Home » Kamchatka : नितांत सुंदर कामचटका आणि रिंग ऑफ फायरचे जाळे !

Kamchatka : नितांत सुंदर कामचटका आणि रिंग ऑफ फायरचे जाळे !

by Team Gajawaja
0 comment
Kamchatka
Share

रशियातील कामचटका या द्वीपकल्पाचे नाव काही तासातच जगभर झाले. याच द्वीपकल्पावर झालेल्या 8.8 तीव्रतेच्या भूकंपाने अनेक देशांना मोठ्या चिंतेत टाकले आहे. खरं तर, कामचटका आणि भूकंप यांचे नाते जुने आहे. या भागात सातत्यानं भूकंप येतात. पण काही मोजके धक्के सोडले तर त्यांची कोणी गणनाच करत नाही. आता आलेल्या भूकंपापूर्वी 1952 मध्ये येथे याहून अधिक तीव्रतेचा भूकंप आला होता. वास्तविक हे कामचटका म्हणजे निसर्गाचे वरदान लाभलेले ठिकाण आहे. इथलं हवामान खूपच थंड आहे. युनेस्कोने या भागाला जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित केले आहे. अगदी मोजकी लोकसंख्या या बेटांवर आहे, हे लोकं मासे आणि खेकडे पकडण्याचे काम करतात. (Kamchatka)

या बेटांच्या निसर्गामुळे पर्यटकांचे आवडते स्थळ म्हणूनही कामचटका प्रसिद्ध आहे. येथे गरम पाण्याचे झरे आहेत. कामचटका द्वीपकल्प हा प्रशांत महासागरातील “रिंग ऑफ फायर” मध्ये स्थित आहे. हा भाग जगातील सर्वात भूकंपीयदृष्ट्या सक्रिय क्षेत्रांपैकी एक आहे. या प्रदेशात, टेक्टोनिक प्लेट्स सतत हालचाल करत असतात, ज्यामुळे भूकंप आणि ज्वालामुखी क्रियाकलाप होतात. आत्ताही आलेला भूकंप अशाच हालचालीमधून आला आहे. आता या शक्तिशाली भूकंपानंतर येथील 160 ज्वालामुखींवर काय परिमाण झाला आहे, यावरही या द्वीपकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाला ‘काला’ असे म्हटले जाते. या कामटकामध्ये वारंवार भूकंप होतात आणि येथील जमिनीला हादरे बसतात. या भागातील मच्छिमारांसाठी जमिनीची ही थरथर नवी नाही. अगदी याच जुलै महिन्यात कामचटकाजवळील समुद्रात 7.4 तीव्रतेचा भूकंपही झाला. तेव्हाही येथील नागरिकांनी काही तास आपल्या घरांना टाळे लावले. (Latest International News)

पुन्हा काही तासांनी हे नागरिक आपल्या घरांमध्ये दाखल झाले. भूकंपाला कामचटकामधील नागरिकांनी आपल्या आयुष्याचा एक भाग केले आहे. याच भूकंपप्रवण भागात भूकंपाचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होतात, हे सांगितले तरीही आश्चर्य वाटेल. पण हे सत्य आहे. कारण हा कामचटका भाग नितांत असा सुंदर आहे. निसर्गाचे सौंदर्य म्हणजे काय, हे अनुभवायचे असेल तर कामचटका द्वीपकल्पाला भेट द्या असे सांगितले जाते. तेथील जनजीवनाचा भूकंप हा एक भाग आहे. पण बुधवारी पहाटे आलेल्या 8.8 तीव्रतेच्या भूकंपानं येथे सर्वत्र विनाशाचे सावट पसरले आहे. अनेक इमारती कोसळल्या असून समुद्राच्या महाकाय लाटा द्वीपकल्पावर आल्या आहेत. यामुळे किनारी भागात मोठे नुकसान होण्याची भीती आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार हा भूकंप सुमारे 19.3 किलोमीटर खोलीवर झाला असल्यामुळे पृष्ठभागावर जोरदार हादरे जाणवले आहेत. (Kamchatka)

कामचटका द्वीपकल्प प्रशांत महासागराच्या काठावर आहे. कामचटका द्वीपकल्प, कमांडर बेटे आणि कारागिन्स्की बेटे मिळून रशियन फेडरेशनचा कामचटका प्रदेश होतो. या भागाच्या एका बाजूला ओखोत्स्क समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत महासागर आणि बेरिंग समुद्र आहे. त्यामुळेच येथील भूकंपानंतर जपान, अमेरिका आणि रशिया सारख्या प्रशांत महासागराशी जोडलेल्या देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला. यापूर्वी कामचटकामध्ये 1952 मध्ये 9.0 तीव्रतेचा भूकंप आला होता. कामचटका द्वीपकल्प जिथे आहे, तो भाग महासागराच्या रिंग ऑफ फायरचा एक भाग आहे. (Latest International News)

या भागावरील पृथ्वीच्या प्लेट्स सतत हलत राहतात. येथील पॅसिफिक प्लेट ओखोत्स्क प्लेटच्या खाली दरवर्षी सुमारे 86 मिमी दराने बुडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच येथे मेगाथ्रस्ट भूकंप होतात. याच भागात सुमारे 160 ज्वालामुखी असून त्यापैकी 29 सक्रिय आहेत. म्हणजेच या ज्वालामुखीचा कधीही उद्रेक होऊ शकतात. आता भूकंप झाल्यावर याच ज्वालामुखींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. यामध्ये हालचाल जाणवली तर परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता आहे. येथील सर्वात उंच ज्वालामुखी क्ल्युचेव्हस्काया असून तो 4750 मीटर उंच आहे. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी म्हणूनही क्ल्युचेव्हस्कायाची नोंद आहे. (Kamchatka)

==============

Japan’s Earthquake : जपानच्या शक्तिशाली भूकंपानंतर 18 देशांना त्सुनामीचा धोका !

=============

कामचटकाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की, येथे भूकंपप्रवण पट्टा तयार झाला आहे. अगदी 9.3 तीव्रतेचा भूकंपही कामचटका येथे झाला आहे. 2006, 2017 मध्ये येथे भूकंपाचे मोठे धक्के बसले आहेत. आश्चर्य म्हणजे हे भूकंपाचे धक्केही जुलै महिन्यातच बसले होते. आत्ताचा 8.8 चा भूकंप हा या जुलै महिन्यातील सर्वात मोठा भूकंपाचा धक्का आहे. सध्या या कामचटकावर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. येथे मच्छिमारांची मोठी वस्ती आहे. शिवाय पर्यटकांसाठी काही हॉटेलही उभारण्यात आली होती. या सर्वच इमारती पडल्या असून कामचटका द्वीपकल्पाला पुन्हा उभं करणं हे सर्वात मोठं आव्हान रहाणार आहे. (Latest International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.