पुन्हा एकदा केवळ निवडणुकीतच नाही तर त्यानंतरच्या मुत्सेद्देगिरीतही नितीश कुमार यांनी बाजी मारली आहे. ह्यावेळीही भाजपपेक्षा कमी जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची ही नितीश कुमार यांच्याकडेच राहिली आहे. महत्वाचं म्हणजे विक्रमी १० वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नितीश कुमार संपूर्ण भारतातातील सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे आता बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज असेल यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. पण एकूणच भारताच्या राजकारणाचा विचार करता नितीश कुमार यांच्यापेक्षाही जास्त वेळ मुख्यमंत्रीपद सांभाळणारे आणि त्या त्या प्रदेशांवर एकतर्फी अंमल बजवणारे चेहरे होऊन गेले आहेत. त्यामुळे जरी १० वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी नितीश कुमार यांचा कार्यकाळ या नेत्यांपेक्षा अजूनतरी कमीच आहे. म्हणूनच जाणून घेऊया सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद सांभाळलेले भारतातील टॉप ५ मुख्यमंत्री…(Nitish Kumar)
तर थेट सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या नेत्यांची यादी पाहायची झाली तर यात सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनसिंग चामलिंग. पवनसिंग चामलिंग यांनी तब्बल २४ वर्षे १६५ दिवस आणि ते ही सलग सिक्कमच मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं. या कारकिर्दीत त्यांनी सिक्कीमला एक राजकीय स्थैर्य दिलं. ज्यामुळे त्यांना अनेक योजनांची नुसतीच घोषणा नं करता त्या संपूर्ण डिलिव्हर करता आल्या. त्यातीलच एक योजना म्हणजे सिक्कीमला संपूर्ण ऑरगॅनिक शेतीचं राज्य करण्याची. स्वतः शेतकरी असलेल्या पवनसिंग यांनी सलग १५ वर्षे या योजनेवर काम केलं आणि आज सिक्कीम भारतातील एकमेव संपूर्ण ऑरगॅनिक स्टेट आहे.

सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद सांभाळण्याच्या यादीत दुसरा नंबर लागतो तो ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा. त्यांनीही सलग २४ वर्षे २४ दिवस ओडिशावर आपली सत्ता राखली. २००० ते २०२४ च्या काळात नवीन बाबू ओडिशाचे मुख्यमंत्री होते. त्यांनी स्वतःचा बिजू जनता दल हा पक्ष काढला होता आणि या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपली सत्ता राखली होती. मात्र २०२४ च्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला आणि त्यांची सत्तेवरील पकड सुटली. महत्वाची गोष्ट म्हणजे एक मागास आणि नैसर्गिक आपत्तींनी ग्रस्त असलेल्या ओडिशामध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या सुधारणा केल्या. विशेषतः त्यांनी निर्माण केलेल्या आपत्ती व्यस्थापनाच्या मॉडेलमुळे ओडिशामध्ये चक्री वादळामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी झाले.
