प्रत्येक पूजेवेळी आराध्यदैवत म्हणून मानल्या जाणाऱ्या गणपतीपुढे आपण नेहमीच नतमस्तक होत असतो. महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपती ते प्रत्येक गल्लोगलीत असलेल्या गणपतीच्या मुर्ती समोर आपले हात आपोआपच जोडले जातात. आपल्या मनातील इच्छा, आपल्यावर आलेले संकट दूर कर आणि तुझे आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे अशीच प्रार्थना बहुदा प्रत्येकाकडून गणपतीपुढे केली जात असेल. परंतु आपल्या देशात उत्तर टोकापासून ते दक्षिण टोकापर्यंत आणि पूर्व टोकापासून ते पश्चिम टोकापर्यंत गणतपीतीच लहानमोठी आणि प्रसिद्ध-अप्रिद्ध अशी अनेक देवळे आहेत. या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी शिवमंदिर असते किंवा देवीचे मंदिरिर असते तेथे मुख्य दैवताव्यतिरिक्त आणखी अनेक लहान लहान मुर्त्या असतात. त्यातच एखादीतरी गणेशमूर्ती असते. शिवाय गणपतीची (Ganpati) स्वतंत्र एकच मुर्ती असलेली ही असंख्य मंदिरे ही भारतातील विविध तीर्थांवर आणि गावोगावी आहेत. मात्र महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींशिवाय तुम्ही ‘या’ काही गणपतींच्या स्थानांना कधी भेट दिली आहे का? तर पहा अशी कोणती स्थानं आहेत जेथे तुम्ही भेट देऊ शकता.
-चिंचवडचा सिद्धिविनायक
मोरया गोसावी यांनी स्थापन केलेला हा गणपती नदीच्या काठावर विराजमान झालेला आहे. मार्गशीर्ष महिन्यात येथे यात्रा भरते. चिंचवडचा सिद्धिविनायक हे जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते. येथे मोरया गोसावी यांची समाधी सुद्धा आहे. हे क्षेत्र पुण्यापासून २० मैलांवर आहे.

-सूर्यविनायक गणेश
नेपाळ मधील काठमांडू येथून ८ मैलांवर असलेल्या भाटगांव येथे गणेशक्षेत्र आणि सिद्ध पोखरी नावाचे तीर्थ (सरोवर) आहे. गणेश मंदिर हे भव्य असून समोरच एक स्तूप व त्यावर कलाकृती आहे. त्या कमळावर गणपतीचे (Ganpati) वाहन उंदीर आहे.
हे देखील वाचा- समाधी डोंगरामधी पाही।
-हिम गणेश (अमरनाथ)
भारताच्या अगदी उत्तर टोकाला, कश्मिरच्या ही उत्तरेस समुद्ग सपाटीपासून जवळजवळ १६ हजार फूट उंचीवर एक बर्फाचेच नैसर्गिक स्वयंभू शिवलिंग आङे. त्याला व त्या स्थळाला अमरनाथ असे म्हटले जाते. हे शिवलिंग आपोआपच उंच वाढते किंवा कमी होते. या शिवलिंगाच्या बाजूलाच आणखी दोन नैसर्गिक बर्फाकृती आहेत. त्यापैकी एक पार्वती व दुसरी आकृती म्हणजे गणपती असे मानतात. अमरनाथला जाणारे भाविक हे हिमगणेशाचे दर्शन आवर्जुन घेतात.
-श्वेतगणेश
तंजवार जिल्ह्यात तिरुवळंचुली येथील कपर्दिश्वर मंदिरात हा गणपती आहे. समुद्रमंथाच्या वेळी देवी गणपती पूजन करायला विसरले. तेव्हा अमृताऐवजी त्यांच्या हाती विष आले. तेव्हा त्यांना आपली चूक कळली आणि त्यांनी या ठिकाणी गणपतीची मूर्ती स्थापन केली आहे. श्वेतगणेशाच्या येथे विनायक चतुर्थीला यात्रा भरते.

-ढोल्यागणपती
सातारा येथील किल्ल्यानजीकच एक गणपतीचे मंदिर आहे. त्या मंदिरातील मूर्तीला ढोल्या गणपती असे म्हणतात.
हे देखील वाचा- भगवान बुद्धांसंबंधित ‘या’ काही गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?
दरम्यान, महाराष्ट्रात जसे अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. तसेच भारताचे रक्षक म्हणून आठ दिशांना आठ गणपती प्रसिद्ध आहेत. त्यानुसार, मयुरेश्वर (मोरगांव), एकदंत (केरळ), महोदर (रामेश्वर जवळ), गजानन (तंजावर), लंबोदर (गणपतीपुळे), विकट (कश्मीर), विघ्नराज (हिमालय) आणि धूम्रवर्ण (तिबेट).