साल २००३, डिसेंबरचा महिना, त्यात दिल्लीची डिसेंबर महिन्याची थंडी. डिफेन्स कॉलनीत आपल्या बंगल्यात एक माणूस खुर्चीवर समोर लॅपटॉप घेऊन बसला होता. त्याची बायको त्याच्यासाठी स्कॉचचा ग्लास घेऊन आली आणि त्याच्या पुढ्यात आणून ठेवला. त्याने स्कॉचचा पहिला घोट घेतला आणि लॅपटॉप ऑन करून वेबकॅम सुरु केला. तो तिथून उठला, कपाटाजवळ गेला. कपाटातून एक डायरी काढली आणि आपल्या बॅगेतून काही सीक्रेट डॉक्युमेंट्स काढले. काम सुरू असताना मध्ये मध्ये तो स्कॉचचे घोट घेत होता. त्याने त्या पेपर्सचे फोटो काढले, लॅपटॉपवर सेव्ह केले आणि एका आयडिवरून इंटरनेटद्वारे छुप्या पद्धतीने शेयर केले.
पण त्या कागदपत्रांमध्ये असं काय होतं? तर ती भारत सरकारची सीक्रेट इन्फॉर्मेशन होती आणि तो ती सीक्रेट इन्फॉर्मेशन अमेरिकेला पुरवत होता. हा माणूस होता Indian Intelligence Agency चा रॉ एजेंट रबिंदर सिंह. बरेच वर्ष तो अमेरिकेच्या CIA साठी डबल एजंट म्हणून काम करत होता. रबिंदरने भारताची सीक्रेट इन्फॉर्मेशन CIA ला पाठवली, ज्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इतर शेजारील देशांबद्दलच्या रॉ च्या डॉक्युमेंट्सचा समावेश होता. जो भारताचा सीक्रेट एजेंट असूनसुद्धा त्याने देशाविरुद्ध गद्दारी केली होती. (The Spy Who Betrayed India)
रबिंदरचा जन्म अमृतसरचा… त्याचे वडील आर्मी रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल होते. त्यामुळे रबिंदरला लहानपणापासूनच शिस्त आणि देशसेवेची जाण होती. १९७० मध्ये तो इंडियन आर्मीत मेजर बनला आणि १९८४ च्या ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यानं भाग घेतला. पण त्याची कामगिरी इतकी ग्रेट नव्हती. याच काळात रॉ चे डेप्युटी डायरेक्टर ए. के. वर्मा यांची त्याच्या वडिलांशी मैत्री झाली. आणीबाणीनंतर रबिंदर आणि त्याचं कुटुंब अमेरिकेत गेलं. १९८० च्या दशकात वर्मा यांचं प्रमोशन झालं आणि ते रॉ मध्ये जॉइंट सेक्रेटरी बनले. तीन वर्षांनी त्यांना वॉशिंग्टनमधल्या इंडियन एंबसी काऊन्सलर म्हणून नेमलं गेलं. त्यांनी रबिंदरच्या मोठ्या भावाला अमेरिकेतल्या खलिस्तानी उग्रवाद्यांवर हेरगिरीसाठी नेमलं आणि १९८६ मध्ये रबिंदरला आर्मीमधून रॉ मध्ये आणलं.
पंजाबमधला उग्रवाद म्हणजे Punjab Insurgency जोरात असताना रबिंदरला अमृतसरला पाठवलं गेलं. पंजाबमधला उग्रवाद म्हणजे १९७० ते १९९० या काळात पंजाबमध्ये खलिस्तानी हिंसक चळवळ सुरू होती. आर. के. यादव यांच्या मिशन रॉ या पुस्तकानुसार, अमृतसरमध्ये रबिंदर डेप्युटी कमिशनर होता. नातेवाइकांच्या मदतीने पोलिसांचा पाठिंबा मिळवला, अनेकदा रॉ च्या नियमांविरुद्ध जाऊन पाकिस्तानी सीमेवर गुप्त मिशन्स चालवली, पाकिस्तानातल्या खलिस्तानी उग्रवाद्यांशी संपर्क साधला आणि काहींना ठारही मारलं, असं सांगितलं जातं. त्याच्यावर सीक्रेट फंडाचा गैरवापर आणि बनावट अहवाल पाठवण्याचे आरोप झाले. त्याने मृत व्यक्तींच्या नावाने पैसे उकळले आणि बनावट रिपोर्ट्स पाठवली, ज्यामुळे काही चुकीची ऑपरेशन्स झाली आणि सामान्य लोक आणि जवानांचा जीव गेला. रबिंदरला दारू आणि पार्ट्यांचा बराच नाद होता, ज्याच्यामुळे त्याची बरीच बदनामी झाली.
