Home » परळीत मुंडेंना पर्याय नाही?

परळीत मुंडेंना पर्याय नाही?

by Team Gajawaja
0 comment
Dhanjay Munde
Share

राष्ट्रवादीचे जे गड होते, ते पुन्हा मिळवण्यासाठी शरद पवारांची धडपड चालूच आहे. अनेक मोठे नेते साथ सोडून गेले असले तरी, त्या मोठ्या नेत्यांविरोधात प्रभावी उमेदवार देण्यासाठी शरद अपवर जंग जंग पछाडत आहेत. स्वतः प्रत्येक मतदारसंघात लक्ष घालत आहेत. यातूनच कागल, माढा सारख्या मतदारसंघात शरद पवारांनी तितक्याच ताकदीने उमेदवारही उभे केले आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून शरद पवार बीडच्या परळीत आले होते. बीड लोकसभा जिंकल्यानंतर पवारांनी आता विधानसभेवर लक्ष केंद्रित केलं आहे. याच संदर्भात एक महत्वाचा प्रवेश शरद पवारांनी करून घेतला. (Dhanjay Munde)

राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष, परळी तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते राजेभाऊ फड यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राजेभाऊ फड हे पंकजा मुंडे यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे परळीचे सध्याचे आमदार धनंजय मुंडे यांच्यापुढे पवार तगडे आव्हान उभं करणार अशा चर्चा आहेत. त्यामुळे लोकसभा पाठोपाठ विधानसभेतही मुंडे मागे पडणार का? कि विधानसभेला मुंडे भाऊ बहीण लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढणार? (Political News)

तर परळी विधानसभा मतदारसंघात एक महत्वपूर्ण घडामोड होत आहे. परळीतला एक मोठं नाव, राजेभाऊ फड, यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे ते जावई आहेत, आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या विजयात राजेभाऊ फड यांचा मोठा वाटा होता. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष आहेत. 2016 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत.फड यांची भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणूनही ओळख आहे. त्यांची आई दोनदा, तर राजेभाऊ फड हे एकदा परळीतील कन्हेरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले आहेत. त्यातच फड हे वंजारी समाजातूनही येतात. (Dhanjay Munde)

त्यामुळे मुंडे भावा-बहिणींना हा मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी परळीतूनच बबन गित्ते यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. बबन गित्ते हेहि परळीतील स्थानिक नेते होते. थोडक्यात, एक एक साथीदार मुंडेंची साथ सोडत आहेत. त्यातच हे वंजारी समाजाचे असल्याने वंजारी समाजाच्या वोट बँकेतही फरक पडू शकतो. वंजारी समाजाच्या वोट बँकेच्या जोरावरच मुंडेंनी परळी हा बालेकिल्ला बनवला आहे. आधी गोपीनाथ मुंडे, त्यानंतर पंकजा मुंडे आणि मग धनंजय मुंडे असा मुंडे फॅमिलीच्या ताब्यातच हा मतदारसंघ आहे. पक्षाच्या विचार करायचा झाल्यास धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपच्या हातातून हा मतदारसंघ निसटला होता. मात्र आता मुंडे अजित दादांच्या माध्यमातून महाविकास आघाडीत सामील झाल्याने पुन्हा मुंडे बहीण भाऊ एकत्र आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुंडेंची मतदारसंघात मोठी ताकद असणार आहे. (Political News)

लोकसभा निवडणुकीतही हि गोष्ट प्रकर्षाने समोर आली होती. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पराभव केला असला तरी परळीतून पंकजा ताईंना मोठं लीड होतं. परळीमध्ये पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची आघाडी मिळाली होती.परळीत पंकजा मुंडे यांना एक लाख 41 हजार मते मिळाली होती, तर सोनवणे यांना 66 हजार मते मिळाली या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जातीय ध्रुवीरकरन झालं होतं. मराठा विरुद्ध वंजारी समाज असं जातीय ध्रुवीकरण झाल्याचं जाणकार सांगतात. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा सर्वात जास्त इफेक्ट झाललेला हा मतदारसंघ होता. आणि असं असतानाही मुंडेंनी परळीत एवढी मोठी लीड घेतली होती. याचाच अर्थ मुंडेंना वंजारी समाजाची एक गट्टा मतं मिळाली होती आणि ती त्यांना परळीत विजय मिळवून पुरेशी आहेत असं म्हणता येतं. (Dhanjay Munde)

येत्या विधानसभेतही असंच जातीय ध्रुवीरकरन होऊ शकतं असं बोललं जात आहे. त्यामुळं संपूर्ण बीड जिल्हा पुन्हा मराठा विरुद्ध वंजारी अशी फूट बघण्याची शक्यता आहे. या परिस्थिती जरी वंजारी नेत्यांचे पक्षप्रवेश झाले तरी वंजारी समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून समाज मुंडे भावा बहिणींच्याच मागे उभा राहील. सोबतच दोन्ही भाऊ बहीण एकत्रित आल्याने गोपीनाथ मुंडेंचा एकत्रित वारसा सांगूनही मुंडेंना वंजारी समाजाची वोटबँक एकत्रित ठेवता येईल. त्यामुळे जरी पवारांनी तगडा उमेदवार दिला तरी तो मुंडेंच्या ताकदीसमोर तग धरणं अवघड आहे. सोबतच गेल्या पाच वर्षात आधी महाविकास आघाडी आणि मग नंतर महायुतीच्या माध्यमातून धनंजय मुंडे सतत सत्तेत आहेत. (Political News)

======

हे देखील वाचा : आतिशी मार्ले दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री

======

त्यामुळे मतदारसंघावरील त्यांची पकड अजूनच मजबूत झाली आहे. सोबतच पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लगेचच राज्यसभा मिलाळाल्याने त्यांचीही ताकद वाढली आहे. त्यांनाही परळी आणि आजूबाजूचे विधानसभा जिंकून राज्यसभा खासदारकीची परतफेड करावी लागणार आहे. अशावेळी मुंडे संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यासाठी सम्पुर्ण यंत्रणा मैदानात उतरवली जाईल, आणि म्हणूनच मग कितीही पक्ष प्रवेश झाले तरी परळीच्या राजकारणात मुंडेंचाच दबदबा राहील असं सहजपणे म्हणता येतं. (Dhanjay Munde)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.