प्रत्येकाच्या घरात सकाळी उठल्यावर ‘अरे मला रात्री अमुकच्या घोरण्यामुळे झोपच येत नव्हती. झोप लागली की जोरात घोरण्याचा आवाज यायचा आणि जग यायची. माझी झोपच झाली नाही.’ असे संभाषण खूपच सामान्य आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आपल्याला घरातील प्रत्येकाच्या चांगल्या वाईट सवयी माहित असतात. घरातील घोरणाऱ्या व्यक्तीला नेहमीच टोमणे मारले जातात किंवा हसले जाते. मात्र झोपेत घोरणे ही समस्या खूपच सामान्य आहे.
घोरणे ही समस्या जरी सामान्य असली तरी तो एक आजार किंवा गंभीर आजार देखील असू शकतो. त्यामुळे यावर वेळेत उपचार होणे महत्वाचे असते. सोप्या भाषेत जी व्यक्ती घोरते तिचे नाक बंद होते आणि ती तोंडाने श्वास घेते त्यामुळे आवाज होतो आणि आपण त्याला घोरणे म्हणतो. व्यक्ती गाढ झोपेत गेल्यावर घोरायला लागते. जवळ झोपलेल्या व्यक्तीला काळजी वाटू लागते किंवा तिला या घोरण्याचा त्रास देखील होतो. घोरण्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
घोरण्याचे कारण
घोरण्याच्या समस्येमागे अनेक कारणे आहेत. लठ्ठपणा, नाक आणि घशाचे स्नायू कमकुवत होणे, सर्दी, धूम्रपान, श्वसन समस्या, फुफ्फुसात योग्य ऑक्सिजनची कमतरता आणि सायनसची समस्या ही त्याची सुरुवातीची कारणे आहेत.
घोरण्याच्या समस्येवर घरगुती उपाय
हळद
हळद ही त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी उत्तम औषधं आहे. नाक साफ करायला हळदीचा उपयोग केला जातो. नाक साफ झाल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत नाही आणि त्यामुळे व्यक्ती घोरत नाही. म्हणून रोज रात्री झोपताना हळदीचे दूध घेणे खूप फायदेशीर आहे.
ऑलिव ऑइल
ऑलिव ऑइलमुळे घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. ऑलिव ऑइलने नाक साफ केल्यास श्वास घेण्यास मदत होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव ऑइलचे दोन तीन थेंब नाकात घालून झोपल्यास घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
देशी तूप
नाक साफ नसल्यास तुम्हाला घोरण्याची समस्या उदभवू शकते. त्यामुळे नाक साफ असणे फार गरजेचे आहे. रोज झोपण्यापूर्वी देशी तूप जरा कोमट गरम करून नाकात टाकल्याने घोरण्याची समस्या कमी होते.
लसून
घोरण्याच्या समस्येवर लसून हा उत्तम उपाय आहे. लसणाचे सेवन केल्यामुळे घोरण्याची समस्या दूर होऊ शकते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत दोन तीन लसून खा.
पुदीना
पुदीना पाण्यामध्ये टाकून उकळून घ्यावा. त्यानंतर हे पाणी कोमट करावे आणि त्या पाण्याने गुळण्या कराव्या. हे पाणी प्यायले तरी याचा खूप फायदा होऊ शकतो. रोज रात्री हा उपाय केल्यास काही दिवसात घोरण्याची समस्या कमी होईल.
हळद आणि मध
रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात एक चमच हळद आणि एक चमचा मध याचे चाटण बनवा आणि त्याचे सेवन करा. रोज काही दिवस हे केल्याने तुमची घोरण्याची समस्या कमी होईल.
==========
हे देखील वाचा : किवी खाल्ल्याने आरोग्यास होणारे फायदे माहित आहे का…?
==========
वेलची पावडर
रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात वेलची पावडर टाकून ते पाणी प्या. याचाही खूप फायदा होतो.
दालचिनी पावडर
कोमट पाण्यामध्ये दालचिनी पावडर टाकून ते पाणी प्यायल्याने देखील घोरण्याच्या समस्येमध्ये आराम मिळू शकतो.
वाफ घेणे
रोज रात्री झोपण्यापूर्वी वाफ घेतल्याने देखील नाक साफ होऊन घोरण्याच्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
(टीप : या लेखातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या)