Home » काकडीचे सेवन केल्याने होतात ‘हे’ आश्चर्यचकित करणारे फायदे ! 

काकडीचे सेवन केल्याने होतात ‘हे’ आश्चर्यचकित करणारे फायदे ! 

0 comment
Cucumber Health Benefits
Share

काकडीचे सेवन करा असे डॉक्टर नेहमी सांगतात. त्वचा आणि पोटासाठी काकडी खूप फायदेशीर मानली गेली आहे. काकडीतील हायड्रेटिंग गुणधर्म पोट थंड ठेवण्याचे काम करतात.त्यामुळे उन्हाळ्यात काकडी आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगली मानली गेली आहे.  पण सर्दी आणि ताप असल्यास  काकडीचे सेवन अजिबात करू नये. काकडीमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते तसेच त्यात अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचविण्यास मदत करतात. काकडीत खूप कमी कॅलरी असतात परंतु त्यात पाण्याचे प्रमाण आणि विरघळणारे फायबर जास्त असते, ज्यामुळे वजन कमी करण्याचा हा एक प्रभावी मार्ग बनतो. काकडीचे सेवन केल्याने कोणते आजार नियंत्रणात येतात तसेच काकडी खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे आज आपल्या आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.(Cucumber Health Benefits)  

– डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी, लघवीशी संबंधित समस्या, स्नायूंमध्ये पेटके इत्यादी उद्भवू शकतात. काकडीचे सेवन केल्यास ही समस्या टाळण्यास आणि त्यामुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. काकडीच्या फायद्यांशी संबंधित एका संशोधनात असे आढळले आहे की काकडीत 95% पाण्याचे प्रमाण असते, ज्यामुळे त्याचे सेवन शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते.

– काकडीत जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी -6, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, नियासिन, थायमिन आणि फोलेटसह व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. म्हणूनच मुलांच्या शरीरासाठी काकडी खूप फायदेशीर मानली जाते.

– काकडी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वजन कमी करण्यास मदत करू शकते. सर्वप्रथम, त्यामध्ये कॅलरी कमी असतात. एक कप (104 ग्रॅम) काकडीमध्ये फक्त 16 कॅलरी असतात, तर 300 ग्रॅम काकडीत फक्त 45 कॅलरी असतात. याचा अर्थ असा की आपण अतिरिक्त कॅलरी न घेता भरपूर काकडी खाऊ शकता कारण जास्त कॅलरी वजन वाढण्याचे एकमेव कारण आहे.

– काकडी मधुमेहातही हे खूप फायदेशीर ठरते. यात ग्लाइसेमिक इंडेक्स आहे जो मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतो. त्याच बरोबर यात फायबर आणि फेज चे प्रमाण जास्त असते जे चयापचय मजबूत करते.

Cucumber Health Benefits
Cucumber Health Benefits

– काकडीचे सेवन कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकते. काकडीच्या अर्कमध्ये आढळणारा हा गुणधर्म कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखू शकतो. काकडीच्या फायद्याच्या यादीत कॅन्सरपासून बचावाचाही समावेश होतो.त्याचबरोबर जर एखाद्याला कॅन्सर झाला असेल तर त्याने केवळ घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्यावेत, हे ही लक्षात घ्या. 

– काकडीचे सेवन पोटासाठी फायदेशीर ठरते. पोटात अॅसिडिटीसोबतच काकडी अल्सरसारख्या समस्यांमध्येही काम करते. पोटदुखी आणि गॅसच्या समस्येमध्ये मुलांसाठी काकडी खूप फायदेशीर आहे.

– काकडी डोळ्यांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. खरं तर, यात अँटीऑक्सिडेंट प्रभाव आहेत, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात आणि मॅक्युलर डीजेनेरेशन (डोळ्याचा रोग, ज्यामुळे अंधत्व येऊ शकते) होण्याचा धोका कमी होतो. त्याचबरोबर काकडीमध्ये आढळणारे हायड्रेटिंग गुणधर्म डोळे आणि त्याच्या सभोवतालच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करू शकतात. बंद डोळ्यांवर काकडीचे तुकडे थंड प्रभाव ठेवण्यास मदत करतात. 

===================================

हे देखील वाचा: प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय? मग हे वाचाच !

===================================

– हाडांशी संबंधित समस्यांमध्येही काकडी खूप फायदेशीर आहे. यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे हाडांच्या समस्या बर्याच प्रमाणात नियंत्रित करण्यास मदत करतात. (Cucumber Health Benefits)

– काकडीमध्ये फिसेटिन नावाचे अँटी-इंफ्लेमेटरी फ्लेव्होनॉल असते जे मेंदूच्या आरोग्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. याव्यतिरिक्त, फिसेटिन स्मरणशक्ती कमकुवत होण्यापासून रोखण्यास आणि अल्झायमर रोग बरा करण्यास सक्षम असल्याचे आढळले आहे.

(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती पूर्णपणे खरी असल्याचा आम्ही कोणताही दावा करत नाही.)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.