Home » आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी जिंकले अवार्ड्स!

आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी जिंकले अवार्ड्स!

by Team Gajawaja
0 comment
IPL Player Awards
Share

आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा किताब चेन्नई सुपर किंग्सने पटकावला आणि पाचव्यांदा ट्रॉफी पटकावण्याचा पराक्रम करणारी दुसरा संघ ठरला. मुंबईच्या पाच जेतेपदांची बरोबरी करण्यात चेन्नईच्या संघाला यश मिळाले. गुजरातविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत किताब आपल्या नावावर केला. पावसाच्या अडथळ्यामुळे सामना काही वेळ थांबला होता परंतु पाऊसानंतरचेन्नईने जोरदार मुसंडी मारत विजयी पंजा लगावला.(IPL Player Awards)

चेन्नईला अंतिम षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती. पहिल्या चार चेंडूत मोहित शर्माने अप्रतिम यॉर्कर टाकत केवळ ३ धावा दिल्या. शेवटच्या दोन चेंडूत चेन्नईला विजयासाठी १० धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर जडेजाने सरळ फटका मारत षटकार लगावला. आता शेवटच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी चौकाराची गरज होती. मोहित शर्माने लेग स्ट्म्पवर टाकलेल्या चेंडूला जडेजाने फाईनलेगला टोलवत चौकार लगावला अन चेन्नईच्या गोटात एकच जल्लोष बघायला मिळाला.(IPL Player Awards)

सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेन्टेशन मध्ये आयपीएलच्या या हंगामातील विविध अवार्ड्सचे वितरण करण्यात आले. चेन्नईला जेतेपदाची ट्रॉफी तसेच विजयी रक्कम प्रदान करण्यात आली. जेतेपदासह चेन्नईला तब्बल २० कोटी रुपयांची घसघशीत रक्कम मिळाली. रनरअप राहिलेल्या गुजरातला १२.५ कोटी रुपयांची रक्कम देवून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच अंतिम सामन्यातील अप्रतिम कामगिरीमुळे कॉनवेला सामनावीराचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.(IPL Player Awards)

ऑरेंज कॅपचा मान शुभमन गिलला मिळाला. त्याने या हंगामात १७ सामन्यांत ८९० धावा फटकावल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत तो अव्वल स्थानावर राहिला. एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा रेकॉर्ड मात्र त्याला मोडता आला नाही. एका हंगामात सर्वाधिक ( ९७३ ) धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर अबाधित आहे. त्याचबरोबर स्टार भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने यंदाच्या हंगामात सर्वाधिक बळी मिळवण्याचा पराक्रम केला. १७ सामन्यात २८ बळी मिळवत त्याने पर्पल कॅपवर आपला हक्क सांगितला.(IPL Player Awards)

ऑरेंज कॅपसोबतच शुभमन गिलने अजूनही बऱ्याच पुरस्कारांना गवसणी घातली. यामध्ये हंगामात सर्वाधिक चौकार मारण्यासाठी दिला जाणारा अवार्ड, मोस्ट व्हलुअबल प्लेयर ऑफ द सीजन अवार्ड, ड्रीम इलेव्हन गेमचेंजर ऑफ द सीजन अवार्ड आणि मॅच ऑफ द सिरीज अवार्ड आदी अवार्ड्सचा समावेश आहे.

========

हे देखील वाचा : पाचवा आयपीएल किताब जिंकत चेन्नईच ठरली किंग !

========

इडन गार्डन्स आणि वानखेडे स्टेडीयमला बेस्ट व्हेन्यू ऑफ द सीजनचा अवार्ड प्रदान करण्यात आला. ११५ मिटर लांब षटकार लगावून फाफ डू प्लेसीने लॉंगेस्ट सिक्स ऑफ द सीजन अवार्ड आपल्या नावे केला. राशीद खानने कॅच ऑफ द सीजन तर ग्लेन मॅक्सवेलने सुपर स्ट्राईकर ऑफ द सीजनचा अवार्ड आपल्या नावे केला. चांगल्या खेळासाठी दिला जाणारा फेअर प्ले अवार्ड दिल्लीच्या संघाला प्रदान करण्यात आला.(IPL Player Awards)

यंदाच्या हंगामात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या युवा यशस्वी जयस्वालला एमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजनच्या अवार्डने गौरविण्यात आले. त्याने या हंगामात उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना सादर करत १४ सामन्यात ६२५ धावा ठोकल्या ज्यामध्ये एका शतकाचा देखील समावेश आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.