जर्मनीच्या (Germany) ख्रिसमस मार्केटमध्ये हल्ला झाला आणि या हल्ल्यात 2 नागरिकांचा मृत्यू झाला असून 15 जणांची प्रकृती गंभीर आहे. ज्या ख्रिसमस मार्केटमध्ये हा हल्ला झाला हा सर्व परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो. त्यातच ख्रिसमसचा माहौल असल्यामुळे या सर्व भागात खच्चून गर्दी होती. याच गर्दीमध्ये आरोपी आपल्या कारसह आला आणि त्यानं जो समोर येईल त्याला चिरडायला सुरुवात केली. प्रथम आरोपीचा गाडीवरुन ताबा सुटला आहे, असे काहींना वाटले. मात्र नंतर आरोपी जाणूनबूजून पर्यटकांना जखमी करत असल्याचे लक्षात आल्यावर एकच खळबळ उडाली. (Germany)
जो तो स्वतःचा बचाव करु लागला. हा सर्व गोंधळ किमान अर्धा तास सुरु होता. आता पोलीसांनी आरोपीला अटक केली असली तरी या सर्वात या भागातील दुकानदारांचे आणि हॉटेल चालकांचेही मोठे नुकसान झाले आहे. यासोबत एक प्रश्न विचारण्यात येत आहे, तो म्हणजे, हा हल्ला जाणूनबुजून करण्यात आला होता का ? कारण जर्मनीमध्ये काही महिन्यापूर्वी मशिदींवर मोठी कारवाई करण्यात आली होती. शिवाय ख्रिसमसचा उत्सव सुरु झाल्यापासून काही मुस्लिम संघटनांनी ख्रिसमस विरोधात घोषणाबाजी केल्यानं या भागात तणावही निर्माण झाला होता. त्यामुळेच हा हल्ला झाल्यावर जर्मनीमधील हल्ल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सौदी अरेबियाचा नागरिक असलेल्या एका डॉक्टरनं जर्मनीमध्ये वेगवान गाडी चालवत 2 नागरिकांना ठार केले आहे. या हल्ल्यात 15 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या हल्लेखोरानं आपल्या वेगवान गाडीखाली 70 नागरिकांना चिरडले. हा हल्ला केला त्या आरोपीचे नाव आहे तालेब ए. व्यवसायानं डॉक्टर असलेला तालेब 50 वर्षाचा आहे. तालेब दोन दशकांपासून जर्मनीत रहात असून त्याच्याकडे जर्मनीचे नागरिकत्वही आहे. (International News)
तालेब जर्मनीच्या उजव्या विचारसरणीच्या राजकीय पक्ष अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (FD) चा समर्थक आहे. तो 2006 पासून जर्मनीत रहात आहे. तालेब व्यवसायानं मानसोपचारतज्ज्ञ आहे. तालेबनं हा हल्ला व्यवस्थित योजना आखून केल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. कारण या हल्ल्यासाठी त्यानं स्वतःची गाडी वापरली नाही. त्यानं भाड्यानं एक बीएमडब्ल्ययू कार घेतली आणि तिचा वापर केला. तालेबचा जन्म 1974 मध्ये सौदी अरेबियाच्या हॉफुफ शहरात झाला. मात्र तेथील काही संघटनांसोबत त्याचा वाद झाला. त्यामुळे तो जर्मनीत स्थलांतरीत झाला. 2016 मध्ये त्याला जर्मनी निर्वासित म्हणून मान्यता मिळाली. जर्मनीत आल्यानंतर तालेबनं एक वेबसाइट तयार केली. यातून सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांतील मुस्लिमांना जर्मनीसारख्या देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी तालेब मदत करत होता. सौदी अरेबियाने तालेबवर दहशतवादाचा आणि मध्य-पूर्व मुलींची युरोपियन देशांमध्ये तस्करी केल्याचा आरोपही केला. मात्र या आरोपांची जर्मन सरकारनं चौकशी केली आणि त्याचे सौदी अरेबियाकडे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला. (Germany)
==============
हे देखील वाचा : ड्रोन की युएफओ अमेरिकेत खळबळ !
===============
तालेबनं हल्ला करण्यासाठी जी जागा निवडली होती, ती सुद्धा खास आहे. मॅग्डेबर्ग ही जर्मनीच्या सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्याची राजधानी आहे. हे शहर बर्लिनपासून दीड तासाच्या अंतरावर आहे. मॅग्डेबर्ग येथे वर्षातून एकदा ख्रिसमस बाजार भरतो आणि यावेळी आजूबाजुच्या शहरामधील तमाम ख्रिश्चन मंडळी आवर्जून उपस्थित असतात. तालेबच्या हल्ल्यात यातील अनेक गंभीर जखमी झाले आहेत. ही सर्व पार्श्वभूमी पाहता तालेबनं हा हल्ला जाणून बुजून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या हल्ल्यानंतर जर्मनीमध्ये 19 डिसेंबर 2016 रोजी बर्लिनमधील हल्ल्याची आठवण काढण्यात आली. यावेळी एका इस्लामिक अतिरेक्याने ख्रिसमस मार्केटमधील गर्दीवर ट्रक चालवला होता. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जखमी झाले होते. तशाच स्वरुपाचा हल्ला तालेबनं केल्यामुळे त्याच्या लक्षावर ख्रिश्चन धर्मीय होते का याचा तपास सुरु आहे. गेल्या काही महिन्यापासून जर्मनीमध्ये इराण आणि सौदी अरेबियाशी संबंधित मशिदी बंद कऱण्यात आल्यामुळे मुस्लिम धर्मीयांमध्ये नाराजी आहे. जर्मन सरकारच्या या कारवाईबाबत सौदी अरेबिया (Saudi Arabia) सरकारनंही नाराजी व्यक्त केली होती. तसेच जर्मनीमध्येही मुस्लिम संघटनांनी निषेध व्यक्त केला होता. तोच धागा पकडून तालेबनं केलेल्या हल्ल्याचा तपास आता सुरु आहे. (International News)
सई बने