Home » 369 फूट उंच शिव मूर्ती बनवण्याची कहाणी

369 फूट उंच शिव मूर्ती बनवण्याची कहाणी

by Team Gajawaja
0 comment
Lord Shiva Statue
Share

शानदार राजवाडे,  भव्य किल्ले,  मोठ्याल्या बागा आणि तलावांसाठी ओळखल्या जाणा-या राजस्थानच्या उदयपूरची ओळख आता नव्यानं लिहिली जाणार आहे.  उदयपूरमध्ये जगातील सर्वात उंच शिवप्रतिमा साकार करण्यात आली आहे.  मिराज ग्रुपतर्फे साकारलेल्या या शिवप्रतिमेला विश्वास स्वरुपम असे नाव देण्यात आले आहे.  गेल्या दहा वर्षापासून ही भव्य प्रतिमा उभारण्याचे काम चालेले होते.  अद्यापही काही स्वरुपात या शिवप्रतिमेच्या परिसराच्या विकासाचे काम चालू आहे.  जगातील सर्वात उंच पाच पुतळ्यांमध्ये या भगवान शंकराच्या मुर्तीला ( Lord Shiva Statue) स्थान दिले आहे.  तब्बल 369 फूट उंच पुतळ्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत.  दहा वर्षापूर्वी संत कृपा सनातन संस्थेतर्फे उदयपूरच्या श्रीजींची धारा नाथद्वारा-राजसमंद येथे या मुर्तीच्या कामाची पायाभरणी मुरारी बापू यांच्या हस्ते करण्यात आली होती.  आता मुरारी बापू यांच्याच हस्ते या मुर्तीचा लोकार्पण सोहळा सुरु आहे.  सहा नोव्हेंबर पर्यंत चालणा-या या सोहळ्याला हजारो शिवभक्त उपस्थित आहेत.   

विश्व स्वरूपम असे नाव दिलेल्या भव्य भगवान शंकाराची मुर्ती ( Lord Shiva Statue) ही भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान होणार आहे.  तसेच हा सर्व प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाच्या कल्पकतेचेही उदाहरण ठरणार आहे.  ही भव्य मुर्ती पूर्ण करण्यासाठी 10 वर्षे लागली.  जगातील सर्वात उंच पाच मुर्तींमध्ये याला स्थान देण्यात आले आहे. आता  मुरारी बापूं यांच्या रामकथेने हा भव्यदिव्य लोकार्पण सोहळा आठवडाभर चालणार आहे.  

नाथद्वारामधली ही भगवान शिवाची भव्य मूर्ती ( Lord Shiva Statue) आता स्टॅच्यू ऑफ बिलिफ  म्हणूनही ओळखली जाणार आहे.  मंत्रमुग्ध करणारी ही मुर्ती आणि एकूणच परिसर बघण्यासाठी किमान पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो.  यावरुनच याची भव्यता जाणता येते.   नाथद्वाराच्या गणेश टेकडीवर असलेली ही भगवान शिवाची मुर्ती  ध्यान मुद्रेत आहे. पुतळ्याची उंची एवढी आहे की ती कित्येक किलोमीटर वरुन दिसते. रात्रीच्या वेळीही ही मूर्ती स्पष्टपणे दिसावी यासाठी विशेष दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

ही 369 फूट उंच शिव मूर्ती ( Lord Shiva Statue) बनवण्याची कहाणीही रंजक आहे. 2012 मध्ये जेव्हा हा पुतळा बनवण्याची योजना तयार करण्यात आली तेव्हा त्याची उंची 251 फूट ठेवण्याची योजना होती. पण नंतर बांधकामादरम्यान त्याची उंची 351 फूट झाली. यानंतर शिवाच्या केसात गंगेचा प्रवाह टाकण्याची योजना आखण्यात आली, त्यानंतर त्याची उंची 369 फूट झाली.

