाड थर सापडला आहे. जवळपास १८ किलोमीटर लांबीचा हा थर असून खगोल शास्त्रज्ञांनी बुधाला डायमंड प्लॅनेट असे नाव ठेवले आहे. (Mercury Planet)
अमेरिकेची खगोल संशोधन संस्था नासानेही बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर सर्वाधिक हिरे असल्याचा शोध लावला आहे. त्यामुळे लवकरच अमेरिका, चीन, भारत, जर्मनी सारखे देश बुध ग्रहाच्यावरील संशोधनात वाढ करणार आहे. सूर्याच्या जवळच्या या ग्रहावरील वातावरण मानवासाठी मात्र असह्य असेच आहे. हे ग्रह काढण्याची शक्यता धुसर असली तरी, शास्त्रज्ञ बुध ग्रहावर रोबोट पाठवता येईल काय याची चाचपणी करत आहेत. भविष्यात बुध ग्रह हा पृथ्वीवासीयांना हिरे पुरवणारा सर्वाधिक मोठा स्त्रोत होण्याची शक्यता आहे. (Mercury Planet)
लाइव्ह सायन्सचा अहवाल नुकताच प्रकाशीत झाला. त्याचे नाव आहे, “बुधावरील डायमंड-बेअरिंग कोर-मँटल बाउंड्री.” या अहवालात बुध ग्रहाबाबत आश्चर्य वाटेल अशा गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अहवालातूनहि-यांचा ग्रह या अहवालानुसार बुधच्या ग्रहाच्या पृष्ठभागाखाली शेकडो मैलांवर हिऱ्यांचा जाड थर असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात चीन आणि अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था आता काम करत आहेत. बीजिंगमधील सेंटर फॉर हाय प्रेशर सायन्स अँड टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड रिसर्चचे शास्त्रज्ञ यानहाओ लिन हे या प्रोजेक्टचे प्रमुख आहेत. यानहाओ लिन गेले काही वर्ष बुध ग्रहावर संशोधन करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुध ग्रहाच्या उच्च कार्बन सामग्रीमुळे त्याच्या पृष्ठभागाखाली काही विशेष असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, जेव्हा चीननं बुध ग्रहावरील हि-यांच्या खजिन्याचा शोध लावला, त्याचवेळी नासाही याच योजनेवर काम करत होते. नासाच्या मेसेंजर स्पेसक्राफ्टने एका अभ्यासात बुधाच्या पृष्ठभागावर गडद भाग शोधला आहे. हे ग्रेफाइट म्हणून ओळखले गेले आहे.
====================
हे देखील वाचा : इस्रोनं केलं रामसेतूचा नकाशा
====================
यातूनच बुध ग्रहावर हिरे मोठ्या प्रमाणत असल्याची खात्री शास्त्रज्ञांना आहे. नासाच्या संशोधनानुसार रासायनिक मिश्रण जास्त तापमानाला गोठते तेव्हाच गंधक मिसळले जाते. अशा परिस्थितीत हिरा तयार होण्याची शक्यता असते.या सर्व संशोधनात बुध ग्रहावरील वातावरण हे अडसर होत आहे. बुध ग्रहाच्या पृष्ठभागाखीली मोठ्या प्रमाणात हिरे असले तरी ते तिथून बाहेर काढणे हे सोप्पे नाही. या जागेचे उत्खनन करणे शक्य नाही. बुध ग्रहावरील तापमान हे अत्यंत उच्च आहे. शिवाय हिरे पृष्ठभागाच्या अंदाजे ४८५ किमी खाली आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी मानवाला बुध ग्रहावर पाठवणे ही अशक्य गोष्ट आहे. (Mercury Planet)
यासंदर्भात २०१९ पासून अभ्यास सुरु आहे. त्यानुसार बुध ग्रहाचे आवरण ५० किलोमीटर खोल आहे. अशा परिस्थित या ग्रहावर जाण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही. मात्र मानवाऐवजी रोबोट जाऊ शकतो का, याचा शोध घेण्यासाठी आता शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार बुध ग्रहाच्या आवरण-कोर सीमेवर तापमान आणि दाबामध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे, कार्बनचे स्फटिकासारखे हिरे बनले. ही परिस्थिती प्रत्यक्ष कशी असेल याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत बुध ग्रहासारखे वातावरण तयार केले. त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणाच्या दाबाच्या ७०००० पट जास्त दबाव बुध ग्रहावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.बुध ग्रहासंदर्भात संशोधन करण्यासाठी अमेरिकेची नासा आणि बेल्जियम, चीन सारखे देश आघाडीवर आहेत. बुध ग्रहामध्ये आढळणाऱ्या प्रक्रिया इतर ग्रहांवरही आढळू शकतात आणि तेथेही असेच हिऱ्याचे थर असू शकतात, यावरही आता शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. (Mercury Planet)
सई बने