अगदी राजा महाराजांच्या काळापासून आपल्या अंगाचा सुवास येण्यासाठी सुगंधित द्रव पदार्थ लावला जायचा. त्याला अत्तर असे म्हटले गेले. अंगाला अत्तर लावणे ही पूर्वीच्या काळी मोठी बाब समजली जायची. मोठे लोकंच तेव्हा अत्तर लावायचे. हळू हळू काळ बदलला आणि अत्तरासोबतच ‘परफ्युम’ आले. अत्तराची जागा आता परफ्युमने घेतली. दररोज परफ्युम लावून घराबाहेर पडणारा समाजात मोठा वर्ग आहे. आधीच्या काळात सण समारंभाला लावला जाणारा परफ्युम आता दररोज लावला जातो. घरात, घराबाहेर सगळीकडे परफ्युम लावूनच वावरले जाते.
परफ्युम लावणे ही खूपच सामान्य बाब आहे. आपण कोणत्या वेळेत बाहेर जातो, कोणत्या ठिकाणी, कोणत्या कार्यक्रमासाठी जातोय आदी अनेक गोष्टींवर कोणता परफ्युम लावायचा हे ठरवले जाते. स्वतःला आणि समोरच्याला ताजेतवाने वाटण्यासाठी नेहमी चांगल्या प्रतीचा परफ्यूम वापरला पाहिजे. घामाच्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी आणि आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी देखील परफ्युम लावणे गरजेचे झाले आहे.
आजच्या काळात बाजारात असंख्य प्रकारचे परफ्युम आहेत. यातला आपल्याला सूट होईल असा परफ्युम शोधणे खूपच अवघड आहे. यासाठी आज असलेल्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला पुरुषांसाठी अतिशय उत्तम आणि योग्य असलेल्या काही परफ्युमची माहिती देणार आहोत. तुम्ही परफ्युम घ्यायला जाल तेव्हा नक्कीच तुम्हाला या माहितीचा फायदा होईल.
१ हायड्रा बाय व्हिलन Hydra by Villain
हा परफ्यूम पुरुषांसाठी एक उत्तम पर्याय आहे. याचा सुगंध सगळ्यांचे मन जिंकणारा असून, याचा सुवास दीर्घकाळ टिकणारा आणि ताजेतवाने ठेवणारा आहे. हा परफ्यूम पुरुषांसाठी चांगला आहे. यात लिंबू, द्राक्ष, पुदीना, पांढरा कस्तूरी अशा सुगंधांचे मिश्रण आहे.
२ केल्विन क्लेन इटर्निटी ईडीटी फॉर मेन Calvin Klein Eternity EDT For Men
कॅल्विन क्लेन हा परफ्युम मार्केटमधील सर्वात प्रिमियम परफ्यूम ब्रँडपैकी एक आहे. या परफ्यूमचा दीर्घकाळ टिकणारा सुगंध हे याचे वैशिष्ट्य आहे. हा परफ्युम भारतातील पुरुषांसाठी सर्वोत्तम परफ्यूमपैकी एक आहे. या परफ्यूमचा वापर दररोज देखील करता येईल.
३ युनायटेड कलर्स ऑफ बेनेटटन युनायटेड ड्रीम्स एम हाय परफ्यूम United Colors of Benetton United Dreams Aim High Perfume
या परफ्यूमचा सुगंध प्रीमियम आणि एव्हरलास्टींग असा आहे. हा परफ्यूम परवडणारा असून, हा परफ्युम तुमच्या पार्टनरसोबत बाहेर जाताना, कार्यक्रमासाठी उत्तम पर्याय आहे. हा परफ्युम लावल्याने समोरच्यावर तुमचे इम्प्रेशन नक्कीच उत्तम पडेल.
४ स्नेक बाय व्हिलन Snake by Villain
हा परफ्युम तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये अगदी आत्मविश्वासाने वापरू शकता. या परफ्यूमचा सुगंध सगळ्यांनाच तुमची दखल घेण्यास भाग पाडेल.
५ गेस मॅन बाय गेस Guess Man by Guess
हा परफ्युम तर सर्वोत्तम आहे, मात्र सोबतच या पर्फ्युमची बाटली देखील खूपच छान आहे. परफ्यूमची बाटली पाहूनच हा परफ्युम विकत घ्यायची इच्छा होईल. या परफ्यूमला कस्तुरीचा सुगंध असून याची किंमत देखील खिशाला परवडणारी आहे.