सर्वाधिक काळ मुख्यमंत्री सांभाळणाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत पुन्हा एकदा पूर्वेकडीलच राज्याचे बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बासू. ज्योती बसू यांनी २३ वर्षे (१९७७-२०००) पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून काम केले, जे देशातील सर्वात जास्त काळ सलग मुख्यमंत्री राहिलेल्यांपैकी एक होते. माकपचे दिवंगत नेते बसू यांनी सलग अनेक वेळा डाव्या आघाडीच्या सरकारचे नेतृत्व केले. कम्युनिस्ट पक्षाचा सुवर्णकाळ म्हणून बसू यांच्या राजवटीकडे पाहिलं गेलं. आपल्या वैचारिक निष्ठा आणि स्पष्टतेमुळे ते राष्ट्रीय व्यक्तिमत्व बनले. एवढे की १९९६ मध्ये त्यांना पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती मात्र त्यांनी ते पंतप्रधानपद नाकारले. ज्योती बसू यांचा प्रभाव एवढा राहिला कि त्यांच्या exit नंतरही दशकभर डाव्यांचा बंगालमध्ये एकहाती प्रभाव कायम होता.(Nitish Kumar)
चौथा आणि पाचवा नंबरही पूर्वेकडेच आहे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद संभाळण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत अरुणाचलचे दिग्गज नेते गेगांग अपांग आणि पाचव्या क्रमांकावर आहेत मिझोरमचे दिग्गज लाल थनहवला. आधी अपांग यांच्याबद्दल जाणून घेऊ. १९८० ते २००० च्या दशकापर्यंतच्या विविध कार्यकाळात गेगोंग अपांग यांनी २२ वर्षांहून अधिक काळ अरुणाचल प्रदेशवर राज्य केले. प्रामुख्याने काँग्रेसशी संबंधित असलेले अपांग नंतर भाजपमध्ये गेले होते. त्यांना ईशान्येकडील सर्वात प्रमुख राजकीय मुत्सद्यांपैकी एक मानले जाते. अगदी नितीश कुमार यांच्यासारखेच ती वेळेवर पलटी मारून आपली सत्ता राखत. आजही राजकारणात सक्रिय असलेल्या अपांग यांनी आता भाजपाचीही साथ सोडली आहे.
पाचव्या क्रमांकावर असलेले लाल थनहवला यांनी मिझोरमध्ये आपला अंमल चालवला. लाल थनहवला यांनी सलग पाच वेळा २२ वर्षांहून अधिक काळ मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले त्यांनी १९८० ते २०१८ पर्यंत राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवले. थनहवला हे ईशान्येकडील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. मात्र आता मिझोरममध्ये त्यांचं वर्चस्व किती राहिलं आहे याची शंख आहे कारण त्यांचा पक्ष काँग्रेसच अस्तित्वासाठी झगडत आहे.
===============
हे देखील वाचा : Startup Funding : स्टार्टअप सुरू करण्याचे स्वप्न होणार पूर्ण! सरकारी योजना देणार 1 कोटींची फंडिंग, जाणून घ्या संपूर्ण माहिती
================
तर हे झाले टॉप फाईव्ह मुख्यमंत्री ज्यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्र्यांची खुर्ची पकडून ठेवली. या उडीत अजून एक महत्वाचं नाव घेतलं जातं ते म्हणजे त्रिपुराचे माणिक सरकार यांचं. माणिक सरकार यांनी जवळजवळ २० वर्षे (१९९८-२०१८) त्रिपुरावर राज्य केले, जे भारतातील सर्वात जास्त एकसलग राहिलेल्या कार्यकाळांपैकी एक होते. “सर्वात स्वच्छ” मुख्यमंत्री आणि अत्यंत साधी जीवनशैली म्हणून ख्याती असलेले सरकार माकपचे एक दिग्गज नेते होते. मात्र २०१८ मध्ये सरकार सरकार यांच्या पराभवाने राज्यातील डाव्या राजवटीचा दोन दशकांचा अंत झाला आणि डावे त्रिपुरामध्ये अस्तित्वसाठी झगडत आहेत.(Nitish Kumar)
यानंतर नितीश कुमार यांचा विचार करता बिहारचे ९ वेळा मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार यांनी गुरुवारी राजभवन येथे १० व्यांदा शपथ घेतली आहे. नितीश २००५ पासून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. पुढे २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचा मोठा पराभव झाल्यानंतर त्यांनी जितन राम मांझी यांना या पदावर बसवले होते मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आपल्या हातात घेतली. नितीश यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला तर ते टॉप फाइव्ह मध्येही जाऊ शकतात. मात्र या सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्याना एक शापही राहिला आहे तो म्हणजे त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षाची संपूर्ण वाताहत झाली आहे. आता नितीश कुमार यांचीही हीच हालत होणार कि ते हे शाप टाळू शकणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.
