Home » Religious : भारताच्या ‘या’ मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून मिळते चक्क नॉनव्हेज

Religious : भारताच्या ‘या’ मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून मिळते चक्क नॉनव्हेज

by Jyotsna Kulkarni
0 comment
Religious
Share

भारत हा असा देश आहे जिथे दर काही किलोमीटरवर एक मंदिर आपल्या नजरेत पडते. भारत कायमच विविधतेमध्ये एकता जपणारा देश म्हणून प्रख्यात आहे. जशी आपल्याकडे काही किलोमीटर संस्कृती बदलते तशी परंपरा, रिती आणि पद्धती देखील बदलतात. या पद्धती केवळ खाण्यापिण्याशी किंवा पेहनावा, राहणीमान यांच्याशी संबंधित नाही तर इतर सर्वच बाबतीत अगदी देवाशी निगडित देखील अनेक पद्धती आपल्याला बदलेल्या दिसतात. आता देवाबद्दल सांगायचे झाले तर देव पूजा विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, देवाचा प्रसाद देखील वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. (Religious)

आता जिथे देव हा शब्द येतो तिथे सर्वच एकदम शुद्ध, सात्विक असे वातावरण, राहणीमान, खानपान असते. एवढेच काय देवाचा नैवेद्य असला तर आपण जेवणामध्ये लसूण आणि कांदा देखील वापरत नाही. मात्र भारतातील असे काही मंदिरं आहेत जिथे देवाचा प्रसाद म्हणून चक्क नॉनव्हेज दिले जाते. हे ऐकून अनेकांना धक्का बसला असेल. जिथे आपण देवाचा प्रसाद अंघोळ करून स्वच्छ मनाने बनवतो. ज्याला आपण पवित्र म्हणतो. अशा प्रसादामध्ये नॉनव्हेज? ही कल्पनाच करू शकत नाही. पण हो भारतातील अनेक मंदिरांमध्ये असा प्रसाद मिळतो. मग अशी मंदिरं कोणती चला जाणून घेऊया. (Top Marathi Headline)

विमला मंदिर, ओडिशा
विमला मंदिर ओडिशा येथील पुरी मध्ये असलेले प्रसिद्ध मंदिर आहे. तर जगन्नाथ मंदिर परिसराच्या आतमध्येच पवित्र तलाव रोहिणी कुंडच्या बाजूला हे मंदिर आहे. विमलाला जगन्नाथची तांत्रिक पत्नी आणि मंदिर परिसरातील संरक्षक मानले जाते. त्यामुळे याचे महत्व जगन्नाथ मंदिरापेक्षा ही अधिक आहे. तर विमला देवीला जो पर्यंत महाप्रसाद चढवला जात नाही तोवर भगवान जगन्नाथ सुद्धा चढवला जात नाही.या मंदिरात देवीला विशेष दिवसांमध्ये मांस आणि मच्छीचा भोग चढवला जात असल्याची परंपरा आहे. (Marathi News)

मुनियांदी स्वामी मंदिर, तमिळनाडू
मुनियांदी स्वामी मंदिर तमिळनाडू मधील मदुरै मध्ये वडक्कमपट्टी नावाच्या एक लहान गावात स्थित आहे. हे मंदिर भगवान मुनियादी अर्थात मुनीस्वरार यांना समर्पित आहे. त्यांना भगवान शंकराचा अवतार मानले जाते. भगवान मुनियादी यांच्या सन्मार्थ या मंदिरात एक तीन दिवसीय वार्षिक उत्सवाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये चिकन आणि मटन बिर्याणी प्रसादाच्या रुपात दिली जाते. तर लोक नाश्तासाठी बिर्याणी खाण्यासाठी मंदिरात येतात. (Todays Marathi HEadline)

