Home » जगातील सर्वात लांब जलमार्गे ‘गंगा विलास क्रूझ होणार

जगातील सर्वात लांब जलमार्गे ‘गंगा विलास क्रूझ होणार

by Team Gajawaja
0 comment
Ganga Villas Cruise
Share

भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार नवीन जलमार्ग तयार करण्यासाठी आणि त्यावर क्रूझने प्रवास करण्यासाठी अनेक योजना आणत आहेत.  या प्रयत्नांतर्गत, 13 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लांब जलमार्गाच्या प्रवासासाठी गंगा विलास क्रूझला (Ganga Villas Cruise) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या शानदार गंगा विलास क्रूझ वाराणसीपासून सुरू होऊन दिब्रुगडपर्यंत 3200 किलोमीटर लांबीचा प्रवास करणार आहे. वाराणसीपासून सुरू होणारी, गंगा विलास क्रूझ (Ganga Villas Cruise)सुंदरबन डेल्टा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि इतर राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांसह अनेक जागतिक वारसा स्थळांवरून 50 दिवसांत बांगलादेशमार्गे दिब्रुगडला पोहोचेल. गंगा विलास क्रूझवर पंचतारांकित हॉटेल सारखी वैशिष्ट्ये आहेत.  या क्रूझवर प्रवासासाठी तिकीटांची रक्कमही तेवढीच जास्तीची आहे.  गंगा विलास क्रूझच्या रुपानं भारतात जगातील सर्वात लांब जलमार्गे पर्यटन मार्ग खुला होत आहे.  

गंगा विलास क्रूझ (Ganga Villas Cruise) हे नदीवर तरंगणाऱ्या पंचतारांकित हॉटेलसारखे आहे. गंगा विलास क्रूझ आपला प्रवास बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगड इथपर्यंत करेल. गंगा विलास क्रूझ 50 दिवसांच्या प्रवासात भारत आणि बांगलादेशातील 27 नद्यांमधून 3200 किमीचा प्रवास करेल. या सर्वांदरम्यान पर्यटक गंगा विलास क्रूझवर असलेल्या अनेक लक्झरी सुविधांचा आनंद घेतील.

 वास्तविक गंगा विलास क्रूझ (Ganga Villas Cruise) 2020 मध्ये चालवली जाणार होती.  मात्र कोरोना महामारीमुळे ती थांबवण्यात आली.  ही क्रूझ खासगी कंपनी चालवणार आहे. गंगा विलास क्रूझवर 80 प्रवासी प्रवास करू शकतात. या क्रूझमध्ये 18 लक्झरी सूट बनवण्यात आले आहेत. ज्यामध्ये दोन लोक राहू शकतात. या लक्झरी सूट्सना रॉयल लुक देण्यात आला आहे.  क्रूझवर एक आलिशान रेस्टॉरंट, स्पा, जिम आणि सनडेक सुविधा देखील आहेत.  रेस्टॉरंटमध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय पाककृती देणारे बुफे काउंटर आहेत.  क्रूझवर प्रवाशांना वैयक्तिक बटलरची सुविधाही दिली जाणार आहे. क्रूझच्या वरच्या डेकवर प्रवाशांसाठी एक बारही बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये आरामदायी खुर्च्यांसह कॉफी टेबलही बनवण्यात आले आहेत. प्रवाशांना पंचतारांकित हॉटेल्ससारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रूझवरील ओपन डेकवर सनबाथ आणि पार्टी करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

