गुन्हेगारी विश्व इतकं भयावह आहे. की कधी कधी एखादी घडलेली घटना, तो गुन्हा हा माणसाने केला नसून एका राक्षसाने केला आहे, असं वाटतं. कारण त्या गुन्ह्यामध्ये माणुसकीच्या, माणूस असण्याच्या सर्व सीमा ओलांडलेल्या असतात. आजची क्राइम स्टोरी अशाच एका नराधमाची आहे. ज्याच्या कृत्यांबद्दल बोल्लं तर तुमच्याही तळ पायाची आग मस्तकात जाईल. त्या नराधमाच नाव होतं आंद्रेई शिकाटिलो. तो नपुंसक होता आणि ह्याच कारणामुळे त्याने ८० ते ९० च्या दशकात रशियामध्ये ५५ जणांची हत्या आणि बलात्कार केला होता. एवढंच करून तो थांबला नाही त्याने ५५ जणांच्या मृतशरीरावर अत्याचार सुद्धा केले. त्यांनी त्यांचे प्रायवेट पार्ट चिरडले, कापले आणि खाल्ले सुद्धा.. म्हणून त्याला कसाई, द फॉरेस्ट स्ट्रिप किल्लर, रेड रिप्पर अशी अनेक नाव दिली होती. आंद्रेई शिकाटिलोच्या क्रूरतेची कहाणी जाणून घ्या ! (Crime Story)
डिसेंबरचा महिना होता साल होतं १९७८, रोस्तोव रेल्वे लेना झकोटनोव्हा ही तिची मुलगी नऊ वर्षांची येलेना झकोटनोव्हाला एका बाकावर बसून, तिच्यासाठी खायला आणण्यासाठी गेली. ती जेव्हा परतली तेव्हा तिची ९ वर्षांची मुलगी येलेना तिथे नव्हती. तीच्या आईने तिचा शोध घेतला. पोलिसांत तक्रार केली पण ती कुठेच सापडली नाही. दोन दिवसांनी तिचा मृतदेह शहरातील पूलाखाली नदीजवळ आढळला. नदीच्या विरुद्ध काठावर येलेनाच्या शाळेचं दफ्तर पडलं होतं. तिच्या मृतदेहावर चाकूने ओरखडण्याचे निशाण होते. तिच्यावर बलात्कार सुद्धा झाला होता. यामुळे रोस्तोव शहरात दहशत पसरली. नऊ वर्षांच्या मुलीसोबत असं कृत्य करणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर अटक करून शिक्षा देण्याचं प्रेशर पोलिसांवर होतं. त्यामुळे पोलिसांनी अलेक्झांडर क्रॅव्हचेन्को नावाच्या आरोपीला अटक केली. ज्याने यापूर्वीही एक किशोरवयीन मुलीवर बलात्कार आणि खुन केला होता. त्याची शिक्षा सुद्धा त्याने भोगली होती. त्याला पुन्हा आता या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली. क्रॅव्हचेन्कोच्या घराची झडती घेतली असता त्याच्या पत्नीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले: हा ब्लड ग्रूप येलेनाच्या रक्ताशी मॅच होतं होता. पोलिसांनी त्याला पकडून त्याला काहीवर्षांत मृत्यूदंडाची शिक्षा सुद्धा झाली. पण खरंतर ही या केसची सुरुवात होती. क्रॅव्हचेन्को हा या प्रकरणात निर्दोष होता तरी त्याला शिक्षा झाली होती, आणि जो खरा आरोपी होता, तो निर्दोष मुक्त फिरत होता. तो म्हणजे आंद्रेई शिकाटिलो.
या प्रकरणानंतर रशियाच्या मीडिया आणि न्यूजपेपरमध्ये जवळपास प्रत्येक महिन्याला एक विचित्र बातमी छापलेली असायचीच. ती म्हणजे रोस्तोव शहराच्या रस्त्याच्या कडेला, जंगलात, एखाद्या सुनसान बागेत किंवा रेल्वेच्या पटर्यांवर एखाद्या महिलेचा किंवा लहान मुलीचा छिन्नविछिन्न देह आढळून आल्याची. फक्त मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत अढळायचे नाहीतर त्यांचे गुप्तांग कापलेले, चिरडलेले असायचे. त्यांच्या शिरीरभर एका माणसाने चावल्याच्या खुणा असायच्या. (Crime Story)
पोलिसांचा तपाससुरूच होता. पोलिसांचा तपास तेव्हा वेगाने सुरू झाला जेव्हा एक 20 वर्षांची मुलगी अचानक गायब झाली. त्या मुलीचे नाव होते लारिसा ताकाशेंको. सुरुवातीला तपासात हे समोर आलं की त्या मुलीला शेवटी लाइब्रेरीतून बाहेर पडताना पाहिलं गेलं होतं. 24 तासांच्या आत पोलिसांनी तिचा मृतदेह जंगलात सापडला. मृतदेह पाहिल्यावर तिच्या शरीरावर खोलवर जखमेच्या खुणा पोलिसांना कळून चुकलं की, हे काम त्याच नराधमाने केलं आहे. कारण तिला जबर मारहाण झाली होती. त्याशिवाय तिच्या गुप्तांगापासून संपूर्ण शरीरभर चावल्याच्या खुणा सुद्धा होत्या. या प्रकरणाचा शोध पूर्ण होतो ना होतो तोच.
