Home » ज्वारी खाण्याचे फायदे ऐकाल तर व्हाल चकित

ज्वारी खाण्याचे फायदे ऐकाल तर व्हाल चकित

by Jyotsna Kulkarni
0 comment
Jowar Roti
Share

आपल्या भारतामध्ये विविध प्रकारची अनेक धान्य खाल्ली जातात. यामध्ये मुख्यत्वे गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, नाचणी आदी अनेक धान्यांचा समावेश होतो. ही सर्व धान्ये आपल्या शरीराच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर फायदेशीर आहेत. ही धान्ये खाण्याचे विविध फायदे आहेत. जे आपण ऐकले तर आपल्याला आश्चर्य नक्कीच वाटेल.

२०१८ साली भारतात ईयर ऑफ मिलेट्स साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रानेही २०२३ साली आंतरराष्ट्रीय ईयर ऑफ मिलेट्स साजरा करण्याची घोषणा केली. मिलेट्स म्हणजे भरड धान्य यात बाजरी, ज्वारी, रागी यासारखे धान्य सामील आहेत. हे धान्य आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यातले ज्वारी हे धान्य इतर सर्वच धान्याच्या तुलनेत खूपच जास्त लाभदायक आहे. त्यातही जर आपण हिवाळ्यात ज्वारी खाल्ली तर त्याचे जास्तच फायदे शरीराला होतात.

थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. हिवाळा सुरु झाला की हवामानातील बदलामुळे अनेक जण आजारी पडतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आपला आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. हिवाळ्यात आपल्या शरीरासाठी उत्तम समजले जाणारे धान्य म्हणजे ज्वारी. आपल्याकडे ज्वारीपासून भाकरी बनवली जाते. काही लोकं ज्वारीचा वापर करून पोळी देखील बनवता. ही ज्वारी खाण्याचे कोणते फायदे शरीराला होतात चला जाणून घेऊया.

– ज्वारीच्या भाकरीमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियमसारखे खनिजे मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे हाडं तर मजबूत होतात शिवाय दातासंबंधित समस्या देखील कमी होते.

– ज्वारीची भाकर खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत राहते. तसेच अनेक आजारांपासून देखील लांब राहता येत.

– ज्वारीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, व्हिटॅमिन-बी, कॉम्प्लेक्स असे महत्त्वाचे घटक आढळतात. जे शरीराला आजारांपासून लांब राहण्यासाठी मदत करतात. ज्वारीची भाकरी खाल्ल्याने आपली हाडेही मजबूत होतात. ज्वारीमध्ये असलेले प्रोटीन स्नायू आणि हाडे मजबूत करतात.

– ज्वारी ही ग्लुटेन मुक्त आहे. त्यामुळे ग्लुटेन मुक्त अन्न खाणाऱ्यांसाठी देखील ती आरोग्यदायी ठरते.

– हिवाळ्यात ज्वारीची भाकरी खाल्ल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात ठेवते. डायबिटीजच्या रुग्णांनी हिवाळ्यात ज्वारीची भाकर खालली पाहिजे.

– ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. जे पचनसंस्था मजबूत करते. त्यामुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्येपासून देखील आराम मिळतो.

– ज्वारीची भाकर खाल्ल्याने पोट भरलेले राहते. ज्यामुळे तुम्ही सारखे सारखे खाणे टाळता. यामुळेच वजन नियंत्रित राहण्यात मदत होते.

– ज्वारी ही हृदयविकारापासून देखील आपले संरक्षण करते. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्वारीमुळे कोलेस्टेरॉलही कमी होतो.

– ज्वारीत मिनरल्स, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे प्रमाण अधिक असते. यात पोटेशियम, फोस्फोरस, कॅल्शियम आणि आयर्नची मात्रा अधिक आढळते. ज्यामुळं पोषक तत्वात वाढ होते.

– ज्वारीची भाकरी किंवा पोळी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि आपले आजारी पडण्याचे प्रमाण देखील कमी होते.

(टीप : कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांकडून सल्ला घ्या.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.