Home » उत्तम कथा आणि कलाकारांच्या दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांचे मनं जिंकणारे ‘हे’ शो टीव्हीवर जास्त काळ धरू शकले नाही तग 

उत्तम कथा आणि कलाकारांच्या दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांचे मनं जिंकणारे ‘हे’ शो टीव्हीवर जास्त काळ धरू शकले नाही तग 

by Team Gajawaja
0 comment
Share

मालिका किंवा भारतीय टेलिव्हिजन हे माध्यम मनोरंजनविश्वातील सर्वात जास्त पोहोचत असलेले माध्यम आहे. देशाच्या छोट्या गावात चित्रपटगृह नसतील, मात्र टीव्ही प्रत्येकाच्या घरी असतो म्हणजे असतोच. त्यामुळे चित्रपटांपेक्षा अधिक लोकप्रिय माध्यम टीव्ही आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अनेकदा लोकं टेलिव्हिजनवर नेहमीच सास बहू ड्रामा असल्यामुळे टीका करतात. मात्र तरीही याच माध्यमाला जास्त पसंती देखील देतात. मात्र मधल्या काही काळापासून टीव्हीचे देखील रुपडे बदललले असून, सास बहु ड्रामाच्या पुढे जाऊन अतिशय विविध आणि हटक्या विषयांवर मालिका बनताना दिसत आहे. मात्र या क्षेत्रात एक काळ असा आला होता, जेव्हा मालिकांमध्ये अभिनय आणि कथांना जास्त महत्व दिले जात होते. प्रेक्षकांना देखील अशा मालिका चांगल्याच आवडत होत्या. मात्र असे असूनही या मालिकेच्या निर्मात्यांनी मालिकांना जास्त न खेचता योग्य वेळेत बंद केले. चला तर जाणून घेऊया त्या मालिकांबद्दल. (television shows)

माही वे

माही वे

‘माही वे’ ही एक विनोदी मालिका होती. या मालिकेचे मुख्य आकर्षण होते, मालिकेतील मुख्य अभिनेत्री. या मालिकेतून बॉडी पॉझिटिव्हिटी आणि बॉडी शेमिंगच्या वाईट परिणामावर भाष्य करत होता. या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. जानेवारी २०१०ला सुरू झालेला हा शो ऑगस्टमध्ये संपला देखील. मालिकेत पुष्टि शक्ति, सिद्धांत कार्णिक, मोनिका खन्ना, किरण जोगी आदी कलाकार मुख्य भूमिकेत होते.(television shows)

रिश्ता डॉट कॉम

रिश्ता डॉट कॉम

केवळ २६ भागांची असलेली ही मालिका कोणत्याही निर्णयाशिवाय नात्याना महत्व देणारी होती. मालिकेत श्रुति सेठ, कवि शास्त्री, हसन जैदी  आदी कलाकार होते. सध्या ही मालिका नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. (television shows)

स्टार बेस्टसेलर

स्टार बेस्टसेलर

हा शो म्हणजे भारतीय टेलिव्हिजन विश्वातील एक नावीन्यपूर्ण प्रयोगच होता. या मालिकेत प्रत्येक भागात वेगवेगळी काठ दाखवली गेली होती. एका भागात एक कहाणी पूर्ण दाखवली जायची. या मालिकेत इम्तियाज अली, टिस्का चोप्रा, इरफान खान, तिग्मांशु धूलिया आणि अनुराग कश्यप आदी लेखक आणि कलाकारांनी मालिकेच्या विविध भागांमध्ये काम केले होते. हा शो १९९९ साली सुरू झाला आणि केवळ एक वर्षातच बंद झाला. सध्या हा शो डिज्नी प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे. (television shows)

पाऊडर

पाऊडर

‘पाऊडर’ हा शो मुंबईतील अंमली पदार्थांच्या व्यापारावर आधारित होता. जानेवारी २००३ मध्ये सुरू झालेला हा शो जून २०१० साली संपला. यात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे मुख्य अधिकारी असलेल्या उस्मान अली मलिक यांची टीम मुंबईतील विविध ड्रग पेडलर्स, त्यांचे लीडर आदींना पकडण्यासाठी प्रयत्न करते. या मालिकेत पंकज त्रिपाठी, मनीष चौधरी, रसिका दुग्गल, राहुल बग्गा आणि जगत रावत आदी दमदार कलाकार होते. (television shows)

=====

हे देखील वाचा – इंडियन आयडल फेम सायली कांबळे अडकली विवाहबंधनात

======

पीओडब्ल्यूः बंदी युद्ध के

पीओडब्ल्यूः बंदी युद्ध के

या शोमध्ये एक अतिशय अद्भुत कहाणी दाखवण्यात आली होती. यात दोन फ़ौजीना कैदेतून सोडण्यात येते आणि त्यांच्या घरी पाठवले जाते. हा शो प्रेक्षकांना खूप आवडला असला तरी तो जास्त काळ टीव्हीवर चालू राहिला नाही. नोव्हेंबर २०१६ साली सुरू झालेला हा शो मार्च २०१७ मध्ये बंद झाला. शोमध्ये पूरब कोहली, मनीष चौधरी, अमृता पूरी, संध्या मृदुल आदी कलाकार होते. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.