हास्याची मेजवानी घेऊन येत्या १ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या मल्टीस्टारर अशा ‘झोलझाल’ या सिनेमातील ‘फ्री हिट वाला नो बॉल, झाला झोलझाल’ हे गाणे रसिक प्रेक्षकांना ठेका धरायला लावण्यास आले आहे. विशेष म्हणजे सुमधुर स्वरांनी हे गाणे गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) हिने स्वरबद्ध केले असून, वैशालीच्या या गाण्याने रसिक प्रेक्षक नक्कीच ठेका धरतील यांत शंकाच नाही.
आजवर वैशालीने गायलेली सर्वच गाणी रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत, यांत वैशालीने ‘झोलझाल’ या सिनेमात गायलेल्या ‘झोलझाल’ या मल्टीस्टारर गाण्याची रंगत काही औरच आहे. या गाण्यात चित्रपटातील तब्बल २२ कलाकारांनी एकत्र येऊन त्यांच्या नृत्याने आणि त्यांच्या अभिनयाने चारचाँद लावले आहेत.
गायिका वैशाली सामंतने स्वरबद्ध केलेल्या या झोलझाल या गाण्याच्या संगीताची संपूर्ण जबाबदारी प्रफुल्ल – स्वप्निल यांनी पेलवली. तर या गाण्याचे बोल गीतकार मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहेत. तर या गाण्यात वापरण्यात आलेले रॅप सॉंगच्या काही ओळी या वरून लिखाते यांच्या आहेत.या गाण्याला खरा साज चढलाय तो कलाकारांमुळे.
२२ कलाकारांनी मिळून या मल्टिस्टारर चित्रपटातील या झोलझाल या गाण्याचे चित्रीकरण केले आहे. या गाण्यात अभिनेते मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाळवे, अभिनेत्री प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे सिनेकलाकार दिसणार असून या कलाकारांनी गाण्यात केलेला धिंगाणा पाहणे खरच पर्वणी ठरणार आहे यांत शंकाच नाही.
====
हे देखील वाचा: मन हेलावणाऱ्या ‘वाय’ चा थरारक ट्रेलर प्रदर्शित !
====
दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून या चित्रपटाची निर्मिती निर्माता गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली असून सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली. ‘युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन’ अंतर्गत अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत ‘रोलींगडाईस’ असोसिएशन सोबत ‘झोलझाल’ हा चित्रपट हास्याची मेजवानी घेऊन येत्या १ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.