Religious

तारकुल्हा देवी मंदिर, उत्तर प्रदेश
तारकुल्हा देवी मंदिर उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आहे. या मंदिरात प्रत्येक वर्षी वार्षिक खिचडी मेळ्याचे आयोजन केले जाते. ज्यासाठी भाविकांनी खुप मोठी गर्दी होती. असे मानले जाते की, येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होते. खासकरुन चैत्र नवरात्रिच्या वेळी देशभरातील लोक या मंदिरात दर्शनासाठी येतात. या खासवेळी अशी लोक देवीला एक बकरा देतात ज्यांची मनोकामनला पूर्ण होते. त्यानंतर हे मांस तेथील जेवण बनवणाऱ्यांच्या द्वारे मातीच्या भांड्यात शिजवले जाते आणि नंतर भक्तांना ते प्रसाद म्हणून दिले जाते. (Social Updates)

दक्षिणेश्वर काली मंदिर, पश्चिम बंगाल
दक्षिणेश्वर काली मंदिर हे पश्चिम बंगाल येथील एक प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. या मंदिरात देवीला नैवेद्यात मासळी दिली जाते. नंतर पूजा झाल्यानंतर ही भक्तात वाटली जाते. मात्र या मंदिरात कोणत्याही प्राण्याची बळी दिला जात नाही. (Top Trending News)

कामाख्या मंदिर, आसाम
कामाख्या मंदिर प्रसिद्ध आहे.ते एक प्रसिद्ध शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे माँ कामाख्या देवीची पूजा तांत्रिक शक्तींसाठी केली जाती. हे मंदिर आसामच्या नीलाचल पर्वतात आहे. नैसर्गिक दृष्ट्या सुंदर प्रांतात आहे. येथे देवीला दोन प्रकारचा नैवेद्य दिला जातो. एक शाकाहारी आणि दुसरा मांसाहारी, हे दोन्ही नैवेद्य विना कांदा -लसूण बनवले जातात. मांसाहारी प्रसादात बकऱ्याचे मटण असते. ज्यास देवीला अर्पण करुन नंतर प्रसाद वाटला जातो. कधी माशाची चटणी तयार केली जाते. हा नैवेद्य दुपारी १ ते २ या दरम्याने देवीला चढवले जातात. यावेळी मंदिराचे मुख्यद्वार बंद असते. (Top Marathi News)

तारापीठ, पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ मंदिर दुर्गा भक्तांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. येथेही लोक देवीला मांसाचा नैवेद्य अर्पण करतात. यावेळी देवीला मद्य देखील चढवले जाते. नंतर हा प्रसाद म्हणून लोकांना वाटला जातो. (Latest Marathi Headline)

========

Mahashivratri : मासिक शिवरात्री आणि महाशिवरात्री यात काय आहे फरक?

Shanipradosh : जाणून घ्या शनि प्रदोष व्रताचे महत्व आणि मुहूर्त

========

विमला मंदिर, ओडिशा
देवी विमला वा बिमला दुर्गा मातेचे एक रूप या देवीला पूजेदरम्यान मांस आणि मासळीचा नैवेद्य दाखवला जातो. हे मंदिर ओडीशाच्या पुरी स्थित जगन्नाथ मंदिर परिसरात आहे आणि यास शक्तीपीठांमध्ये गणले जाते. दुर्गा पूजेत मंदिरातील पवित्र मार्कंडा तलावात मासे पकडले जातात आणि देवीला अर्पण केले जातात. सकाळी आधी बळी दिलेल्या बकऱ्याचे मटण शिजवून देवीला अर्पण केले जाते. हे दोन्ही पदार्थ बळीची प्रक्रिया पाहणाऱ्यांना प्रसाद म्हणून वाटले जातात. हे तेव्हा होत जेव्हा भगवान जगन्नाथ यांचे दरवाजे उघडलेले नसतात. (Top Stories)

कालीघाट, पश्चिम बंगाल
हा देशातील ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे आणि २०० वर्षे जुने देवस्थान आहे. येथे बहुतांश भक्त देवी कालीला प्रसन्न करण्यासाठी बकऱ्याचा बळी देता. बळी दिल्यानंतर हे मांस शिजवले जाते. आणि भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते. (Social News)

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.