आजच्या काळात चष्मा लावणे खूपच सामान्य बाब झाली आहे. अनेकांना चष्मा लागतो तर काही लोकं फॅशन म्हणून चष्मा घालतात. मात्र ज्या लोकांना नजर कमीमुळे चष्मा लागतो त्यांना चष्मा कमी करण्यासाठी सतत चष्मा लावून ठेवावा लागतो. चष्मा नसल्यामुळे अनेकदा अशा लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळेस चष्मा कमी करण्यासाठी लोकं नानाविध उपाय करताना दिसतात.
चष्मा लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे डोळ्यांची व्यवस्थित निगा न राखणे, शरीरात पोषक तत्वांची कमतरता किंवा अनुवंशिकता असू शकते. यामधील अनुवंशिकतेचे कारण सोडल्यास इतर कारणांमुळे लागलेला चष्मा, योग्य निगा आणि आहाराकडे लक्ष दिल्यास तसेच काही घरगुती उपचार केल्यास दूर होऊ शकतो.
एकदा लागलेला चष्मा कायम वापरावाच लागतो असे नाही. चष्माचा नंबर कमी करणे किंवा चष्मा घालवणे हे वाटते तितके सोपे नाही. त्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. विविध प्रकारचे घरगुती उपाय करून चष्म्याचा नंबर कमी केला जातो. यासाठी आज आपण चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो ते जाणून घेऊया.
– पायाच्या तळव्यांना मोहरीच्या तेलाने मालिश करून झोपावे. सकाळी अनवाणी पायाने हिरव्या गवतावर थोडावेळ चालावे. अनुलोम – विलोम प्राणायाम केल्यास डोळ्यातील कमजोरी कमी होईल.
– एका शेंगदाण्याच्या आकाराएवढी तुरटी गरम करून त्याची पूड करा. शंभर ग्रॅम गुलाबपाण्यामध्ये ही पूड टाका. दररोज संध्याकाळी या गुलाबपाण्याचे चार-पाच थेंब डोळ्यात टाका. पायाला शुद्ध तुपाने मालिश करा. या उपायाने चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होईल.
– रात्री आठ बदाम पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी उठल्यावर ते पाण्यासोबत खावे, यामुळे चष्म्याचा नंबर कमी होतो.
– सकाळी उठल्याबरोबर गुलाब पाण्याने डोळे धुवावेत. असे नियमित केल्याने काही दिवसातच डोळ्यांची दृष्टी वाढते आणि चष्म्याचा नंबर कमी होतो.
– रात्री पायांच्या तळव्यावर मोहरीचे तेल किंवा तुप लावून मालिश करावे. मसाज नियमित केल्याने डोळ्यांना फायदा होतो. मसाज करताना अॅक्युप्रेशर पॉइंट्स दाबले गेल्याने दृष्टी उजळते.
– सकाळी उठल्याबरोबर, तोंड धुण्यापूर्वी तोंडाची लाळ डोळ्यात लावा. असे 6 महिने नियमित केल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते आणि चष्म्याचा नंबर कमी होतो.
– त्रिफळा चूर्ण रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी गाळून घ्यावे. मग याच पाण्याने डोळे धुवावे याने डोळ्यांची दृष्टी वाढते.
– सकाळी आवळ्याच्या पाण्याने डोळे धुवा किंवा डोळ्यात गुलाबजल टाका, यामुळे चष्म्याचा नंबर कमी होतो.
– डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार खूप महत्वाचा आहे, ज्यामध्ये पुरेसे पोषण असते. अशा वेळी लिंबूवर्गीय फळे, हिरव्या पालेभाज्या, अंडी, शेंगदाणे, बीन्स इत्यादी पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करावा.
– यासोबतच तुम्ही योग्य आहार, पुरेशी झोप, डोळ्यांचे व्यायाम, तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे, डोळ्यांची धूळ आणि प्रदूषणापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)