मनोरंजनविश्वात काम करताना कलाकार बक्कळ पैसा कमावतात. या क्षेत्रात तुम्हाला नेम, फेम, मनी सर्वच गोष्टी अमाप मिळतात. असे असूनही हे क्षेत्र नेहमीच बेभरवशाचे मानले जाते. या क्षेत्रात तुम्ही कायम यशस्वीच व्हाल याची ग्यारंटी कोणालाच नसते. त्यामुळे कलाकार नेहमीच अभिनय करत असताना आपला एक वेगळा व्यवसाय देखील करताना दिसतात. अनेक कलाकार हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत, अनेक कलाकार आपला स्वतःचा मेकअप ब्रँड चालवताना दिसतात, अनेकांचा फिटनेस ब्रँड आहे, कोणी फूड इंडस्ट्रीमध्ये आहे. एकूणच काय कलाकार या क्षेत्रात काम करताना इतर दुसऱ्या क्षेतारत देखील सक्रिय असतात. अनेक बॉलिवूड कलाकारांचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे. जो अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय देखील आहे. चला जाणून घेऊया त्या कलाकारांबद्दल ज्यांचा कपड्यांचा ब्रँड आहे.
शाहिद कपूरने २०१६ मध्ये त्याच्या कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला होता. ‘Scalt’ असे शाहिदच्या ब्रँडचे नाव आहे. या ब्रँडचे कपडे Myntra, Amazon आणि Flipkart सारख्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.
हृतिक रोशनचा स्वतःचा HRX नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे जो त्याने २०१३ मध्ये लॉन्च केला होता.
आलिया भट्टचा ॲड-ए-मम्मा नावाचा इको-फ्रेंडली फॅशन ब्रँड आहे. आलियाने २०२० मध्ये हा ब्रँड लॉन्च केले होते. या कपड्यांच्या ब्रँडमध्ये २ ते १२ वयोगटातील मुलांचे कपडे मिळतात.
सोनम कपूरने तिची बहीण निर्माती रिया कपूरसोबत २०१७ मध्ये ‘रीसन’ नावाचा फॅशन ब्रँड लॉन्च केला.
सैफ अली खानने देखील त्याचा २०१८ मध्ये कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला होता. त्याच्या फॅशन ब्रँडचे नाव हाऊस ऑफ पतौडी आहे.
अभिनेत्री आणि निर्माती असलेल्या अनुष्का शर्माचा देखील ‘नुश’ नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे.
बॉलीवूडच्या दबंग खानचा म्हणजेच सलमान खानच्या कपड्यांचा ब्रँड बीइंग ह्युमन नावाचा प्रसिद्ध ब्रँड आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोणने २०१५ मध्ये Myntra च्या सहकार्याने All About You नावाचा फॅशन ब्रँड सुरू केला.