श्री कृष्ण जन्माष्टमी 16 ऑगस्ट रोजी देशभरात साजरी झाली. भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळमधील भगवान नारायणाच मंदिर जगातील सर्वात जुने विष्णू मंदिर आहे. या मंदिरामध्ये भगवान श्री नारायण शालिग्राम रुपात आहेत. या भव्य मंदिराचा पुरातन इतिहास जाणण्यासाठी आणि भगवान नारायणाच्या चरणी लीन होण्यासाठी लाखो भाविक या मंदिरात जातात. नेपाळमधील मुस्तांग जिल्ह्यात असलेल्या या मुक्तीनाथ मंदिरामध्ये भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीही विराजमान झाल्या आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, येथील 108 जलधारा. या जलधारा येत असलेल्या पाण्याच्या कुंडात फक्त स्नान केले तरी मोक्षाची प्राप्ती होते, अशी भावना आहे. (Nepal)

भगवान श्रीकृष्णाची मंदिरे असेच एक मंदिर नेपाळमधील मुस्तांग जिल्ह्यात आहे. येथील श्री हरि नारायण मुक्तीनाथ मंदिर हे अद्वितीय मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराची बांधणी आणि त्याचा इतिहास हा आता अभ्यासाचा विषय झाला आहे. या मंदिर परिसरात असलेल्या 108 जलधारांही श्रद्धेचा विषय आहे. या जलधारामधून आलेल्या पवित्र पाण्यामध्ये स्नान केल्यानं मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते, यासोबत भगवान नारायणाचा आशीर्वादही मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री हरि नारायण मुक्तीनाथ मंदिर हे वैष्णव पंथाच्या मुख्य मंदिरांपैकी एक मानले जाते. (Social News)
हे मंदिर भगवान शालिग्रामसाठी प्रसिद्ध आहे. शालिग्राम हा एक पवित्र दगड असून हिंदू धर्मात पूजनीय मानला जातो. शालिग्राम प्रामुख्याने नेपाळकडे वाहणाऱ्या काली गंडकी नदीत मिळतात. श्री हरि नारायण मुक्तीनाथ मंदिर ज्या भागात आहे तिथे हे शालिग्राम अधिक संख्येनं मिळतात. म्हणूनच या सर्व क्षेत्राला ‘मुक्तीक्षेत्र’ म्हणून ओळखले जाते. श्री हरि नारायण मुक्तीनाथ मंदिराची यात्रा ही सर्वात कठीण यात्रा मानली जाते. या यात्रेदरम्यान, हिमालयाचा मोठा भाग ओलांडावा लागतो. हिंदू धर्माच्या दुर्गम तीर्थस्थळांपैकी एक तीर्थस्थळ म्हणूनही श्री हरि नारायण मुक्तीनाथ मंदिराचा उल्लेख होतो. मात्र असे असले तरी दरवर्षी हजारो भाविक श्री हरि नारायण मुक्तीनाथ मंदिरामध्ये भगवान नारायणाच्या दर्शनाला येतात. त्यातही जन्माष्टमीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. श्री हरि नारायण मुक्तीनाथ मंदिरामध्ये भगवान नारायण शालिग्राम रुपात विराजमान आहेत. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू शालिग्राममध्ये राहतात. याबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत. यातील एका कथेनुसार, जालंधर राक्षसाची पत्नी वृंदा हिने भगवान विष्णूंना कीटक म्हणून आयुष्य घालवण्याचा शाप दिला. (Nepal)

कालांतराने, शालिग्राम दगड तयार झाला. त्यात भगवान विष्णुचे रुप दिसू लागले. तेव्हापासून हिंदू धर्मात शालिग्रामची भगवान विष्णू म्हणून पुजा केली जाते. हेच शालिग्राम श्री हरि नारायण मुक्तीनाथ मंदिरात विराजमान आहेत. मुक्तिनाथ हे बौद्धांसाठी देखील एक महत्त्वाचे स्थान आहे. येथीलच वायव्य भागातील महान बौद्ध भिक्षू पद्मसंभव बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी तिबेटला गेल्याची माहिती आहे. श्री हरि नारायण मुक्तीनाथ मंदिराचे मोक्ष देणारा देव असे वर्णन करण्यात येते. हे मंदिर हिमालयाच्या कुशीमध्ये 3710 मीटर उंचीवर आहे. निसर्गाचे अद्भूत सौंदर्य या भागात पहायला मिळते. जगातील सर्वात जुने विष्णु मंदिर, 24 तांत्रिक स्थळांपैकी एक मानले जाते. रामायण, बाराह पुराण आणि स्कंद पुराण यासारख्या हिंदू धर्मग्रंथांमध्येही मुक्तिक्षेत्र किंवा मुक्तिनाथ मंदिराचा उल्लेख आहे. (Social News)
==============
हे देखील वाचा : Ganesh Chaturthi : गणेश मूर्ती खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
===============
19 व्या शतकाच्या सुरुवातीला हे मंदिर बांधले गेल्याचे सांगितेल जाते. याच मंदिरात भगवान ब्रह्मदेवानीही तपश्चर्या केली आणि भगवान विष्णुंनी ब्रह्मदेवांना साक्षात दर्शन दिल्याचे सांगितले जाते. याशिवाय आदी शंकराचार्य यांनी 8 व्या शतकात श्री हरि नारायण मुक्तीनाथ मंदिराला भेट दिली होती. तसेच आध्यात्मिक शक्तीचे केंद्र म्हणून या मंदिराचा विकास केला होता. जन्माष्टमीच्या वेळी, मंदिरात विशेष पूजा केली जाते. शिवाय कृष्णाचे आरती आणि भजन गायले जातात. कृष्ण जन्माष्टमीच्या या सणाला येथे स्नान केल्याने सुख-शांती मिळते आणि कुटुंबात सुख-समृद्धी वास करते, असा भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळेच आता या दुर्गम अशा श्री हरि नारायण मुक्तीनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. (Nepal)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
