१९१४ ते १९१८ या दरम्यान पहिलं महायुद्ध सुरु होतं. तेव्हा फ्रान्सने आपल्या इंजिनियर्सना आतापर्यंतची एक मोठी जबाबदारी दिली. ती म्हणजे पॅरिसपासून दूर एक बनावटी पॅरिस उभं करायचं! आता प्रश्न असेल म्हणजे काय? तर पॅरिसपासून लांब पॅरिससारखंच बनावट पॅरिस उभं करायचं, सेम गल्ल्या, घरं, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, अगदी विमानतळापर्यंत सगळं हुबेहूब पॅरिससारखं बनवायचं. मग फरनेंड जॅकोपोझी नावाच्या एका इलेक्ट्रिकल इंजिनियरने फ्रान्स सरकारच्या मदतीने या कामाला सुरुवात झाली. पण फ्रान्स सरकारला खोटं बनावटी पॅरिस का बनवावं लागलं, तर ती एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ती जाणून घेऊ. (Fake Paris)
पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि काही आठवड्यातच जर्मन सैन्याने पॅरिसवर बॉम्ब हल्ले चढवले. जर्मनीला पॅरिसच का टार्गेट करायचं होतं? तर त्याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण होतं, पॅरिस हे जर्मनीच्या पश्चिम सीमेपासून सर्वात जवळचं प्रमुख शहर होतं. जर्मन सैन्याला आणि त्यांच्या विमानांना पॅरिसवर हल्ला करण्यासाठी फक्त जवळपास 30 किलोमीटर अंतर कापावं लागायचं. यामुळे पॅरिस हे हवाई हल्ल्यांसाठी सोपं आणि त्वरित पोहोचता येणारं टार्गेट होतं आणि दुसरं कारण म्हणजे, पॅरिस ही फ्रान्सची राजधानी, म्हणजे मोठं टार्गेट. ३० ऑगस्ट १९१४ रोजी जर्मनीने Taube नावाच्या फायटर प्लेनने पहिला हल्ला केला. हा असा पहिलाच हल्ला होता, जिथे एखाद्या देशाच्या राजधानीवर बॉम्ब टाकले गेले. या हल्ल्यात जास्त लोकांचं नुकसान झालं नाही, पण पॅरिसच्या लोकांवर मानसिक दबाव आला. (Top Stories)
१९१७ चा सुरुवातीचा काळ फ्रान्ससाठी तसा बरा गेला, कारण जर्मनीचं लक्ष पॅरिसवरून लंडनकडे वळलं होतं. जर्मनीने आपल्या नव्या बॉम्बर प्लेनने लंडनवर हल्ला केला आणि जून १९१७ मध्ये झालेल्या एका हल्ल्यात १६२ ब्रिटिश लोकांचा बळी गेला. पण फ्रान्सला हेच टेन्शन होतं की, जर्मनी पुन्हा पॅरिसकडे नक्कीच परत येणार. म्हणून मग त्यांनी एक आयडिया काढली. १९१७ मध्ये फ्रान्सने ठरवलं की, पॅरिसला वाचवण्यासाठी एक बनावट पॅरिस बनवायचं, म्हणजे काय होईल की, जर्मन फायटर प्लेनचा गोंधळ उडेल. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, त्या काळात आजच्यासारखे गुगल मॅप्स नव्हते. तेव्हा कागदी नकाशा बघून अंदाजाने पूर्वेकडे जा, पश्चिमेकडे जा असाच प्रवास करायचे. मग प्लेनमधून स्फोटकं घेऊन पायलट फक्त खाली बघून अंदाजाने बॉम्ब टाकायचे. म्हणून फ्रान्सने असा प्लॅन बनवला ज्याने या जर्मन पायट्सची गोची होईल आणि मग खरं पॅरिस आणि नकली पॅरिस यातला त्यांना फरकच कळणार नाही. त्यानंतर सुरू झाली जागा शोधायची गडबड. मग फरनेंड जॅकोपोझीने Maisons Laffitte ही जागा बनवटी पॅरिससाठी फायनल केली. (Fake Paris)
त्यातच जर्मनांना चकवण्यासाठी फ्रान्सने आणखी दोन ठिकाणं बनवली. पॅरिसपासून १६ किमी पूर्वेला एक बनावटी इंडस्ट्रियल झोन बनवला आणि १९१८ मध्ये उत्तर-पूर्वेला Villepinte इथे आणखी एक बनावट शहर उभं केलं गेलं. त्यात पॅरिसचं सगळ्यात गजबजलेलं रेल्वे स्टेशन, Gare De Lyon बनवलं. इतकंच काय तर, लाकडापासून चालती ट्रेनसुद्धा बनवली, ज्यावर रात्रीच्या वेळी लाईट्स लावून ती खरोखर चालतेय असं भास निर्माण होईल. लाकडं वापरून एक बनावट इंडस्ट्रियल एरिया तयार केला गेला. फॅक्टरींचे सांगाडे बनवले आणि त्यांच्या छतांवर कॅनचा वापर केला, ज्यांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवलं. रंगीत लॅम्प्स लावले, ज्यामुळे रात्रीच्या वेळी फॅक्टरीत आग लागलीय आणि धूर निघतोय असं वाटेल. आता हे सगळं दृश जर वरून आकाशातून पाहिलं तर खरंच वाटेल, असं बनलं होतं. पण अजून बनवटी पॅरिस बनलं नव्हतं. त्यातच १६ सप्टेंबर १९१८ला जर्मनीने पुन्हा फ्रान्सवर हल्ला केला. यात ६ जणांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाले. (Top Stories)
=============
हे देखील वाचा : First Plastic Surgery : एका मराठी माणसामुळे पार पडली जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी !
=============
फ्रान्सने ठरवलं की, आता नकली बनावटी लवकरात लवकर तयार करायचं, जेणेकरून जर्मन पुन्हा हल्ला करतील तेव्हा चुकतील आणि इथेच फ्रान्सची गंमतच झाली. कारण हा प्लान पूर्ण व्हायच्या आधीच दोन महिन्यांनी, म्हणजे नोव्हेंबर १९१८ मध्ये, पहिलं महायुद्ध संपल्याची घोषणा झाली. पण जॅकोपोझीला शंका होतीच की, त्याचा हा प्लॅन जर्मन पायलटांना खरंच चकवू शकला असता का? पण फ्रान्स सरकारला विश्वास होता की, युद्ध पुढे चाललं असतं, तर ही त्यांची स्मार्ट खेळी यशस्वी ठरली असती. (Fake Paris)
जॅकोपोझीची ही योजना युद्ध संपल्यानंतरही गुप्त ठेवली गेली आणि दोन वर्षातच १९२० मध्ये ब्रिटिश मीडियाने ही बातमी छापली, तेव्हा बनावटी पॅरिसची गोष्ट जगासमोर आली. पण जर पुन्हा जर्मनने हल्ला केला असता तर, हा बनावटी पॅरिसचा प्लान सक्सेसफुल झाला असता का? तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics