आधुनिक तंत्रज्ञान किती विकसीत आहे, आणि त्याचा वापर योग्य प्रकारे केल्यास काही अदभूत गोष्टीही साध्य होऊ शकतात. आपल्या इतिहासात अशा अनेक गोष्टी दडल्या आहेत, की ज्या पुढे आल्यास मानवी प्रगतीच्या टप्प्यात भर पडू शकते. या अशाच प्रयत्नांना आता तंत्रज्ञानाची साथ लाभली आहे. पोलंडमधील वार्सा येथील शास्त्रज्ञांनी चक्क दोन हजार वर्षापूर्वीच्या एका मम्मीचा चेहरा पुन्हा बनवला आहे. ही मम्मी गर्भवती महिलेची आहे. 1826 मध्ये ही मम्मी एका उत्खलनात मिळाली होती. एका जाडसर कापडात गुंडाळलेल्या या मम्मीची अवस्था त्यामानान चांगली होती. त्यावरुन शास्त्रज्ञांनी यावर प्रक्रीया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ही मम्मी इजिप्तमधून पोलंडच्या वॉर्सा येथे नेण्यात आली. या मम्मीचा चेहरा दोन हजार वर्षापूर्वी कसा होता याचे शास्त्रीय परीक्षण करण्यात आले. त्यावर काही शास्त्रज्ञांची टीम काम करत होती. काही वर्षांच्या परिश्रमानंतर या शास्त्रज्ञांनी गर्भवती असलेल्या मम्मीचा चेहरा पूर्ववत केला आहे. मानवी उत्क्रांतीतला एक महत्त्वाचा टप्पा असे या घटनेचे वर्णन जाणकारांनी केले आहे. (Warsaw Mummy Project)
जगभरातील मान्यवर शास्त्रज्ञ पोलंडमधील वॉर्सा येथे मम्मी प्रकल्पावर (Warsaw Mummy Project) काम करत आहेत. या माध्यमातून ज्या लोकांच्या मम्मी बनवल्या होत्या, त्या व्यक्ती वास्तवात कशा दिसत होत्या हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नांचा पहिला यशस्वी प्रयोग म्हणजे शास्त्रज्ञांनी 2000 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या गरोदर इजिप्शियन मम्मीचा चेहरा पुन्हा तयार केला आहे. सध्या हा वॉर्सा मम्मी प्रकल्प जगभरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
या प्रकल्पावर काम करणा-या फॉरेन्सिक शास्त्रज्ञांनी 2000 वर्षांहून अधिक जुन्या मम्मीच्या चेहऱ्याची पुनर्रचना केली आहे. ही मम्मी गर्भवती इजिप्शियन मम्मी असल्याचे सांगितले जात आहे. शास्त्रज्ञांनी 2D आणि 3D तंत्राचा वापर करून या गर्भवती महिलेच्या मम्मीचा चेहरा तयार केला आहे. सध्या ही मम्मी द मिस्ट्री लेडी या नावानं ओळखली जात आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार 20 ते 30 वयोगटातील 28 आठवड्यांच्या या महिलेचा गरोदर असताना मृत्यू झाला. त्याकाळी मृत्यूनंतर होणा-या प्रक्रियेनुसार महिलेचा देह जतन करण्यात आला. अशाप्रकारे सात महिन्यांची गरोदर असलेल्या या महिलेचा देह आपल्या न जन्माला आलेल्या मुलासह जतन केला गेला.
ही मम्मी सापडल्यानंतर इसवी सन पूर्व पहिल्या शतकात ती स्त्री जिवंत असती तर ती कशी दिसली असती, हे पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी मम्मीची कवटी आणि शरीराच्या इतर भागांची तपासणी केली. इटलीतील फॉरेन्सिक मानववंशशास्त्रज्ञ आणि वॉर्सा मम्मी प्रकल्पाचे(Warsaw Mummy Project) सदस्य चंताल मिलानी यांनी याबाबत संशोधन केले. मनुष्याच्या चेह-याची हाडे आणि कवटी त्याच्या चेह-याबद्दल माहिती देऊ शकतात. हे जाणून शास्त्रज्ञांनी महिलेच्या चेह-याचे अध्ययन केले. त्यानुसार रेखाचित्र काढण्यात आले.
========
हे देखील वाचा : कोणत्याही नोटीसशिवाय ट्विटरने हजारो कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
=======
1826 मध्ये सापडलेल्या या महिलेचा मृतदेह कापडात गुंडाळला होता. पण दोन हजार वर्षापूर्वीचा हा मृतदेह आवश्यक अशा प्रक्रिया करुन गुंडाळण्यात आल्या होत्या. शिवाय त्या कापडाचा दर्जाही चांगला असल्यानं दोन हजार वर्षापूर्वीही चांगल्या अवस्थेत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत झाले. त्यामुळेच या महिलेचा चेहरा कसा असेल याबाबत शोध घेण्यात आला. यासाठी फॉरेन्सिक सायन्समधील आधुनिक प्रणालीचा वापर करण्यात आला.(Warsaw Mummy Project)
फॉरेन्सिक आर्टिस्ट ह्यू मॉरिसन हे मम्मीचा चेहरा बनवणाऱ्या तज्ञांपैकी एक आहेत. त्यांनी हा शोध उत्साहवर्धक असल्याचे सांगितले आहे. आता याच प्रणालीचा वापर करत भूतकाळात लपलेले मानवप्रगतीला टप्पे शोधणे सोपे होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. पोलीस अकादमी ऑफ सायन्सेसचे पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. वोज्शिच एजमुंड हे सुद्धा या प्रकल्पाचा भाग आहेत. त्यांच्या मते याद्वारे इतिहासाला नवी दिशा मिळू शकते. आता चेह-याची पुर्नरचना केलेली ही मम्मी केटोविसमधील सिलेसिया संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. त्याद्वारे नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता समजू शकते.
सई बने