Home » Ancient War : भयानक युद्ध आणि जगातले ९५ टक्के पुरुष संपले…

Ancient War : भयानक युद्ध आणि जगातले ९५ टक्के पुरुष संपले…

by Team Gajawaja
0 comment
Ancient War
Share

आजपासून बऱ्याच वर्षांपूर्वी इतिहासात एक असं युद्ध झालं होतं ज्यात पृथ्वीवरची ९५% पुरुषांची लोकसंख्या नष्ट झाली आणि जे ५% पुरुष उरले, आपण त्यांचेच वंशज आहोत. ऐकून विचित्र वाटलं असेल ना, पण हे खरं आहे आणि आर्किओलॉजिस्टंनी उत्खनन करताना ठोस पुरावे सापडले आणि त्याने हे सत्य समोर आणलं. पण त्या युद्धाची नोंद इतिहासात सहसा सापडत नाही. आता ते कोणतं युद्ध होतं? आणि त्याचे नंतर मानव जातीवर काही परिणाम झाले का? हे डिटेलमध्ये जाणून घेऊ. (Ancient War)

हा तो काळ होता, जेव्हा सर्वाईवलसाठी भटका माणूस जस्ट शेती करायला लागला होता आणि तेव्हाच हे युद्ध झालं, म्हणजे साधारण ५००० ते ७००० वर्षांपूर्वी.. या युद्धाची इतिहासात सहसा नोंद सापडत नाही, पण या भयानक युद्धाचा पहिला पुरावा १९८३ ला जमिनीखाली जर्मनीत सापडला. ते म्हणजे Talheim Death Pit जे ७,००० वर्षं जुनं होतं. त्यात ३४ प्रेतं सापडली, ज्यांना कुऱ्हाडीने खूप क्रूरतेने मारलं होतं. याच दशकात ३०० पेक्षा जास्त प्रेतं सापडली आणि जगभरात बऱ्याच ठिकाणी असे पुरावे सापडले. (Top Stories)

मग २०१५ मध्ये मॅथ्यू पोज्निक आणि त्याच्या टीमने जगभरातल्या आधुनिक माणसांच्या DNA चा अभ्यास केला. तेव्हा भयंकर गोष्ट समोर आली. त्यात असं कळलं की, ५,०००-७,००० वर्षांपूर्वी Y-क्रोमोसोम अचानक ९५% कमी झालं. म्हणजे फक्त ५% पुरुषांच्या वंशरेषा पुढे गेल्या आणि हे युरोप, आशिया, आफ्रिकेत जास्त दिसलं. जेनेटिक्समध्ये याला बॉटलनेक म्हणतात. या बॉटलनेकचा अर्थ असा की, माणसाच्या इतिहासात कधीतरी काहीतरी भयंकर घडलं, ज्याने बहुतेक पुरुषांचे वंशवृक्ष वाढायचेच थांबले. त्यांच्या रेषा पुढे गेल्याच नाहीत. हा ग्राफ बघाल तर तुम्हाला अंदाज येईल. एका पॉइंट नंतर ग्राफ एकदम खाली आला. जेनेटिक्स तज्ज्ञ डेव्हिड रीच त्यांच्या Who We Are and How We Got Here पुस्तकात सांगतात की, कांस्य युगात म्हणजे इसपूर्व ३३०० ते इसपूर्व १२०० मध्ये फक्त काही ताकदवान पुरुषांचे वंश पुढे गेले, बाकीच्यांचे संपले. म्हणजे डार्विची थिअरी सर्वाईवल ऑफ द फिटेस्ट… अगदी तसंच! (Ancient War)

Ancient War

पण खरं तर Y-क्रोमोसोम कमी होण्यामागे ते एकच युद्ध आहे का? तर ठोस सांगता येत नाही. कारण त्याकाळात बरीच युद्ध व्हायची. पण मग ती युद्ध होण्यामागची कारणं काय तर त्यातलं एक कारण म्हणजे पितृसत्ताक कबिल्यांमधली युद्धं! साधारण १०,०००-५,००० वर्षांपूर्वी माणूस शेती शिकला आणि समाज पितृसत्ताक कबिल्यांमध्ये म्हणजे patrilineal clansमध्ये विभागला गेला, जिथे सत्ता, जमीन आणि ओळख वडिलांकडून मुलाला मिळायची. मग याच पुरुष कबिल्यांनी एकमेकांवर हल्ले केले, ज्यात इतर पुरुषांना ठार मारलं गेलं आणि तरुण स्त्रियांना पळवलं गेलं. त्यामुळे 95% Y क्रोमोसोमच्या वंशरेषा संपल्या असाव्यात, असं सांगितलं जातं. २०१५ मध्ये मॅथ्यू पोज्निक यांनी दाखवलं की, Y क्रोमोसोमचं वैविध्य याच कांस्य युगात कमी झालं. २०१८ मध्ये तियान चेन झेंग यांनी याला युद्धांशी जोडलं. (Top Stories)

