प्रत्येक जणं आपापल्या परीने स्वतःची काळजी घेत असतो. मात्र ज्यांची त्वचाच तेलकट असते अशांना त्वचेची जरा जास्तच काळजी घेणे आवश्यक असते. कारण तेलकट त्वचा असलेल्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. चेहऱ्यावर मुरुमे, ब्लॅकहेड्स, पिंपल्ससारख्या समस्या उद्भवतात. त्यात पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता जास्त असते. अशा वातावरणात तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींना त्वचेच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर देखील मोठा परिणाम होतो. वातावरणातील आर्द्रतेमुळे त्वचेचे छिद्र बंद होतात, ज्यामुळे त्वचेवर अधिक घाण जमा होऊ लागते. (Beauty Tips)
तज्ज्ञांच्या मते तेलकट त्वचा असणे पूर्णपणे वाईट नाही. कारण सेबम आणि सेबेशियस या ग्रंथी चरबी आणि नैसर्गिक तेल तयार करण्याचे काम करतात. ज्यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि ती कोरडी होत नाही. तेलकट त्वचेमध्ये जास्त प्रमाणात सेबम तयार होते आणि त्वचेखालील तेल ग्रंथी जास्त सक्रिय असतात. यामुळे त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात आणि चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात. यामुळे चेहरा विचित्र दिसू लागतो. सणासुदीच्या दिवसात देखील आपल्याला चांगले दिसणायसाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तेलकट त्वचेपासून सुटका करून घेण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय सांगणार आहोत. (Marathi Trending News)
तेलकट त्वचेसाठी ऑइल फ्री मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचेची छिद्रे बंद होत नाहीत किंवा मुरुम येत नाहीत. जेव्हा त्वचा उन्हामुळे कोरडी होते, तेव्हा ती जास्त प्रमाणात सेबम तयार करून यावर प्रतिक्रिया देते. दररोज SPF 30+ असलेले सनस्क्रीन वापरल्यास त्वचा कोरडी किंवा तेलकट होण्यापासून वाचू शकते. याशिवाय आठवड्यातून किमान दोनदा एक्सफोलिएटिंग फेस मास्क वापरा. तेलकट त्वचा असलेल्यांनी टोनरचा वापर केल्याने त्वचेची अधिक खोलवर स्वच्छता होते आणि चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होतो. (Marathi News)
जर तुम्ही दिवसभर ब्लॉटिंग पेपर वापरला तर त्वचेवरील जास्तीचे तेल काढण्यास मदत होते. हा पेपर जास्तीचे तेल शोषून घेतो. निरोगी त्वचेसाठी चेहरा नियमितपणे धुणे आवश्यक असले तरी, जास्त धुण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. एक हलका क्लीन्सर त्वचेला स्वच्छ करण्यासोबतच तिला ओलावा देतो आणि आराम देतो. यासोबतच तुम्ही खालील उपाय देखील करू शकता. (Todays Marathi Headline)
मुलतानी माती
मुलतानी मातीचा फेस पॅक तेलकट त्वचेसाठी उत्तम उपाय आहे. मुलतानी मातीचा फेस पॅक चेहऱ्यावर आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावल्याने नक्कीच फरक पडेल. मुलतानी मातीची पेस्ट बनवण्यासाठी पाण्याऐवजी गुलाबपाणी वापरल्यास देखील लाभ होतो. (Top Marathi Stories)
गुलाबपाणी
गुलाबपाणी एक नैसर्गिक टोनर आहे. गुलाब पाण्यामुळे त्वचा फ्रेश होते. तसेच गुलाबपाण्याच्या नियमित वापरामुळे पोर्स अधिक घट्ट होतात. पावसाळ्यात तर आवर्जून तुम्ही गुलाबपाणी चेहऱ्यावर लावायला हवे. त्वचा मऊ होण्यासाठी गुलाबपाणी सगळ्यात प्रभावी उपाय आहे. (Top Marathi Headline)
कडुलिंबाचे फेसपॅक
कडुलिंब एंटीसेप्टीक आणि एंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट करून पिंपल्सची समस्या कमी करतात. यासाठी तुम्ही कडूलिंबाची पानं बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. तयार फेसपॅक तुम्ही तेलकट त्वचेवर लावू शकता. (Top Trending News)
तांदळाचा फेस पॅक
एका भांड्यात २ चमचे मध आणि २ चमचे तांदूळ पावडर घेऊन त्याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 15 मिनिटे तसेच राहू द्या. या पॅकमुळे ग्लोइंग स्किन मिळते आणि चेहऱ्यावरील तेल नियंत्रणात ठेवण्यासाठी हा राइस फेस पॅक आठवड्यातून दोनदा वापरा. (Top Marathi News)
बेसन, लिंबू, दुध फेस पॅक
हा फेस मास्क तयार करण्यासाठी, एक चमचे बेसन एक चमचे दूध आणि अर्धा लिंबू रस एकत्र करा. ही तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. फेस मास्क कोरडा होऊ द्या आणि थंड पाण्याने धुवा. बेसनामध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात जे त्वचेतील मृत पेशी आणि इतर अशुद्धी काढून टाकतात. (Latest Marathi News)
========
Health Care : शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी या फूड्सचे करा सेवन, रहाल तंदुरुस्त
========
गुलाबपाणी आणि मध
गुलाबपाणी त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल स्वच्छ करण्यासाठी गुलाबपाणीमध्ये थोडे मध मिसळावे. ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा. (Top Stories)
काकडी आणि मध
काकडी आणि मधामध्ये अनेक घटक असतात जे त्वचेला आराम देतात. एका भांड्यात किसलेली काकडी घ्या आणि त्यात २ टेबलस्पून मध मिसळा. आता ते चांगले मिक्स करा आणि नंतर चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर तर चमक येईल सोबतच चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics