कोणालाही आपण विचारले की तुमचे आवडते फळ कोणते तर बहुतांशी लोकांचे एकच उत्तर असेल आणि ते म्हणजे पेरू. अतिशय गोड आणि रवाळ असलेले हे फळ सगळ्यांनाच आवडते. चवीला उत्तम असलेले हे फळ शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय फायदेशीर आहे. आपल्या जिभेला चव देण्यासोबतच आपले आरोग्य राखण्याचे देखील काम करते.
पेरू हा आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतो. पेरूचे झाड उष्ण भागात वाढते आणि त्याची फळे पावसाळ्यात आणि थंडीच्या काळात येतात. पेरू हा तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. पेरूमध्ये अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म असतात जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच तुमची रक्त परिसंचारण पातळी देखील निरोगी ठेवण्यास मदत करते. पेरूच्या सेवनामुळे हृदयाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी असते. यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स सारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. त्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि वजन नियंत्रणात मदत होते. रोज पेरू खाल्ल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार होते.
पेरूची खास गोष्ट म्हणजे चवीला गोड असूनही त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. १०० ग्रॅम वजनाचा पेरू आपल्याला ३८०% व्हिटॅमिन सी देतो. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी महत्त्वपूर्ण खनिजे देखील असतात. पेरू खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.
– रोज एक पेरू खाल्ल्याने पोटॅशियमची पातळी वाढते, असे तज्ञ म्हणतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. असेही म्हटले जाते की पेरू टाईप २ मधुमेह दूर ठेवण्यास मदत करतो.
– पेरूमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते, ज्यामुळे स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो. यासोबतच पेरू खाल्ल्याने तणाव कमी होतो.
– पेरूमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे त्याचे सेवन केल्याने तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. जे तुम्हाला वजन वाढण्यापासून रोखण्यास मदत करते.
– पेरूमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळेच डायबिटीजच्या रुग्णांसाठी पेरू हा रामबाण उपाय ठरतो.
– पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असते. परिणामी, शरीरातील जीवाणू, विषाणूंच्या हालचालीपासून शरीराची मुक्तता होऊ शकते. त्यामुळे बदलत्या ऋतूमुळे शिंका-खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
– पेरू हे व्हिटॅमिन-ए, सी, फोलेट, जस्त आणि तांबे यांसारख्या गुणधर्मांचा खजिना आहे. म्हणूनच ज्यांचे डोळे कमी वयात कमजोर होऊ लागतात त्यांच्यासाठी पेरूचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
– पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असते. परिणामी, बेड बग्स दूर राहतात. पेरूमध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देते. परिणामी, निरोगी राहण्यासाठी पेरूला डायट लिस्टमध्ये ठेवा.
– ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे अशांसाठी पेरू खाण्याचा फायदा होतो. पेरू खाल्ल्यामुळे आपले रक्त परिसंचारण सुधारते.
– पेरू खाल्ल्यामुळे सोडियम पातळी देखील संतुलित करण्यासाठी उपयुक्त ठरते.
– पेरू खाल्ल्यामुळे आपले चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. पेरू खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांना इजा देखील होत नाही आणि आपल्या रक्तवाहिन्या निरोगी देखील राहण्यास मदत होते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका देखील निर्माण होत नाही.