त्यानंतर फक्त युद्ध नाही तर सामाजिक यश आणि डॉमिनन्स हे आणखी एक कारण होतं. शेती क्रांतीमुळे समाजात पितृसत्ताकता म्हणजे patriarchy आली. ती अल्फा मेल कन्सेप्ट माहित आहे ना…तसंच… शक्तिशाली पुरुष स्त्रियांशी संबंध ठेवायचे आणि तिथून त्यांचा वंश पुढे आला, असंही म्हणतात. डेव्हिड रीच सांगतात, यामनाया संस्कृतीच्या पुरुषांनी युरोपातल्या शेतकऱ्यांच्या पुरुष वंशरेषा जवळपास संपवल्या. आज युरोपातल्या बहुतेक पुरुषांचा Y क्रोमोसोम यामनायाकडून आला. (Ancient War)

Y-क्रोमोसोम मोठ्या प्रमाणावर नष्ट होण्याच्या आणखी काही थिअरीज् सांगितल्या जातात. ते म्हणजे नैसर्गिक आपत्ति किंवा रोग! काही संशोधकांनी विचार केला की, भूकंप, पूर, किंवा रोगामुळे पुरुष वंशरेषा संपल्या असाव्यात. कारण युरोपात ५,००० वर्षांपूर्वी Yersinia pestis म्हणजे plague bacteria चे पुरावे सापडले.

==============

हे देखील वाचा : Jaish-e-Mohammed : पाकिस्तानमध्ये २०० हून अधिक महिला दहशतवादी !

==============

त्यानंतर कॅनिबालिझम आणि Ritual Sacrifice ची सुद्धा एक थिअरी सांगितली जाते. काही स्थळांवर जसं हर्झहाइममध्ये कॅनिबालिझम आणि धार्मिक बलिदानाचे पुरावे सापडले. यात युद्धबंदी किंवा हरलेल्या कबिल्यांचे पुरुष मारले गेले असावेत. १९९६च्या हर्झहाइमच्या उत्खननात १,००० पेक्षा जास्त अवशेष सापडले. ज्यांच्या हाडांवर कापण्याचे आणि चावण्याचे व्रण सापडले. १९०८ मध्ये तर ऑफनेट गुफेत ३४ मानवी कवटी टोपलीत रचलेल्या सापडल्या. त्यानंतर आणखी एक कारण जेनेटिक ड्रिफ्टचं सांगितलं जातं, ज्यात निसर्गतः किंवा कोणत्याही कारणामुळे Y क्रोमोसोमच्या वैविध्याचा नाश झाल्याचं म्हटलं जातं. (Ancient War)

पण या सगळ्या थिअरीज् मध्ये युद्धाची थिअरी जास्त स्ट्रॉंग मानली गेली. ५% म्हणजे १०० पुरुषांपैकी ९५ मारले गेले असं नाही. याचा अर्थ फक्त ५% पुरुषांचा वंश पुढे गेला, बाकीच्यांचा थांबला. म्हणजे एक पुरुष अनेक मुलं जन्माला घालू शकतो, त्यामुळे काही पुरुषांनीच पुढच्या पिढ्या वाढवल्या आणि पुढे दोन-चार पिढ्यांनंतर पुरुष-स्त्रियांचं प्रमाण बरोबर झालं. पण आता कायद्यानुसार अशी युद्ध शक्य नाही त्यामुळे बॉटलनेक सारख्या घटना जवळपास शक्य नाही. रिसर्चर आता इतर संस्कृतींचा DNA तपासतायत, जसं की मादागास्करमधल्या बेटसिलीओ लोकांचे डीएनए… त्यांना वाटतंय की तिथेही असंच काहीतरी भयंकर घडलं असावं. समाजशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित यांचा आधार घेऊन इतिहास आणि जेनेटिक वैविध्य यांचा कसा संबंध आहे, याचा सखोल अभ्यास करतायत.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.