हिवाळा सुरु झाला आहे, आणि थंडीने देखील वातावरणामध्ये कमालीचा गारवा पसरवण्यास सुरुवात केली आहे. सगळ्यांनाच हा हिवाळा खूपच आवडत असतो.आरोग्याच्या दृष्टीने देखील हा ऋतू तसे पाहिले तर उत्तम आहे. मात्र हिवाळा ऋतू सगळ्यांना कितीही हवाहवासा वाटत असला तरी त्याचे अनेक त्रास देखील आहेत. हिवाळ्यामध्ये सर्वाधिक प्रभाव शरीराच्या फिटनेसवर पडतो. हा प्रभाव आहारामध्ये अचानक आलेल्या बदलामुळे होतो. हिवाळ्यामध्ये आपल्याला भूक सामान्य दिवसांपेक्षा अधिकच लागते. त्यामुळे आपले खाणे वाढते. शिवाय थंडीमुळे व्यायाम करायला देखील बरेच लोकं कंटाळा करतात. व्यायामाच्या अभावामुळे शरीराची कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया मंदावते. बाहेरील गरम गरम पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये वजन वाढण्याची समस्या खूपच सामान्य आहे. मग हिवाळ्यामध्ये वजन वाढू नये यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे चला जाणून घेऊया. (Winter Health)
आहारात बदल
थंडीच्या दिवसात वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आहारात बदल करणे. याची सुरुवात तुम्ही गव्हाच्या पोळीऐवजी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खाऊन करू शकता. बाजरी आणि ज्वारीमध्ये उच्च प्रमाणात फायबर असतात. यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच पोट भरलेले राहते आणि यात असलेले फायबर मेटाबॉलिज्मला मजबूत करतात. (Marathi)
हिरव्या पालेभाज्या खा
हिवाळ्यात विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या मिळतात. यामध्ये मोहरी, मेथी, पालक, मुळा, हरभरा आणि चाकवत यासह अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा समावेश आहे. हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाने आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. याच्या वापराने वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते. यासाठी तुम्ही मुळा, चाकवत, पालक, मेथी इत्यादी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करू शकता. (Health)
शेंगदाण्यांचे सेवन
शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि फॅटी ॲसिड आढळतात, जे कॅलरीज बर्न करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. याच्या वापराने वाढते वजन सहज नियंत्रित करता येते. यासाठी तुम्ही शेंगदाणा घातलेले पोहे, शेंगदाण्याचे चाट किंवा पीनट बटरचे सेवन करू शकता. (Todays Marathi Headline)

चालणे
थंडीच्या दिवसांमध्ये घरी बसून राहू नये. वजन वाढत असेल तर घराबाहेर पडा. सकाळी थंडी अधिक असते, त्यामुळे सूर्य उगवल्यानंतर बाहेर फेरफटका मारायला आवर्जून बाहेर पडा. थंडीच्या ऋतूत दिवसा किंवा संध्याकाळी चालणं उत्तम असते. थंडीच्या दिवसात गार वाटल्याने देखील शरीरातील चरबी, कॅलरी देखील कमी होते, थंडीच्या दिवसातही कॅलरीज बर्न करायच्या असतील, चालणं गरजेचे आहे. (Marathi NEws)
चहा पिणे टाळा
हिवाळ्याच्या दिवसांत वजन कमी करायचं असेल तर हर्बल टी तसेच ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. काही महिने दुधाचा चहा पिऊ नका. हर्बल टी आणि ब्लॅक कॉफीमुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. हर्बल टी मध्ये ग्रीन टी, लॉन्ग टी, हिबिस्कस टी, तसेच ब्लॅक कॉफी यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. थंडीच्या ऋतूत हेल्दी ड्रिंक्स जरूर प्यावेत. त्यामुळे शरीराचे मेटाबॉलिज्म वाढते, तसेच फॅट बर्न होण्यास मदत होते. (Marathi Trending Headline)
योग आणि सूर्य नमस्कार
हिवाळ्यात व्यायाम करणे कठीण होते. मात्र, घरी तुम्ही सकाळी ११ ते १५ सूर्यनमस्कार करू शकतात. यासोबत अनुलोम विलोम आणि कपालभाति यासारखे प्राणायामही वजन घटवण्यासाठी सहाय्यक असतात. यामुळे वजन नियंत्रित होते. तसेच शरीराचे मेटाबॉलिज्मही मजबूत बनतात. (Top Marathi News)
पाण्याचे सेवन वाढवा
हिवाळ्यात लोक अनेकदा कमी पाणी पितात, परंतु या चुकीचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. पाण्याअभावी डिहायड्रेशन होते, ज्यामुळे चयापचय मंदावतो आणि वजन कमी करणे कठीण होते. डिहायड्रेशनमुळे चरबी जाळण्याची क्षमता कमी होऊ शकते. म्हणून, जर तुम्ही हिवाळ्यात नेहमीइतके पाणी पिऊ शकत नसाल तर तुम्ही कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करू शकता. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने चरबी जाळण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने चयापचय सुधारते तसंच शरीर हायड्रेटेड राहते. परिणामी वजन कमी करणे सोपे होते. (Latest Marathi Headline)
भिजलेले बादाम खा
सकाळी सकाळी भिजलेले बादाम खावेत. यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढतात. तसेच शरीराला ऊर्जाही मिळते. याचे नियमित सेवन तुम्हाला हिवाळ्यात उब देते आणि आणि आरोग्यदायी ठेवते. (Top Trending News)
========
Joint Pains: हिवाळ्यात वाढते सांधेदुखीचे त्रास जाणून घ्या कारणं आणि घरच्या घरी मिळवा आराम
Winter Recipe : खास हिवाळ्यातच खाल्ले जाणारे स्पेशल पदार्थ
========
गोड पदार्थ टाळा
हिवाळ्यात गोड पदार्थ खाणे योग्य असते असे मानण्यात येते. पण याच्या अतिसेवनामुळे वजन वाढण्याचा धोका अधिक संभवतो. त्यामुळे या दिवसांमध्ये केक, कुकीज यासारखे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. त्याच प्रमाणे सोडा असणारे पदार्थ हिवाळ्यात प्यायल्याने वजन लवकर वाढण्याचा धोका असतो. कुकीजप्रमाणे यामध्ये देखील अधिक प्रमाणात कॅलरी असतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये दूध आणि दुधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ जसे चीज, पनीर आणि तुप याच्या सेवनामुळे घसा, नाक आणि छातीमध्ये कफ होण्याची भीती असते. (Social News)
(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