या पुतळ्यामध्ये लिफ्ट, जिने, हॉल आदी सुविधाही करण्यात आल्या आहेत.  बांधकामादरम्यान 3000 टन स्टील आणि लोखंड, 2.5 लाख घन टन काँक्रीट आणि वाळू वापरण्यात आली आहे. 250 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचाही मूर्तीवर परिणाम होणार नाही.  उदयपूर-राजसमंद महामार्गावरून प्रवास करतांना अत्यंत दूरवरुनही  भगवान शंकाराची ही प्रसन्न मुर्ती पहाता येते.  मात्र बाहेरून या  मुर्तीच्या आत बांधलेल्या हॉलमध्ये 10 हजार लोक एकत्र येऊ शकतात.  अर्थात यात एक अख्खं गाव तयार होऊ शकेल इतकी जागा आहे.  

विश्वास स्वरूपम पुतळा तयार करण्यासाठी 10 वर्षे लागली. 50 हजारांहून अधिक लोकांनी हा पुतळा बनवला. ज्या संकुलात ते बांधले आहे त्याला पदम उपवन असे नाव देण्यात आले आहे. गुडगावच्या नरेश कुमावत या प्रसिद्ध मुर्तीकारांनी ही भव्य शिवप्रतिमा साकारली आहे.  या मुर्तीच्या आत वेगवेगळ्या उंचीवर जाण्यासाठी 4 लिफ्ट आहेत. येथे भेट देण्यासाठी येणाऱ्या लोकांना 20 फूट उंचीवरून 351 फूट प्रवास करून दिला जाणार आहे.  270 फूट उंचीवर भगवान शंकराचा डावा खांदा आहे. येथून संपूर्ण नाथद्वाराचा परिसर पहाता येतो. या खांद्यावरून भगवान शंकराच्या त्रिशूळाचेही दर्शन होईल.  270 ते 280 फूट उंचीवर जाण्यासाठी छोटा पूल बांधण्यात आला आहे.  हा पूल दगड किंवा आरसीसीचा नसून काचेचा आहे.  21 पायऱ्या पार करायला साधारणपणे 10 मिनिटे लागतात. त्या दरम्यान काचेच्या पायऱ्यांवरून तळमजल्यावरचे नजारे पहाण्यासारखे असतात.  भगवान शिवाचा उजवा खांदा 280 फूट उंचीवर आहे.  येथून पदम उपवनचे विहंगम दृश्य पाहता येते.  तसेच येथूनच भगवान शिवाच्या नागाचे दर्शन घेता येते.  त्यानंतर लिफ्टद्वारे आणखी पुढच्या 110 फूट उंचींवर जाता येते.  या ठिकाणी भगवान शंकराचा उजवा हात जमिनीवर आहे. या भागात एक छोटी गॅलरी बनवण्यात आली आहे, जिथून संपूर्ण उदयपूर हायवे नजरेस पडतो.  ( Lord Shiva Statue)

=========

हे देखील वाचा : चारधाम यात्रेची सांगता….

========

ही  मुर्ती बनवण्यासाठी देशभरातून कारागीर मागवण्यात आले होते. 2012 मध्ये पायाभरणी झाल्यापासून पुतळ्याचे काम सातत्याने सुरू आहे. फक्त करोनाच्या काळात काही महिन्यासाठी हे बांधकाम थांबवण्यात आले होते.  त्यानंतर इंजिनिअर्स आणि कामगारांनी अविरत परिश्रम करुन ही भव्य मुर्ती उभी केली आहे.  आता ही परिसर आठवड्यानंतर पर्यंटकांसाठीही खुला करण्यात येणार आहे.  पर्यटक पाच ते सहा तास या भागात रहातील अशा बागा आणि पर्यटनस्थळे बनवण्यात आली आहे.  पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण उदयपूरमध्ये झाले आहे.  भगवान शंकराच्या भक्तांना या भव्य मुर्तीवर अभिषेक करण्याचीही सुविधा असल्यानं शिवभक्तांचीही संख्या येथे वाढणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.