गंगा विलास क्रूझच्या (Ganga Villas Cruise) तिकिटाच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, 4 दिवसांच्या क्रूझच्या ‘इन्क्रेडिबल बनारस’ नावाच्या पॅकेजमध्ये, वाराणसी ते कॅथी हा प्रवास करण्यासाठी एका प्रवाशाला 1.12 लाख रुपयांचे तिकीट आहे. त्याचबरोबर कोलकाता ते ढाका प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति व्यक्ती 4,37,250 रुपयांचे तिकीट असेल. ‘सिक्रेट ऑफ सुंदरबन’ नावाच्या पॅकेजची किंमत 1.20 लाख रुपये आहे. त्याच वेळी, सर्वात स्वस्त पॅकेज ‘रिव्हर सूत्र’ हे तीन दिवसांचे आहे आणि त्याची किंमत 15000 रुपये आहे. देशातील सर्वात लांब प्रवास करणारी गंगा विलास क्रूझ (Ganga Villas Cruise) 9 जानेवारीला काशीला पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या या सर्व परिसरात कडाक्याची थंडी आहे आणि सोबतच गडद धुक्याची चादर पसरली आहे.  या धुक्यामुळे क्रूझच्या वेगावरही परिणाम झाला आहे. त्याचवेळी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा वाराणसीत येऊन या क्रूझची तयारी आणि गंगेच्या वाळूवर उभारल्या जाणाऱ्या टेंट सिटीचा आढावा घेणार आहेत.  बीएचयूमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या सुफलाम कार्यक्रमाला उपस्थित राहून मुख्यमंत्री योगी या क्रूझच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

==========

हे देखील वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ गावात शनि देवाची कृपा म्हणून घराला दरवाजेच लावले नाहीत

==========

गंगा विलास क्रूझचे (Ganga Villas Cruise) 32 स्विस पर्यटक कोलकाताहून काशीला रवाना झाले आहेत.  स्विस पर्यटक गाझीपूर येथील लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्या समाधीला भेट देणार आहेत. स्विस पर्यटकाच्या स्वागतासाठी गाझीपूर येथील कलेक्टर घाटावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानंतर ही क्रूझ काशीला रवाना होईल.  धुक्याचा फटका बसला नाही तर वेळेवर क्रूझ काशीला पोहोचेल असा विश्वास आहे.  10 जानेवारीला पर्यटन आणि संस्कृती विभागातर्फे काशीमध्ये पर्यटकांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. काशीला भेट दिल्यानंतर स्विस पर्यटक चुनारला जातील. चुनार किल्ल्याला भेट देण्याबरोबरच स्विस पर्यटकांना मिर्झापूरची लोककला कजरी देखील पाहायला मिळणार आहे.  पर्यटक वाराणसीशिवाय गाझीपूर आणि मिर्झापूरच्या पर्यटनस्थळांना भेट देणार आहेत.

या पर्यटकांच्या स्वागतासाठी गायक शंकर महादेवन 12 जानेवारी रोजी श्री काशी विश्वनाथ धाम संगिताचा कार्यक्रम देणार आहेत.  यानंतर गंगा विलास क्रूझ (Ganga Villas Cruise) दुसऱ्या दिवशी 13 जानेवारीला काशीहून बोगीबील (दिब्रुगड) कडे रवाना होईल. हे जहाज राष्ट्रीय उद्याने आणि अनेक अभयारण्यांमधूनही जाणार आहे. सुंदरबन डेल्टा आणि काझीरंगा नॅशनल पार्क ही यातील प्रमुख ठिकाणे आहेत.  ही क्रूझ 27 नद्यांमधून जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गंगा आहे. गंगा विलास क्रूझ बंगालमधील भागीरथी, हुगळी, बिद्यावती, मालता, सुंदरबन नदी प्रणाली, गंगेची एक उपनदी आणि बांगलादेशातील मेघना, पद्मा, जमुना आणि नंतर भारतातील आसाममधील ब्रह्मपुत्रामध्ये प्रवेश करेल. भारत-बांगलादेश प्रोटोकॉलमुळे ही यात्रा बांगलादेश ओलांडून जाईल. क्रूझचे प्रवासी 15 दिवस बांगलादेशला जाणार आहेत. गंगा विलास क्रूझची (Ganga Villas Cruise) लांबी 62.5 मीटर आणि रुंदी 12.8 मीटर आहे. गंगा विलास क्रूझचा हा 50 दिवसांचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये, यासाठी क्रूझवर गीत-संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  हा गंगा विलास क्रूझवरील प्रवास सध्या परकीय पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.  कारण या क्रूझचा पुढची तिकीटेही बुक होण्याच्या मार्गावर आहेत.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.