Home » Nepal : तुमच्या घरातही असतील ‘या’ नेपाळी ब्रँड्सच्या वस्तू

Nepal : तुमच्या घरातही असतील ‘या’ नेपाळी ब्रँड्सच्या वस्तू

by Jyotsna Kulkarni
0 comment
Nepal
Share

नेपाळमध्ये ४ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारने फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. यामागचे कारण म्हणजे, या कंपन्यांनी नेपाळच्या माहिती आणि दळणवळण मंत्रालयाकडे नोंदणी केली नव्हती. मात्र नेपाळ सरकारच्या या निर्णयामुळे तरुणांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या नाराजीमुळेच नेपाळमध्ये ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी काठमांडूतील मैतीघर परिसरात आंदोलन सुरू झाले. (Marathi News)

निदर्शकांनी संसद भवनावर चाल केली, काहींनी बॅरिकेड्स तोडून संसदेत प्रवेश केला आणि रुग्णवाहिका जाळली. पुढे हे आंदोलन काठमांडूसह इटहरी, बिराटनगर, भरतपूर, पोखरा आणि बुटवल येथे पसरले. नेपाळमध्ये सुरु असलेले हे आंदोलन “Gen Z आंदोलन” म्हणून ओळखले जात आहे. याचे कारण म्हणजे, तरुण आणि विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान सध्या नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्यात आली असली तरी तरुणांकडून आंदोलन सुरु ठेवले आहे. (Nepal Protest News)

नेपाळ हा जरी छोटा देश असला तरी या देशाला निसर्गाने सौंदर्याचे भरभरून वरदान दिले आहे. लोभस निसर्ग आणि प्राचीन मंदिर ही या देशाची खास ओळख आहे. नेपाळ छोटा असला तरी नेपाळमधील काही ब्रँड्स संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. या देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, सेवा, रेमिटन्स आणि पर्यटनावर अवलंबून आहे. आज नेपाळ जरी अशांत असले तरी या देशातील काही कंपन्या आपापल्या क्षेत्रामध्ये जगभरात घट्ट पाय रोवून उभ्या आहेत. जाणून घेऊया नेपाळमधील जगप्रसिद्ध कंपन्या. (Todays Marathi Headline)

वाई वाई नूडल्स
नेपाळची सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी सीजी कॉर्प ग्लोबल, ज्याला चौधरी ग्रुप म्हणूनही ओळखले जाते, तिच्या वाई वाई नूडल्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हा इन्स्टंट नूडल ब्रँड नेस्लेच्या मॅगी आणि आयटीसीच्या यिप्पीला भारतातही कडक स्पर्धा देत आहे. (Top Marathi Headline)

Nepal

इलाम चहा
नेपाळचा इलाम चहा जगातील अनेक भागात त्याच्या गुणवत्तेसाठी ओळखला जातो. नेपाळ टी कलेक्टिव्ह विशेषतः अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये सेंद्रिय नेपाळी चहा निर्यात करते. याशिवाय, हिमालयीन हर्बल उत्पादने देखील वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. (Latest Marathi News)

Nepal

यती आणि बुद्धा एअरलाईन्स
नेपाली एविएशन कंपन्या या घरगुती उड्डाणासाठी ओळखल्या जातात. यती एअरलाईन्स आणि बुद्धा एअर हिमालयात भटकंती करणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वात खास आहेत. माऊंट एव्हरेस्टच्या वरतून उड्डाण हे या कंपन्यांचे आकर्षण आहे. (Top trending News) 

Nepal

=========

Nepal : भारतावर ताबा मिळवणाऱ्या मुघलांना नेपाळ का जिंकता आला नाही?

Nepal : त्रिकोणी राष्ट्रध्वज असणारा एकमेव देश

=========

खुकरी रम
खूखरी रम ही जगभरात विशेष लोकप्रिय आहे. जगातील अनेक देशात हा ब्रँड विक्री करण्यात येतो. खुकरी रमची सुरुवात 1959 साली नेपाळमध्ये झाली होती. हा नेपाळचा पहिला डार्क रूम ब्रँड म्हणून ओळखल्या जातो. जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, इटली, अमेरिका, ऑस्ट्रेलियात या रमचे सर्वाधिक प्रेमी आहेत. (social news)

Nepal

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.