Home » May : १ मे पासून एटीएमपासून सिलेंडरपर्यंत ‘हे’ नियम बदलणार

May : १ मे पासून एटीएमपासून सिलेंडरपर्यंत ‘हे’ नियम बदलणार

by Jyotsna Kulkarni
0 comment
May
Share

महिन्याची पहिली तारीख सगळ्यांसाठीच खूप खास असते. कारण या दिवशी नोकरदार वर्गाचा बहुप्रतीक्षित पगार या दिसव्ही होतो. त्यामुळे ही तारीख सगळ्यांसाठीच विशेषतः नोकरदार वर्गासाठी खूपच महत्वाची असते. मात्र आता लवकरच मे महिन्याची १ तारीख येणार आहे ही सर्वच लोकांसाठी खूपच महत्वाची असणार आहे. कारण या दिवशी अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. (May)

१ मे २०२५ पासून आपल्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारे काही महत्त्वाचे बदल काही नियम लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर आणि दैनंदिन सेवांवर होणार आहे. यामध्ये बँक खाती, एटीएम व्यवहारांसह अनेक नियमांचा समावेश आहे. त्यामुळे ही तारीख खऱ्या अर्थाने महत्वाची असणार आहे. मग नक्की कोणते बदल आणि कोणते नियम १ मे पासून लागू होणार आहेत, ते जाणून घेऊया. (Marathi News)

रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये बदल
रेल्वे मंत्रालयाने १ मे पासून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता नवीन नियमानुसार तिकीट बुक करावे लागणार आहे. वेटिंग तिकिट असलेल्या प्रवाशांना आता स्लीपर किंवा एसी कोचमध्ये प्रवास करता येणार नाही. वेटिंग तिकिटावर प्रवास फक्त सामान्य डब्यांमध्येच करणे बंधनकाbरक असणार आहे. आगाऊ आरक्षणाचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तिकीट बुकिंग, रद्द करणे आणि तत्काळ कोट्याशी संबंधित शुल्क देखील वाढू शकते. (Marathi Latest News)

May

एटीएममधून पैसे काढणे महागणार
आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, एटीएममधून पैसे काढणे आणि इतर सेवांवरील शुल्क वाढवले जाणार आहे. १ मे पासून, जर तुम्ही मोफत व्यवहाराची मर्यादा पार केली तर तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी, पैसे जमा करण्यासाठी किंवा बॅलन्स तपासण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. रोख पैसे काढण्याचे शुल्क आता प्रति व्यवहार १७ रुपयांवरून वाढवत १९ रुपये वाढवण्यात आले आहे. तर बॅलन्स चेकवरील शुल्क प्रति व्यवहार ६ रुपयांवरून ७ रुपये करण्यात येणार आहे. तसेच, ठेवी आणि मिनी स्टेटमेंट सारख्या सेवांवर अतिरिक्त शुल्क देखील लागू होऊ शकते. (Marathi Trending News)

May

गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल
१ मे रोजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची किंवा सिलेंडरच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. या सिलेंडरच्या बदलणाऱ्या किंमतींचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या महिन्याच्या बजेटवर आणि खिशावर होईल यात शंका नाही.

May

एफडी आणि बचत खात्याच्या नियमांमध्ये बदल
१ मे २०२५ पासून, फिक्स डिपॉझिट अर्थात मुदत ठेव (FD) आणि सेविंग अकाऊंट अर्थात बचत खात्याशी संबंधित नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहे. व्याजदरांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता सांगितली जात आहे. दरम्यान आतापर्यंत बँकांनी एफडी आणि बचत खात्याच्या व्याजदरांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. (Top Stories)

May

=======

हे देखील वाचा : Electricity : ‘या’ सोप्या टिप्स वापरून कमी करा विजेचे बिल

Golconda Blue Diamond : गोलकोंडा ब्लू डायमंडचा होतोय लिलाव !

=======

आरआरबीचे विलीनीकरण
देशातील आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान, या ११ राज्यांमधील प्रादेशिक ग्रामीण बँकांचे (RRBs) विलीनीकरण करण्यात येणार आहे. या विलनीकरणाची प्रक्रिया जवळपास संपुष्टात आली आहे. या राज्यांमध्ये १ मे २०२५ पासून “एक राज्य, एक आरआरबी” धोरण लागू केले जाईल. या उपक्रमाचे उद्दिष्ट बँकांची कार्यक्षमता वाढवणे आणि खर्च कमी करणे आहे. (Social News)

May


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.