Home » Chhaava : ‘छावा’ नावाचं तुफान शमतच नाही, पहा कोणकोणते रेकॉर्ड्स केले

Chhaava : ‘छावा’ नावाचं तुफान शमतच नाही, पहा कोणकोणते रेकॉर्ड्स केले

by Team Gajawaja
0 comment
Chhaava
Share

हम शोर नही करते…सिधा शिकार करते है… अशा अनेक दमदार डायलॉग्ससह छावाने बॉक्स ऑफिसमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. छावाचा हा कमाईचा तुफान शमतच नाही. रेकॉर्ड्स वर रेकॉर्ड्स करणाऱ्या या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर आणखी एक रेकॉर्ड केला आहे… छावाने ५०० कोटींचा मॅजिकल आकडा पार केला आहे आणि आता त्याची घोडदौड ६०० कोटींकडे चालली आहे. ५०० कोटींचा पराक्रम करणारा छावा हा आठवा चित्रपट ठरला आहे. पण यासोबतच छावाने आणखी काही रेक्रोड केले आहेत… ते धमाकेदार रेकॉर्ड्स कोणते आहेत, जाणून घेऊ. (Chhaava)

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावाला जगभरातून प्रेम मिळतय. छावाने हिंदी बॉक्स ऑफिस वर ५०० कोटींची कमाई केली. यापूर्वी बाहुबली-२, पठाण, जवान, Animal, गदर-२, स्त्री-२, पुष्पा-२ याच चित्रपटांना हा आकडा पार करता आला होता. त्यातच बाहुबली आणि पुष्पा हे दोन्ही तेलुगू डब्ड मूव्ही होते. त्यामुळे ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरत छावा आता या आयकॉनिक पंक्तीत जाऊन बसला आहे. छावाने आतापर्यंत वर्ल्डवाईड ७०० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे. त्यातच हेव्ही डिमांडमुळे ७ मार्चला छावा तेलुगूमध्येही रिलीज करण्यात आला. त्यामुळे छावाच्या कमाईचा आकडा आणखी वाढणार हे मात्र नक्कीच आहे. (Box Office)

आता रेकॉर्ड्सच्या बाबतीत बोलायचं`झालं तर विकी कौशलच्या एकाही मूव्हीने आजपर्यंत फर्स्ट डे कलेक्शनच्या बाबतीत १० कोटीदेखील कमावले नव्हते. मात्र छावाने पहिल्याच दिवशी ३३.१० कोटींची कमाई केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ३९.३० कोटी आणि रविवारी ४९.०३ कोटींची कमाई करत आठवड्याभरातच १०० कोटींचा पल्ला गाठला होता. दुसरीकडे रश्मीका मंधानाने आपला ब्लॉकबस्टर कामगिरी सुरूच ठेवली आहे. रश्मीका ही भारतातली एकमेव अभिनेत्री ठरली आहे, जिच्या नावावर ५०० कोटी कमावणारे ३ चित्रपट आहेत. एक म्हणजे Animal, दुसरा म्हणजे पुष्पा २ आणि तिसरा छावा…(Chhaava)

डिरेक्टर लक्ष्मण उतेकर यांच्याबाबत सांगायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत चार बॉलीवूड चित्रपट बनवले आहेत. लुका छुपी, मिमी, जरा हटके जरा बचके आणि छावा… हे चारही चित्रपट सुपर हिट ठरले आहेत. त्यामुळे लक्ष्मण उतेकर हे इंडस्ट्रीत एक Brand म्हणून समोर आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे पुष्पा-२ आणि छावा एकाच दिवशी म्हणजेच ६ डिसेंबर २०२४ ला रिलीज होणार होते. मात्र दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी उत्तम निर्णय घेत Clash करणं टाळल, त्यामुळे दोघांच्या पारड्यात भरघोस कमाईसोबत अनेक रेकॉर्ड्ससुद्धा पडले आहेत. दुसरीकडे दुसऱ्या विकेंडमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल १८०.२५ कोटींची कमाई करणारा छावा हा पहिलाच बॉलीवूड चित्रपट ठरला आहे. (Box Office)

===============

हे देखील वाचा : Sugarcane : सगळ्या रसवंती गृहांची नावं कानिफनाथच का असतात ?

==============

हा रेकॉर्ड मोडून पुन्हा थर्ड विकेंडमध्येही छावाच Top ठरला आहे. आजपर्यंत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांच्या Top 20 मध्ये आता छावा येऊन धडकला आहे. संपूर्ण मार्च महिना छावाला कोणताही Competator नाही. त्यामुळे हे आकडे अजून वाढतील, हे दिसून येतंय. एकंदरीत दमदार विज्युअल्स, भव्यदिव्य सेट्स, जबरदस्त कास्टिंग आणि Acting या सर्वांमुळे छावाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे. आता छावा ६०० कोटी कमावतो का, याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.