याच शीख उग्रवाद्यांपासून लांब ठेवण्यासाठी त्याला सिरियाच्या दमास्कसला व्हिसा सेक्शनचा इन चार्ज बनवलं. पण तिथेही त्याने रॉ चे आदेश मानले नाही आणि पाकिस्तानच्या मुर्तजा भुट्टोशी दोस्ती केली. भारतीय राजदूताशी उद्धट वागायला सुरुवात केली, त्यांच्यासोबत झालेल्या हातापायीमुळे त्याला वर्षभरात दिल्लीला परत बोलावलं. आश्चर्य म्हणजे, रॉ ने त्याच्यावर कठोर कारवाई केली नाही. मग रबिंदरला नेदरलँड्समधल्या द हेग इथं पाठवण्यात आलं, जिथं तो सिख उग्रवादी गटांवर नजर ठेवायचा. (The Spy Who Betrayed India)
असं म्हणतात, तो जास्त वेळ दारू आणि बायकांवर खर्च करायचा आणि त्यातच त्याची दारू पिऊन अनोळखी लोकांसमोर सीक्रेट गोष्टी बोलून टाकायचा आणि याच संधीचा फायदा अमेरिकेच्या CIA ने घेतला. १९९८ च्या पोखरण अणुचाचणीच्या CIA च्या अपयशामुळे त्यांना भारतात जासूस हवा होता. तेव्हाच द हेगमधल्या इंडियन एंबसीत असताना CIA ने रबिंदरला हनी-ट्रॅप आणि पैशाच्या लालसेत अडकवलं. रबिंदरने २१० पेक्षा जास्त सीक्रेट डॉक्युमेंट्स, श्रीलंकेवरची माहिती CIA ला पाठवली.
================
हे देखील वाचा : Rajguru : राजगुरूंनी शेर मारला सगळेच शांत…मग झालं असं काही…
================
२००३ मध्ये त्याच्या संशयास्पद वागण्याचा पत्ता लागला. दुसरी गोष्ट २००३ मध्ये घडली. दिल्लीत इंटेलिजन्स ब्युरोच्या (IB) ऑफिसरशी बोलताना एकाने चुकून रबिंदरचं नाव घेतलं. आता तो एक कोण होता, त्याचं नाव स्पष्ट नाही. पण त्यामुळे रबिंदर आणि CIA चा संबंध आहे असं कळलं. जानेवारी २००४ मध्ये रॉ ने फोन टॅपिंग, बग्स आणि २० पेक्षा जास्त एजंट्सद्वारे observations सुरू केले. पण तपासणीत काहीच सापडलं नाही.
एप्रिल २००४ मध्ये रबिंदरला आपल्यावर observationसुरू आहे असं कळताच, तो आणि त्याची बायको परमिंदर कौर १ मे ला नेपालगंजला पळाले. बी. रमण यांच्या द काओबॉयज ऑफ रॉ नुसार, CIA ने काठमांडूत दोघांना राजपाल प्रसाद शर्मा आणि दीपा कुमारी शर्मा नावाने बनावट पासपोर्ट दिले. ७ मे २००४ ला ते व्हिएन्नामार्गे वॉशिंग्टनला पोहोचले.रॉ ने रबिंदरच्या घराची झडती घेतली, तेव्हा तिथे एक लॅपटॉप सापडला, ज्यात बरेच सीक्रेट डॉक्युमेंट्स होते, पण तोवर रबिंदर अमेरिकेत पोहोचला होता. (The Spy Who Betrayed India)
त्याच्या फॉरेन्सिक इन्वेस्टिगेशन मध्ये असं दिसून आलं की, त्याने २०००० पेक्षा जास्त फाइल्स CIA ला पाठवल्या असतील आणि अमेरिकन इंटेलिजेंसने त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले. २०१६ मध्ये वॉशिंग्टनमधून भारतात एका डिप्लोमॅटिक बॅगद्वारे कोडमधला मेसेज आला की, डबल एजंट रबिंदर सिंग आता या जगात नाही. काही काळाने कळलं की, त्याचा मृत्यू मेरीलँडमधल्या एका रोड अॅक्सिडेंटमध्ये झाला, जो काहींच्या मते संशयास्पद होता. त्यानंतर रबिंदरच्या कुटुंबाबद्दल किंवा त्याच्याशी संबंधित कोणताही पुरावा समोर आला नाही. रबिंदर सिंह एक रॉ एजेंट ज्याने पैशांच्या लालसेपोटी देशाशी गद्दारी केली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics