Home » भेट दिलेली मुर्ती झाली अमेरिकेची ओळख

भेट दिलेली मुर्ती झाली अमेरिकेची ओळख

by Team Gajawaja
0 comment
Statue of Liberty
Share

जगातील सर्वात शक्तीशाली देश कुठला तर सर्वांच्याच नजरा अमेरिकेकडे जातात. महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका ही आधुनिक सुखसाधनांची नगरीच आहे. असे असले तरी अवघ्या अमेरिकेची ओळख एका मुर्तीमध्ये आहे. ती मुर्ती म्हणजे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. अमेरिकेत येणा-या प्रत्येकाला या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जवळ एखादा तरी फोटो काढावा लागतो.  कारण त्याच्याशिवाय अमेरिकेची ओळखच पूर्ण होत नाही. आत्तापर्यंत कितीतरी हॉलिवूड चित्रपट हे या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला धरुन करण्यात आले आहेत. (Statue of Liberty)

फारकाय स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर हजारो कविता लिहिल्या गेल्या आहेत, नाटकं आहेत.  स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजे अमेरिका असे समिकरण झाले आहे.  मध्यंतरी कोणीतरी माथेफिरुनं या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला पाडण्याची धमकी दिली होती. तेव्हा या पुतळ्याला संरक्षणही देण्यात आले. अमेरिका ज्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला प्राणपणानं जपते, त्याच स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची निर्मिती अमेरिकेत नाही तर फ्रान्स या देशात झाली होती, हे वाचलं तर आश्चर्य वाटले.  पण फ्रान्स आणि अमेरिका यामधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ व्हावेत, या भावनेतून फ्रान्सने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा पुतळा भेट दिला.  दुस-या देशानं दिलेली ही मौल्यवान भेट आता अवघ्या अमेरिकेचा चेहरा झाला आहे. 

अमेरिकेच्या बहुधा प्रत्येक चित्रपटात स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या पुतळ्याला दाखवण्यात येते.  जेम्स बॉण्डचा चित्रपट असो, वा आत्ताचं वेबवॉर या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या एका शॉटसह कुठलाही चित्रपट, वेबसिरीज पूर्ण होत नाही. अमेरिकेची ओळख असलेल्या या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पुतळ्याला अमेरिकेत बनवण्यात आलं नाही. अमेरिकेनं फक्त त्याचा पाय तयार केला आहे.  जुलै १७७६ रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या दिनाचे औचित्य साधत फ्रान्स सरकरानं अमेरिकेला भेट दिला होता.  या घटनेला लवकरच २४८ वर्ष पूर्ण होणार आहेत.  दोन वर्षांनी या भेटीला अडीचशे वर्ष पूर्ण होणार आहेत.  त्यामुळे अमेरिका आणि फ्रान्समधील या मैत्रीचा धागा म्हणून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जवळ अनेक कार्यक्रम करण्यात येणार आहेत.  (Statue of Liberty)

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी  हा पुतळा म्हणजे, फ्रान्स आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या मैत्रीचा पाया मानला जातो. दोन्ही देशांच्या सरकारांमधील करारानुसार, अमेरिकेमध्ये तेव्हा या भव्य पुतळ्यासाठी पाया बांधण्यात आला. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन येथील लिबर्टी आयलंडवर २४८ वर्षापूर्वी बसवलेला हा तांब्याची भव्य पुतळा मग अमेरिकेला येणा-या प्रत्येक पर्यटकाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या आदर्शांचे प्रतिकात्मक प्रतीक मानले जाते. 

फ्रान्सनं दिलेल्या या पुतळ्याचे १८ ऑक्टोबर लोकार्पण झाले होते.  फ्रेंच शिल्पकार फ्रेडरिक ऑगस्टे बार्थोल्डी यांनी या भव्य पुतळ्याची निर्मिती केली.  त्यासाठी गुस्ताव्ह आयफेल यांनी अभियंता म्हणून काम केले.  गुस्ताव्ह आयफेल यानेच फ्रान्सची ओळख असलेल्या आयफेल टॉवरचीही रचना केली आहे.  त्याच्याच नावावरुन या भव्य टॉवरचे नाव आयफेल टॉवर ठेवण्यात आले आहे.  स्टॅच्यू ऑफ लिबर्टी  हा पुतळा तांब्याच्या पातळ पत्र्यांपासून बनविण्यात आला आहे.  पायासह या पुतळ्याची उंची ३०५ फूट आहे.  ही मूर्ती रोमन देवी लिबर्टासचे प्रतिनिधित्व करते. पुतळ्याच्या उजव्या हातात एक मशाल आहेजी ज्ञान आणि आशेचे प्रतीक मानली जाते.(Statue of Liberty)

==============

हे देखील वाचा : मुल्तानी मातीत मिक्स करा ही 1 वस्तू, उजळेल त्वचा

==============

डाव्या हातात जुलै १७७ च्या अमेरिकन डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्सची तारीख असलेले टॅबलेट आहे. पुतळ्याच्या डोक्यावर सात किरण आहेत, जे सात खंड आणि स्वातंत्र्याच्या सात समुद्रांचे प्रतिनिधित्व करतात.  स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा मुकुट २५  खिडक्यांनी बनलेला आहे, जो अमेरिकेच्या रत्नांचे प्रतिनिधित्व करतो.  मूर्तीच्या आत एक जिना आहे जो मुकुटाकडे जातो,  तिथून अवघ्या अमेरिकेला बघता येते.  येथे जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.  स्टॅच्यू ऑफ लिबर्टी च्या हातात असलेल्या प्रसिद्ध मशालीवर २४ कॅरेट सोन्याचा लेप लावण्यात आला आहे. १९८४ मध्ये, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले. याच स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला पुढच्या दोन वर्षात २५० वर्ष पूर्ण होत आहेत.  यानिमित्त अमेरिकेत आत्तापासून विविध कार्यक्रम सुरु झाले आहेत.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.