आणखी एक मृतदेह तशाच अवस्थेत सापडला. मृतदेह सापडण्याचं प्रमाण वेगाने वाढत होतं. पोलिसांना काहीही सुचत नव्हतं, सातत्याने मृतदेह सापडत असल्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव आला होता. पोलिसांनी या हत्यांचं प्रकरणं उलगडण्यासाठी एका मानसशास्त्रज्ञाची मदत घेण्याचं ठरवलं. मृतदेहाच्या अवस्थेवरून आरोपीच्या मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न केला. (Crime Story)
मानसशास्त्रज्ञाने रीपोर्ट आणि मृतदेहाच्या अवस्थेवरून एका व्यक्तीचा तपशील तयार केला. या तपशिलात एक गोष्ट अशी होती जी पाहून पोलिससुद्धा चकित झाले. कारण मानसशास्त्रज्ञाने तपशिलात लिहिलं होतं की, हा आरोपी नपुंसक आहे. तो स्वत:ला संतुष्ट करण्यासाठीच या हत्या करतो आहे. या आधारवार मग तपास सुरू झाला. आतापर्यंत ५० च्यावर हत्या झाल्या होत्या. पोलिसांना आता आरोपीला लवकरात लवकर गजाआड करायचं होतं.
या प्रयत्नात पोलिस शोध घेत असताना एक दिवस रेल्वे स्थानकाच्या जवळ एक व्यक्ती दिसला तो व्यक्ती त्यांना रोज दिसायचा पण आज तो स्वत:चे रक्ताने माखलेले हात धुताना पोलिसांना दिसला होता. पोलिस त्याला पाहून चकित झाले कारण त्याच्या चेहऱ्यावरही जखमा दिसत होत्या. पोलिसांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की त्याची मानसिक स्थिती खराब आहे. पोलिसांना काहीतरी संशय आला, म्हणून त्यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग सुरू केला. काही दिवसांनी त्या व्यक्तीला पकडून पोलिसांनी त्याला त्या मानसशास्त्रज्ञकडे नेलं. त्या व्यक्तीला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली केली नाही, मात्र मानसशास्त्रज्ञ डॉक्टरने त्याच्याशी बोलणं सुरू केलं. सुरुवातीला त्याला या हत्यांबद्दल काहीही विचारलं गेलं नाही. त्याला दुसरे प्रश्न विचारले जात होते ज्यात त्याच्या भूतकाळा दडलेला होता. (Crime Story)
पोलिसांनी ज्याला पकडलं होत तो होता आंद्रेई शिकाटिलो. आंद्रेईने त्याचा भूतकाळ सांगितला तेव्हा पोलिस सुद्धा शोक झाले. आंद्रेईचा जन्म दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाला होता. लहानपणापासून आंद्रेईने गरिबी अत्यंत जवळून पाहिली होती. त्याचे वडील सैनिक होते आणि त्यांना बंडखोरीच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आलं होतं. ज्या ठिकाणी तो वाढला तिथल्या लोकांंकडे खाण्यासाठी अन्न नव्हतं. त्यामुळे तिथले लोक आपली भूक भागवण्यासाठी मेलेली माणसं खाऊ लागले होते. त्यात लहानपणी त्याच्या आईने त्याला एक भयावह किस्सा सांगितला होता. तिथल्या लोकांनी त्याच्या भावाला सुद्धा भूक भागवण्यासाठी खाल्लं होतं. ही गोष्ट आंद्रेईच्या मनात एखाद्या जखमेसारखी छापली गेली होती.
या भुतकाळाच्या आठवणी विसरण्यासाठी तो दुसऱ्या शहरात गेला. तिथे त्याला एका मुलीवर प्रेम झालं. तेव्हाच त्याला काळालं की तो नपुंसक आहे. यामुळे आयुष्यात पहिल्यांदा आलेलं प्रेम सुद्धा दूर गेलं. मग नंतर आणखी एक प्रेयसी त्याच्या आयुष्यात आली पण तीही जास्त काळ त्याच्यासोबत राहू शकली नाही. त्याच्या या नपुंसकतेची माहिती त्याच्या शेजाऱ्यांना मित्रांना कळाली. या गोष्टीवरुन ते त्याच्या मस्करी करु लागले. अपमान टाळण्यासाठी त्याने ते शहर सुद्धा सोडलं आणि तो रोस्तोव शहरात आला. इथे आल्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पण या सगळ्यामुळे त्याच्या मनात एक विचित्र वादळ निर्माण झालं होतं. त्याच्या लहानपणीच्या आठवणी नपुंसकतेमुळे झालेला अपमान या सर्व गोष्टींमुळे आंद्रेई इतका अस्वस्थ झाला. त्याच्या नपुंसकतेवर लोक हसल्याने तो सर्वात जास्त दुखावला होता. तो मानसिक दृष्ट्या आजारी झाला होता. (Crime Story)
================
हे देखील वाचा :
Roopkund lake : रहस्यमय तलाव जिथे माशांच्या ऐवजी पोहत असतात मानवी सांगाडे!
Crime Story : नरभक्षक राजा कोलंदर लोकांना मारून मेंदुच बनवायचा सूप
=================
अशातच त्याने एका लहान मुलींवर बलात्कार करून तिची हत्या केली, आणि मग हे सत्र सुरूच राहिलं. यानंतर, आंद्रेईला खरंच वेड लागलं, त्याने 12 वर्षांच्या मुलीपासून ते 45 वर्षांच्या महिलेपर्यंतचा बळी घेतला. शहरात वेगवेगळ्या वेळी सुमारे 55 महिलांना त्याने आपलं शिकार बनवलं. या सगळ्या हत्यांची त्याने कबुली दिली. 1992 मध्ये, आंद्रेइला 52 हत्यांसाठी दोषी ठरवण्यात आलं आणि फेब्रुवारी 1994 मध्ये त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. आणि त्याला डोक्यात गोळी घालून ठार करण्यात आलं. (Crime Story)