Home » Religious : भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये चक्क पुरुषांना जाण्यास आहे मनाई

Religious : भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये चक्क पुरुषांना जाण्यास आहे मनाई

by Jyotsna Kulkarni
0 comment
Religious
Share

आपल्याकडे कायमच असे म्हटले जाते की, देवासमोर सर्वच सामान आहेत. कोणी लहान मोठे नाही, गरीब श्रीमंत नाही की स्त्री पुरुष नाही. देवासमोर कोणताही भेद पळाला जात नाही. मात्र असे असले तरी काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नाही. आजही अनेक मंदिरांमध्ये तर काही मंदिरांमधील गर्भगृहामध्ये महिलांना जाण्यास मनाई आहे. भारतातील अनेक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश निषिद्ध असल्याचे आपण बऱ्याचदा ऐकत असतो. मात्र भारतात असे देखील मंदिरं आहेत जिथे केवळ महिलांनाच प्रवेश दिला जातो पुरुषांना या मंदिरांमध्ये बंदी असते. आता तुम्ही म्हणाला असे कोणते मंदिरं आहेत, जिथे महिलांना प्रवेश आणि पुरुषांना बंदी आहे? आहेत असे काही मंदिरं भारतात आहेत. ते कोणते तेच आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत. (Religious)

ब्रह्मदेव मंदिर पुष्कर, राजस्थान
राजस्थान येथील पुष्कर येथे असलेल्या ब्रह्मा मंदिरामध्ये विवाहित पुरुषांना प्रवेश करण्याची अनुमती नाही. एका आख्यायिकेनुसार भगवान ब्रह्मांनी पुष्कर नदीच्या तटावर सरस्वतीसमवेत यज्ञ करण्याचे योजिले होते. पण यज्ञाला सरस्वती वेळेवर न पोहोचल्याने ब्रह्माने देवी गायत्रीशी विवाह केला आणि यज्ञ पूर्ण केला. सरस्वतीला हे कळल्यानंतर तिने कोपाविष्ट होऊन ब्रह्माला शाप दिला. त्यामुळे आजही या मंदिरामध्ये विवाहित पुरुषाचा प्रवेश निषिद्ध मनाला जातो. कोणीही विवाहित पुरुष ब्रह्माच्या दर्शनासाठी गर्भगृहात गेल्यास त्याच्या वैवाहिक आयुष्यात नकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते. (Marathi News)

Religious

कन्याकुमारी मंदिर
कुमारिका असताना भगवान शंकराने आपल्याशी लग्न करावे यासाठी पार्वती मातेने तीन समुद्राच्या मधोमध या जागेवर तपश्चर्या केली होती, अशी या मंदिराविषयीची आख्यायिका आहे. त्यामुळेच कन्याकुमारी येथील भगवती माता मंदिरात देखील आजही पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे. या मंदिराचा कारभार स्त्रियाच बघतात. (Top Marathi News)

Religious

अट्टूकल मंदिर, तिरुअनंतपुरम
प्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिरापासून केवळ दोन किमी अंतरावर असलेल्या पार्वती देवीच्या या मंदिरात दरवर्षी सुमारे ३० लाख महिला दर्शनासाठी येतात. हे मंदिर नारी सबरीमला नावानेही ओळखले जाते. यामध्ये पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई आहे. तिरुवनंतपुरम, केरळ येथील अट्टुकल भगवती मंदिर हे मुख्यत्वे भद्रकालीला (कन्नकी) समर्पित असलेले जागतिक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. येथे प्रतिवर्षी १० दिवस चालणाऱ्या ‘अट्टुकल पोंगाला’ उत्सवात लाखो महिला सहभागी होऊन देवीला पोंगाला (खीर) अर्पण करतात. (Latest Marathi Headline)

Religious

चक्कूलातुकावू मंदिर, अलापुझा
केरळमधील अलापुझा जिल्ह्यातील निरेट्टूपुरम येथे पंपा नदीच्या काठावर वसलेले चक्कूलातुकावू श्री भगवती मंदिर ३००० वर्षांहून अधिक जुने आणि दुर्गा देवीला समर्पित असलेले अत्यंत लोकप्रिय मंदिर आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमधील (वृश्चिकम महिना) प्रसिद्ध पोंगल उत्सवासाठी हे मंदिर ओळखले जाते, जिथे लाखो महिला भाविक एकत्र येतात. केरळच्या अलापुझा जिल्ह्यातील चक्कूलातुकावू मंदिरात दरवर्षी पोंगल साजरा केला जातो. या उत्सवात अनेक महिला सहभागी होतात. हा कार्यक्रम सुमारे एक आठवड्यापर्यंत सुरु असतो. याला नारी पूजा नावाने ओळखले जाते. यादरम्यान इथे पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई असते. (Top Trending News)

Religious

माता मंदिर, मुजफ्फरपूर
बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील हे मंदिर वर्षभर भाविकांसाठी खुले असते. पण एक काळ असा येतो की, यावेळी पुरुषांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई असते. इतकंच नाही तर मुख्य पुजाऱ्यालाही यादरम्यान मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची परवानगी नसते. बिहारमधील हे सर्वात प्रमुख देवी मंदिर माँ राज राजेश्वरी देवी मंदिर आहे, जे ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. हे मंदिर दुर्गा देवीला समर्पित असून नवरात्रीच्या काळात येथे मोठी गर्दी असते। तसेच, मुझफ्फरपूरमध्ये गरीबनाथ मंदिर (शिव मंदिर) देखील अत्यंत प्रसिद्ध आहे. (Top Stories)

Religious

========

Bharadi Devi : आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला ९ तारखेपासून सुरुवात

========

संतोषी माता मंदिर, जोधपूर
शुक्रवारी जोधपूरच्या संतोषी माता मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे. दिवसभर पुरुष मंदिरात जात असतील, तर ते केवळ मंदिराच्या दाराशी उभे राहून आईचे दर्शन घेऊ शकतात, परंतु पूजा करू शकत नाहीत. शुक्रवार हा मा संतोषीचा दिवस आहे आणि महिला या खास दिवशी उपवास ठेवतात. या दिवशी पुरुष येथे येऊ शकत नाहीत. (Social News)

Religious

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.